![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Best Selling Car : हुंडाई क्रेटाला मागे टाकत Maruti Suzukiची ही कार ठरली अव्वल, जूनमध्ये सर्वाधिक विक्री
Hyundai Creta नं मे महिन्यात Maruti Suzuki च्या ऑल्टो, स्विफ्टसह सर्व गाड्यांना मागे टाकत बेस्ट सेलिंग कारचा किताब जिंकला होता, आता पुन्हा एकदा मारुतीनं हुंडाईला मागे टाकत अव्वल स्थान पटकावलं आहे.
![Best Selling Car : हुंडाई क्रेटाला मागे टाकत Maruti Suzukiची ही कार ठरली अव्वल, जूनमध्ये सर्वाधिक विक्री Best Selling Car maruti suzuki wagon r became the best selling car of the country left behind hyundai creta Best Selling Car : हुंडाई क्रेटाला मागे टाकत Maruti Suzukiची ही कार ठरली अव्वल, जूनमध्ये सर्वाधिक विक्री](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/07/04/29c1a38b0e52781f62322f0d3f942e88_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी Maruti Suzuki ने पुन्हा एकदा नंबर वनचा किताब मिळवला आहे. कंपनीची मारुती सुझुकी वॅगनर देशात सर्वात जास्त विकणारी कार बनली आहे. जिथे गेल्या महिन्यात Hyundai Creta पहिल्या क्रमांक पटकावला होता, त्यानंतर Wagon R ने क्रेटाला मागे टाकत पुन्हा एकदा अव्वल क्रमांक पटकावला आहे. क्रेटानं मारुतीचा अव्वल नंबर हिसकावून घेतला होता, अशातच पुन्हा एकदा विक्रमी विक्रीसह Maruti Suzuki च्या Wagon R ने देशात सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या गाडीचा क्रमांक पटकावला आहे.
इतक्या युनिट्सची विक्री
मारुती सुझुकीच्या Wagon R ने जून 2021 मध्ये देशात 19,44 युनिट्सची विक्री करण्यात आली. जून महिन्याच्या तुलनेत गेल्या महिन्यात Wagon R च्या विक्रीत 179 टक्क्यांनी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. खास गोष्ट म्हणजे, Wagon R ने मारुतीची बेस्ट सेलिंग कार स्विफ्टलाही मागे टाकल आहे. स्विफ्टने गेल्या महिन्यात 17,727 युनिट्सची विक्री केली.
जून महिन्यात मारुतीची विक्रमी विक्री
जून महिन्यात मारुती सुझुकीनं एकूण 147,388 युनिट्सची विक्री केली आहे. मे महिन्यात कंपनीने 57,228 युनिट्सची विक्री केली होती. गेल्या महिन्यात सर्वाधिक विक्री झालेल्या दहा गाड्यांच्या यादीत आठ गाड्या मारुतीच्याच आहे. याव्यतिरिक्त Hynudai Creta आणि Grand i10 Nios या गाड्यांचाही या यादीत समावेश आहे.
Hyundai Creta ला टाकलं मागे
Hyundai Cretaने मारुती सुझुकीला नंबर एक वरुन हटवलं होतं. क्रेटानं मारुती सुझुकी ऑल्टो, मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर, मारुती सुझुकी स्विफ्ट, मारुती सुझुकी वॅगनर यांसारख्या सर्वाधिक विकण्यात येणाऱ्या गाड्यांना मागे टाकलं होतं. अशातच आता मारुती सुझुकीनं पुन्हा एकदा वापसी करत नंबर एकचा किताब पटकावला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Cheapest 7 Seater Cars: सर्वात स्वस्त 7 सीटर फॅमिली कार; वाचा किंमत आणि फीचर्स
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)