Apple Watch Series 8 लॉन्च, मिळणार हे जबरदस्त फीचर्स
Apple Watch Series 8 : अॅपलचा इव्हेंट सुरू झाला आहे. कंपनीचे सीईओ टिम कुक हा इव्हेंट होस्ट करत असून त्यांनी Apple Watch Series 8 लॉन्च झाल्याची घोषणा केली आहे.
Apple Watch Series 8 : अॅपलचा इव्हेंट सुरू झाला आहे. कंपनीचे सीईओ टिम कुक हा इव्हेंट होस्ट करत असून त्यांनी Apple Watch Series 8 लॉन्च झाल्याची घोषणा केली आहे. ही Watch जबरदस्त सेफ्टी आणि हेल्थ फीचर्सने सुसज्ज आहे. सीरीज 8 मध्ये दोन तापमान सेन्सर, ओव्हेलेशन ट्रॅक, इतर फिटनेस आणि आरोग्य केंद्रित फीचर्स देण्यात आले. यातील एक विशेष म्हणजे अपघात झाल्यास ही वॉच आपत्कालीन सेवेशी संपर्क साधू शकते. यासाठी यात क्रॅश डिटेक्शन सेंन्सर देण्यात आले आहे.
60 तास टिकेल इतकी बॅटरी क्षमता
Apple Watch Series 8 ला 60 तासांची बॅटरी लाइफ मिळेल. यामध्ये लो पॉवर मोड देखील दिला जात आहे. जो पूर्ण चार्ज केल्यावर 36 तासांची बॅटरी देण्यास सक्षम आहे. Apple Watch Series 8 मिडनाईट स्टारलाइट, सिल्व्हर आणि प्रॉडक्ट रेड कलर पर्यायांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. Apple Watch Series 8 मध्ये मोठी स्क्रीन दिली आहे. पण याची डिझाइन बेसिक ठेवण्यात आली आहे. यामध्ये यूजर्सना नवीन वॉच फेस आणि ब्राइट स्क्रीन मिळेल.
किंमत
Apple Watch Series 8 च्या GPS व्हर्जनची किंमत 399 डॉलर्स आणि सेल्युलर व्हर्जनची 499 डॉलर्स पासून सुरू होईल. ग्राहकांसाठी आजपासून हे नवीन घड्याळ प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध असेल. मात्र याची विक्री 16 सप्टेंबरपासून सुरू होईल.
Apple AirPods लॉन्च
ॲपल वॉचनंतर टिम कुकने Apple AirPods लॉन्च केले आहे. याच्या डिझाइनमध्ये विशेष बदल झालेला नाही. Apple AirPods Pro देखील जुन्या एअरपॉड्स सारखेच आहेत. टिम कुक म्हणाले की, AirPods आणि AirPods Pro बाजारात सर्वात लोकप्रिय इयरबड बनले आहेत. यावेळी ॲपलने चांगल्या ऑडिओ परफॉर्मन्ससाठी यामध्ये H2 चिप दिली आहे. AirPod Pro मध्ये यावेळी एकूण 30 तासांची बॅटरी लाइफ उपलब्ध असेल. तर केसशिवाय ग्राहकांना 6 तासांचा बॅकअप मिळेल, असं कंपनीचं म्हणणं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Apple iPhone 14 Launch: प्रतीक्षा संपली! iPhone 14 अखेर लॉन्च; जगातील सर्वात फास्ट फोन, कंपनीचा दावा
iPhone without charger : चार्जरशिवाय आयफोन विकण्यावर ॲपलला ‘या’ देशात बंदी, 20 कोटींचा दंड