एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
स्मार्टफोनच्या दुनियेत अॅपलचा धमाका, ट्रिपल कॅमेऱ्यासह iPhone 11 Pro लाँच
या फोनच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेट अप देण्यात आला आहे. यामध्ये सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये A13 Bionic प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे.
अमेरिकेत झालेल्या अॅपलच्या दिमाखदार सोहळ्यात आज iPhone 11, iPhone 11 प्रो आणि आयफोन 11 प्रो मॅक्स लाँच करण्यात आला आहे. ट्रिपल कॅमेरा असलेल्या आयफोन 11 प्रो आणि ड्युअल कॅमेरा असलेल्या आयफोन 11 मध्ये अनेक नव्या फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. या स्मार्टफोनसह 7th Gen Ipad आणि Apple Watch Series 5 देखील लाँच करण्यात आली आहे.
iPhone 11 Pro
या फोनची डिजाईन आयफोनच्या पारंपारिक डिजाईनपेक्षा वेगळी देण्यात आली आहे. या फोनच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेट अप देण्यात आला आहे. यामध्ये सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये A13 Bionic प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. यापूर्वी लाँच करण्यात आलेल्या आयफोन xs पेक्षा या फोनची बॅटरी 4 तास अधिक चालेल असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.
याफोनमध्ये वापरण्यात आलेल्या ट्रिपल कॅमेरामुळे अतिशय चांगल्या दर्जाचे फोटो काढता येणार आहेत. यामध्ये 12 मेगापिक्सलचे तीन कॅमेरे वापरण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या फोनचा वापर करुन वाईड अँगल फोटो काढता येणार आहे. ट्रिपल कॅमेरामुळे फोटोची क्वालिटी आणि कलरचा दर्जा चांगला मिळणार आहे.
या फोनची किंमत 72 हजार रुपयांपासून सुरु होणार आहे.
iPhone 11
या फोनच्या मागील बाजूस दोन कॅमेरा देण्यात आले आहेत. 6 वेगवेगळ्या रंगात हा फोन उपलब्ध होणार आहे. 6.1 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये डॉल्बी अॅटमॉसचा सपोर्ट देखील देण्यात आला आहे.
12 मेगापिक्सलचा वाईड आणि अल्ट्रा वाईड कॅमेरा देण्यात आला आहे. त्यामुळे अल्ट्रा वाईड अँगलचे फोटो काढता येणार आहे. यामध्ये नाईट मोड देखील देण्यात आला आहे. कमी प्रकाशात यामध्ये अतिशय चांगल्या दर्जाचे फोटो मिळण्याचा दावा कंपनीने केला आहे. तसेच 12 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे फ्रंट कॅमेराद्वारे स्लो मोशन व्हिडीओ रेकॉर्ड करता येणार आहे.
आयफोन 11 ची किंमत 50 हजार रुपयांपासून सुरु होईल.
7th Gen Ipad
अॅपलच्या या सोहळ्यात 7th Gen Ipad लाँच करण्यात आला आहे. या आयपॅडमध्ये 10.2 इंचाचा रेटिना डिस्प्ले देण्यात आला आहे. या नव्या आयपॅडमध्ये पहिल्यांदा IpadOS चा वापर करण्यात आला आहे. या आयपॅडमध्ये खास स्मार्ट कनेक्टरची सुविधा देण्यात आली आहे.
या नव्या आयपॅडची किंमत 24 हजार रुपयांपासून सुरु होणार आहे. विशेष म्हणजे आजपासून हा आयपॅड ऑर्डर करता येणार आहे. याची विक्री 30 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे.
Apple Watch Series 5
अॅपल वॉच सिरीज 5 लाँच करण्यात आली आहे. या वॉचचे वैशिष्ट म्हणजे यामध्ये 'अल्वेज ऑन डिस्प्ले' देण्यात आला आहे. यामुळे त्यावरील वेळ आणि इतर माहिती नेहमी दिसत राहणार आहे. या वॉचचा डिस्प्ले सतत सुरु असला तरी देखील याची बॅटरी मात्र दिवसभर टिकेल असा दावा कंपनीकडून करण्यात येत आहे.
या नव्या अॅपल वॉचमध्ये बिल्ट इन कम्पास, कम्पास अॅप, फॉल डिटेक्शन फिचर, आपात्कालीन मदत सेवा, आंतरराष्ट्रीय आपात्कालीन कॉल सेवा असे अनेक महत्त्वाचे फिचर्स देण्यात आले आहेत.
या वॉचची किंमत 29 हजार रुपयांपासून सुरु होणार आहे. तर या वॉचच्या सेल्युलर मॉडेलची किंमत 36 हजार रुपयांपासून पुढे असणार आहे. विशेष म्हणजे आजपासून या नव्या वॉचची बुकींग करता येणार आहे. तर याची विक्री 20 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे.
यासोबतच अॅपल वॉच सिरीज 3 देखील आता ग्राहकांना 15 हजार रुपयांना मिळणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement