एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आयफोन 7 च्या 'रेड' लिमिटेड एडिशनचं आजपासून बुकिंग
मुंबई : अॅपलच्या आयफोन रेडच्या प्री बुकिंगला आजपासून सुरुवात होणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री साडेआठ वाजल्यापासून ग्राहकांना या फोनचं बुकिंग करता येणार आहे. मात्र भारतीय ग्राहकांना हा फोन हातात पडण्यासाठी एप्रिलपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
अॅपलने आपल्या आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लस या दोन हॅण्डसेटना लाल रंगात सादर केलं केलं आहे. अॅपल आयफोन 7 ची लिमिटेड एडिशन आजपासून बुकिंगसाठी उपलब्ध होणार आहे. यापासून मिळणारा फायदा रेड नावाच्या संस्थेला देण्यात येणार आहे. रेड ही संस्था एड्सवरील उपचारावर संशोधन करण्याचं काम करते.
आयफोन 7 आणि 7 प्लस लाल रंगातील 128 जीबी आणि 256 जीबी मॉडेल उपलब्ध असेल. सध्या हा फोन अॅपलच्या वेबसाईटवर 749 डॉलरमध्ये उपलब्ध आहे. या नव्याची स्मार्टफोन विक्री अमेरिकेसह 40 देशात आज 24 मार्चपासून सुरु होणार आहे.
हा फोन अॅपल आणि REDच्या भागीदारीतील सर्वात मोठं प्रोडक्ट असल्याचं बोललं जात आहे. आयफोन 7 मध्ये 4.7 इंच डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यामध्ये 1920 x 1080 पिक्सल रिझॉल्यूशन आहे.
नव्या आयफोन जनरेशनसोबत अॅपलनं नव्या प्रोसेसर चिप A10 फ्यूजनचा वापर केला आहे. अॅपलचा दावा आहे की, A10 फ्यूजन आतापर्यंतचा सर्वात चांगला प्रोसेसर आहे. यामध्ये 7 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा अणार आहे. तर 12 मेगापिक्सल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शेत-शिवार
मुंबई
निवडणूक
करमणूक
Advertisement