एक्स्प्लोर

Kagal Nagar Parishad: कोल्हापूरच्या राजकीय विद्यापीठात अवघ्या 24 तासात राजकीय भूकंप; कागलला कट्टर वैरी एकत्र, नेमका फाॅर्म्युला ठरला तरी काय?

Kagal Nagar Parishad: विशेष म्हणजे अवघ्या 24 तासांपूर्वी कागलमध्ये हसन मुश्रीफ यांच्याविरोधात समरजित घाटगे आणि संजय मंडलिक एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली होती.

Kagal Nagar Parishad: कागलमध्ये सत्तेचा पट अक्षरशः उलथापालथ करणारा राजकीय भूकंप अवघ्या 24 तासांमध्ये झाला आहे. चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र आल्याच्या पार्श्वभूमीवर, आता कागलमध्येही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे समरजित घाटगे हे कट्टर प्रतिस्पर्धी एकाच छताखाली आले आहेत. विधानसभा निवडणुकीत आमनेसामने भिडणारे हे दोन गट कागल नगरपरिषदेला हातात हात घालून प्रचार करणार आहेत. यामुळे “धक्का कोणाला अन् आनंद कोणाला?” हा प्रश्न स्थानिक राजकारणात चर्चेचा विषय झाला आहे. विशेष म्हणजे अवघ्या 24 तासांपूर्वी कागलमध्ये हसन मुश्रीफ यांच्याविरोधात समरजित घाटगे आणि संजय मंडलिक एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली होती. तोपर्यंत पडद्यामागून सूत्र हलवत पुन्हा एकदा हसन मुश्रीफ यांनी चकवा दिला आहे. चंदगडला भाजपला दूर सारल्यानंतर आता कागलमध्येही त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र केल्या आहेत.

संजय घाटगे आणि संजय मंडलिक एकत्र येणार?

कागलच्या सत्ता समीकरणात एवढ्यावरच थांबायची चिन्हे नाहीत. मुश्रीफ–घाटगे युतीसोबत संजय घाटगे आणि संजय मंडलिक यांच्या एकत्र येण्याचीही चांगलीच चर्चा सुरू आहे. दुसरीकडे मुरगुडमध्ये प्रवीणसिंह पाटील भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांच्या पत्नी सुहासिनी पाटील शिवसेना शिंदे गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात उतरल्या आहेत. तेथे झालेली तडजोड आता कागलमधील समीकरणांवरही परिणाम करताना दिसत आहे.

कागलमध्येही बिनविरोध नगराध्यक्ष?

एकीकडे चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी गट एकवटले असून भाजपला विरोधात उभे केले आहे; तर मुरगुडमध्ये मंडलिक गटाला नगराध्यक्ष पद देत समझोता साधला गेला आहे. त्यामुळे कागलमध्येही “बिनविरोध नगराध्यक्ष” हा फॉर्म्युला आकार घेताना दिसत आहे. कागल नगरपरिषदेसाठीच्या 23 पैकी 12 जागा मुश्रीफ गटाला मिळत असल्याची चर्चा असून बाकीच्या 11 जागा इतर गटांत वाटल्या जाणार आहेत. जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला तयार  करण्यात आला आहे.

  • समरजीत घाटगे गट – 8 जागा
  • संजय घाटगे गट – 2 जागा
  • मंडलिक गट – 1 जागा

या सगळ्या नाट्यमय घडामोडींच्या सर्वाधिक चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे नगराध्यक्ष पदाचा अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला. पहिला कार्यकाळ म्हणजे पहिले अडीच वर्षे मुश्रीफ गटाकडे जाण्याची दाट शक्यता आहे. परंतु या राजकीय गणितात शिंदे गट म्हणजेच मंडलिक गट काय भूमिका घेणार? त्यांनी पत्ता उलटा टाकला, तर सगळे समीकरण क्षणात बदलू शकते; आणि त्यांनी तडजोड केली, तर कागलमध्ये बिनविरोध नगराध्यक्ष निवडीचा “इतिहास” घडेल, अशी चिन्हे आहेत. एकूणात, कागल राजकारणात पुढील काही दिवसांमध्ये मोठा भूकंप होणार, हे आता निश्चित झाले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये. गेल्या सहा वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.    
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News: सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NHAI Toll Pass: 'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
Udgir Crime News : तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तीन दिवसाच्या तपासानंतर प्रकार उघड
उदगीरमध्ये तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तपासानंतर प्रकार उघड
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
Jaggery Price Hike : साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
Embed widget