एक्स्प्लोर
UTS अॅपवर रेल्वे तिकीट बूक करा आणि ATVM मधून प्रिंट घ्या
नवी दिल्ली : रेल्वे स्टेशनवरील तिकीट खिडकीच्या बाजूला असलेल्या एटीव्हीएममधून आता मोबाईल तिकिटाची प्रिंट काढता येणार आहे. यूटीएस मोबाईल अॅपवरुन तिकीट बुक केल्यानंतर स्टेशनवरच्या एटीव्हीएमवरुन त्या तिकिटाची प्रिंट घेता येणार आहे. त्यासाठी कमीत कमी 100 रुपयांचं तिकीट असणं गरजेचं आहे.
मोबाईल क्रमांक आणि बुकिंग आयडी टाकल्यानंतर लगेच तिकिटाची प्रिंट मिळणार आहे. मात्र, प्रिंटेड तिकीटच हवं अशी कुठलीही सक्ती नसून, प्रवासी मोबाईलमधील तिकीट दाखवूनही प्रवास करु शकतात.
यूटीएस मोबाईल अॅपवरुन तिकीट काढून थेट प्रिंट करण्याचा पर्याय दिल्याने आता प्रिंटेड तिकिटांसाठी रांगेत उभं राहून, वेळ खर्ची घालण्याची गरज भासणार नाही.
आतापर्यंत काय व्हायचं की, यूटीएस मोबाईल अॅप ज्यांच्या स्मार्टफोनमध्ये आहे, त्यांनाच ऑनलाईन तिकिटाचा लाभ घेता यायचा. कारण टीसीने पकडल्यास अॅपवरील तिकीट दाखवणं बंधनकारक असायचंय, मात्र, आता अॅपवरुन तिकीट बुक केल्यानंतर नातेवाईकांना प्रिंटेड तिकीट देऊ शकतात.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
राजकारण
बीड
राजकारण
Advertisement