एक्स्प्लोर

Hasan Mushrif: युती अचानक का झाली? कार्यकर्त्यांना न विचारता निर्णय का घ्यावा लागला, ईडी आरोपांचे काय? मुश्रीफ काय काय म्हणाले?

राष्ट्रवादी काँग्रेस आणि छत्रपती शाहू आघाडीची कागल नगरपालिकेत झालेली अनपेक्षित युती ही गैरसमज, दबाव आणि संघर्षाच्या वातावरणातून बाहेर पडण्यासाठीची पावले असल्याचे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

Hasan Mushrif: कागलमध्ये अनपेक्षित राजकीय पलटीनंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्वतः खुलासा करत “ईडीचा संभ्रम दूर झाला, त्यामुळेच आघाडी शक्य झाली,” असा थेट उल्लेख करून नवी राजकीय खळबळ उडवली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि छत्रपती शाहू आघाडीची कागल नगरपालिकेत झालेली अनपेक्षित युती ही गैरसमज, दबाव आणि संघर्षाच्या वातावरणातून बाहेर पडण्यासाठीची पावले असल्याचे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. त्यांनी स्पष्ट केले की उद्या 18 डिसेंबर रोजी मटकरी हॉलमध्ये ते आणि समरजितसिंह घाटगे संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पुढील दिशा जाहीर करणार आहेत. “आता आपली जबाबदारी एकच राष्ट्रवादी आणि छत्रपती शाहू आघाडीचे उमेदवार प्रचंड मतांनी विजयी करणे. बाकी मन मोकळं पत्रकार परिषदेतच करीन.”

स्वत:च्या, संजयबाबांच्या कार्यकर्त्यांशीही चर्चा नाही

मुश्रीफ यांनी प्रसिध्दीपत्रकातून स्वीकारले की ही युती इतक्या अचानक झाली की स्वतःच्या कार्यकर्त्यांपासून ते मित्र मानल्या जाणाऱ्या माजी आमदार संजयबाबा घाटगे यांच्या कार्यकर्त्यांशीही चर्चा होऊ शकली नाही. “यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो,” असे ते स्पष्टपणे म्हणाले. परंतु या आघाडीच्या मूळ कारणांबाबत मुश्रीफ यांनी केलेला सर्वात ठळक आणि लक्षवेधी उल्लेख म्हणजे ‘ईडीच्या भीतीचा काहीसा संभ्रम कार्यकर्त्यांमध्ये होता, पण चर्चा केल्यानंतर तो दूर झाला’.  मुश्रीफ म्हणाले की, ही आघाडी कुठल्याही वैयक्तिक स्वार्थासाठी नाही, तर कागल शहर–तालुका विकासासाठी, निरर्थक संघर्ष संपवण्यासाठी आणि जनतेला जास्तीत जास्त देण्यासाठी करण्यात आली आहे. तसेच समरजितसिंह घाटगे यांच्यासोबतची ही नवीन जोडी केवळ राजकारणासाठी नव्हे, तर भविष्यातील स्थैर्यासाठी असल्याचेही त्यांनी सूचित केले.

ही आघाडी कोणाचाही विश्वासघात करणार नाही

इतकेच नव्हे तर, कागलमध्ये अशी राजकीय पुनरावृत्ती पहिल्यांदाच होत नसून, शामराव भिवाजी पाटील, सदाशिवराव मंडलिक, विक्रमसिंहराजे घाटगे यांच्यापासून ते स्वतः आणि संजयबाबा घाटगे यांनीही पूर्वी अशाच टोकाच्या संघर्षानंतर तालुक्याच्या हितासाठी हातमिळवणी केल्याची आठवण त्यांनी करून दिली. युती अचानक का झाली? कार्यकर्त्यांना न विचारता निर्णय का घ्यावा लागला? या प्रश्नांवर पडदा टाकत मुश्रीफ यांनी आश्वासन दिले की, “ही आघाडी कोणाचाही विश्वासघात करणार नाही. उलट कार्यकर्त्यांना जादा दिलासा मिळेल, यासाठी मी स्वतः शिर्षस्थ नेतृत्वाशी बोलणार आहे.”

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
कोल्हापूर हादरलं! MD ड्रग्स निर्मितीचा गोरखधंदा उघड, तब्बल 100 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त, कारवाईनं खळबळ  
कोल्हापूर हादरलं! MD ड्रग्स निर्मितीचा गोरखधंदा उघड, तब्बल 100 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त, कारवाईनं खळबळ  
Kolhapur News: सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
Embed widget