एक्स्प्लोर
अॅपलचा दिमाखदार वार्षिक सोहळा उद्या, iPhone 11 सोबत इतर नवे अॅपल प्रॉडक्ट्स लाँच होण्याची शक्यता
0 सप्टेंबरला अमेरिकेत होणाऱ्या अॅपलच्या वार्षिक इव्हेंटमध्ये आयफोन 11 लाँच करण्यात येणार आहे, असा अंदाज गेल्या कित्येक दिवसांपासून वर्तवला जात आहे.
टेक्नॉलॉजी क्षेत्रात महत्त्वाचा मानला जाणारा अॅपलचा वार्षिक इव्हेंट उद्या अमेरिकेत होणार आहे. या इव्हेंटमध्ये iPhone 11 सोबतच अॅपलचे इतर नवे प्रॉडक्ट्सही लाँच होण्याची शक्यता आहे. याच कार्यक्रमात iOS 13 देखील लाँच करण्यात येण्याची शक्यता आहे. तर त्यासोबत अॅपलच्या एअरपॉड्सचं नवीन व्हर्जन असलेले AirPods 3 याची सुद्धा घोषणा होण्याची शक्यता आहे.
10 सप्टेंबरला अमेरिकेत होणाऱ्या अॅपलच्या वार्षिक इव्हेंटमध्ये आयफोन 11 लाँच करण्यात येणार आहे, असा अंदाज गेल्या कित्येक दिवसांपासून वर्तवला जात आहे. उद्या लाँच करण्यात आल्यानंतर हा नवा आयफोन 13 सप्टेंबरपासून प्री-ऑर्डरसाठी तर 20 तारखेपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल, असं देखील बोललं जात आहे. भारतामध्ये मात्र हा फोन मिळण्यासाठी काही आठवडे वाट पाहावी लागणार आहे.
आयफोन 11 सोबतच आयफोन 11 प्रो आणि आयफोन 11 मॅक्स अशी आणखी दोन मॉडेल्स लाँच केली जाण्याची शक्यता आहे. यापैकी आयफोन 11 मध्ये मागच्या बाजूला ड्यूअल कॅमेरा सेटअप असेल तर इतर दोन मॉडेल्समध्ये ट्रिपल कॅमेरा असेल, असा अंदाज आहे.
या मोबाईलच्या लाँचिंगपूर्वीच सध्या ऑनलाइन विश्वात फोनच्या फिचर्स आणि किंमतीबद्दल अनेक अंदाज लावले जात असल्याचं पाहायला मिळत आहे. iPhone 11 च्या डिजाईनमध्ये मोठा बदल केला जाणार असल्याचं बोललं जात आहे. या फोनच्या मागच्या बाजूला तीन कॅमेरा देण्यात येणार असल्याची सध्या चर्चा आहे. फोनच्या मॉडेलची काही छायाचित्रे देखील इंटरनेटवर लीक झाली आहेत. त्यावरुन या फोनच्या मागच्या बाजूला स्क्वेअर सेटअपमध्ये तीन कॅमेरे देण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. अॅपलच्या पारंपारिक डिजाईनपेक्षा हे डिजाईन अतिशय वेगळं आहे मात्र कंपनीकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
iPhone 11 ची काय असणार खास वैशिष्ट्ये?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
महाराष्ट्र
जळगाव
Advertisement