एक्स्प्लोर
लाँचिंगनंतर अवघ्या 24 तासात भिम अॅपचं सर्व्हर डाऊन
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅशलेस व्यवहार अधिक सुरळीत करण्यासाठी 30 डिसेंबरला भिम अॅप लाँच केलं. मात्र लाँचिंगनंतर अवघ्या 24 तासात या अॅपचं सर्व्हर डाऊन झालं. त्यामुळे युझर्सना अडचणींचा सामना करावा लागला.
मोदींनी लाँच केलेलं भिम अॅप नेमकं कसं चालतं?
भिम अॅपकडून ट्विटरवर अॅपचं सर्व्हर डाऊन झाल्याची माहिती देण्यात आली. सर्व्हरवर लोड आल्याने युझर्सना अडचण येत असून लवकरच याची नवीन अपडेट दिली जाईल, असं भिम अॅपकडून सांगण्यात आलं.मोदींनी लाँच केलेलं भिम अॅप कसं वापरणार?
बँकेचे व्यवहार अधिक सुलभ करण्यासाठी हे अॅप तयार करण्यात आलं असून नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने हे अॅप तयार केलं आहे. दरम्यान या अॅपची नवीन अपडेट जारी केल्यानंतर व्यवहार सुरळीत होत आहेत. अनेक युझर्सनी या अॅपविषयी चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काहींनी अडचण येत असल्याचं म्हटलं आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement