(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chrome and Edge Scam Alert : सावधान! गुगल क्रोम आणि मायक्रोसॉफ्ट एज ब्राउझर अपडेट करू नका, व्हायरस येऊ शकतो
Chrome and Edge Scam Alert : गुगल क्रोम आणि मायक्रोसॉफ्ट एजवर अपडेटशी संबंधित कोणताही मेसेज येत असेल तर अपडेट करणं टाळा. कारण ब्राऊझर अपडेट केल्याने सिस्टीममध्ये “मॅग्निबर रॅन्समवेअर”येऊ शकते.
Browser Scam : तुम्ही गुगल क्रोम ब्राउझर (Google Chrome Browser)आणि मायक्रोसॉफ्ट एज (Microsoft Edge browser) वापरत असाल तर या माहितीकडे दुर्लक्ष करू नका. ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे. गेल्या काही दिवसांपासून गुगल क्रोम आणि मायक्रोसॉफ्ट एजवर एक स्कॅम (scam) सुरू आहे. या स्कॅममुळे तुमचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळीच सावध राहा. खोटी माहिती पसरवून अपडेट करण्याच्या नावाखाली सायबर गुन्हेगार हा स्कॅम करत आहेत. त्यांनी सांगितल्यानुसार तुमचे ब्राऊझर अपडेट होताच, डिव्हाइसमध्ये एक रॅन्समवेअर होतो. यानंतर तुमच्या डेटाचा गैरवापर सुरू होतो. म्हणूनच क्रोम आणि एज अपडेट करण्यासाठी येणाऱ्या मेसेजकडे दुर्लक्ष करा.
यासाठी अपडेट करणे धोकादायक आहे
रिपोर्टनुसार, अशा अनेक तक्रारी आल्या आहेत ज्यामध्ये Google Chrome आणि Microsoft Edge वर अपडेट केल्यानंतर सिस्टममध्ये Magniber Ransomware आले होते. यानंतर हॅकर्सनी डेटा चोरून ब्लॅकमेलिंगही सुरू केले. एक्सपर्टचे असे म्हणणे आहे की, जेव्हा मॅग्निबार रॅन्समवेअर तुमच्या सिस्टममध्ये अपडेट होतो. तेव्हा, ते बॅकग्राउंडमध्ये अॅक्टीव्ह होते आणि तुमच्या सिस्टम किंवा डिव्हाइसमध्ये असलेल्या सर्व फाईल्सचे एन्क्रिप्शन बनवण्यास सुरुवात करते. यानंतर तुम्ही तुमच्या लॅपटॉप, कॉम्प्युटर किंवा मोबाईलवर कोणतीही फाईल ओपन शकत नाही. यातून अनेक हॅकर्सचा याचा गैरवापर करू लागतात. तसेच तुम्हाला ब्लॅकमेलही करतात.
Magnibar Ransomware म्हणजे नेमकं काय?
मॅग्निबर हे अतिशय धोकादायक रॅन्समवेअर आहे. हे ब्राउझिंग करताना इतर मालवेअर देखील डाउनलोड करते. तुम्ही Google Chrome किंवा Microsoft Edge वर अपडेट पर्याय निवडताच, .appx टाइप सारखे ब्राउझर एक्सटेंशन तुमच्या डिव्हाईसमध्ये डाऊनलोड होतो. यामुळे तुमच्या डेटाचे नुकसान होऊ शकते.
स्वतःला असे सुरक्षित ठेवा
सध्या, Google Chrome Browser किंवा Microsoft Edge browser अपडेट करू नका.
सॉफ्टवेअर अपडेट करण्याची गरज नसते ते स्वतःच अपडेट होतात.
तुमच्या डेटाचा वेळोवेळी बॅकअप घेत राहा. जेणेकरून तुमचा डेटा हॅक होणार नाही.
सायबर गुन्हेगार तुमचा डेटा ऍक्सेस करतात आणि तो परत करण्याच्या नावाखाली पैसे मागून तुम्हाला ब्लॅकमेल करतात. पैसे देण्यास नकार दिल्याने डेटा डिलीट करण्याची धमकी देतात. जर तुमच्याकडे डेटा बॅकअप असेल तर तुम्हाला डेटा गमावण्याची भीती नाही.
तुमच्या सिस्टममध्ये चांगला अँटीव्हायरस ठेवा आणि वेळोवेळी अपडेट करत रहा.
महत्वाच्या बातम्या :
- Skoda Kodiaq : नऊ एअरबॅग्ज असलेली स्कोडाची नवी कार, पाहा किंमत आणि भन्नाट फिचर्स
- ई-मोबिलिटीची 'वान' (VAAN) इलेक्ट्रिक मोटो बाईक भारतात लॉन्च
- Skoda Slavia : लवकरच येणार स्कोडा स्लाव्हिया, पुण्यात प्रोडक्शनला सुरुवात; 'ही' आहे खासियत
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha