(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Amazon Discount Offers: अमेझॉनवर ओप्पो, शाओमी आणि सॅमसंगच्या बजेट स्मार्टफोनवर जबरदस्त ऑफर
Amazon Discount Offers: या दिवाळीला नवीन स्मार्टफोन (Smartphones) खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर, अॅमेझॉनवर (Amazon) सुरु असलेला फेस्टिवल सेल तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.
Amazon Discount Offers: या दिवाळीला नवीन स्मार्टफोन (Smartphones) खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर, अॅमेझॉनवर (Amazon) सुरु असलेला फेस्टिव्हल सेल तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. अमेझॉन इंडियाने 'बजट बाजार स्टोर'ची (Amazon Budget Bazaar Store) घोषणा केली आहे. अॅमेझॉन ग्रेट इंडिया फेस्टिवल दरम्यान ग्राहकांना स्मार्टफोनवर सर्वोत्तम ऑफर आणि सूट मिळू शकते. या सेलमध्ये ओप्पो (Oppo), शाओमी (Xiaomi) आणि सॅमसंगच्या (Samsung) बजेट स्मार्टफोनवर जबरदस्त ऑफर देण्यात आली आहे. या स्मार्टफोनवर असलेल्या ऑफर बाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
Oppo A31
या फेस्टिवल सेलमध्ये बजेट स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर, अॅमेझॉनवर ओप्पो ए 31 स्मार्टफोन खरेदी करू शकतात. या स्मार्टफोनमध्ये कमी किंमतीत चांगले फिचर्स देण्यात आले आहेत. ओप्पो ए 31 स्मार्टफोनमध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. याशिवाय, या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचचा डिस्प्ले मिळत आहे. स्मार्टफोनमध्ये 12 + 2 + 2 MP का रियर कॅमेरा सेटअप आणि 8 MP चे फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच या स्मार्टफोन 4 हजार 230 एमएएच असलेली बॅटरीचा समावेश करण्यता आला आहे. या स्मार्टफोनची किंमत 11 हजार 490 इतकी आहे. या स्मार्टफोनच्या खरेदीवर नो कॉस्ट इएमआय आणि एक्स्चेंज ऑफर मिळत आहे.
Xiaomi Redmi 9A
रेडमी 9 ए हा शाओमी कंपनीचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनची किंमत केवळ 6 हजार 799 रुपये इतकी आहे. 6.53 इंच डिस्प्ले असलेल्या या स्मार्टफोमध्ये 2 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. या स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनची साध्या पद्धतीने डिझाईन करण्यात आले आहे, जे ग्राहकांना नक्की आवडेल. अमेझॉनवर या फोनच्या खरेदीवर इएमआय आणि एक्स्जेंज ऑफर देण्यात येत आहे.
Samsung Galaxy M12
जर तुम्ही सॅमसंग कंपनीचा बजेट स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करीत आहात, मग सॅमसंग गॅलेक्सी एम 12 हा चांगला पर्याय ठरू शकतो. या स्मार्टफोनमध्ये चांगले फिचर्स देण्यात आले आहेत. या 6.5 इंचाचा डिस्प्ले असलेल्या या स्मार्टफोनमध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज आणि 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज का पर्याय मिळत आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने या स्मार्टफोनचे 1 टीबी पर्यंत स्टोरेज वाढवण्यात येऊ शकते. या स्मार्टफोनमध्ये 48MP + 5MP + 2MP + 2MP आहे. फोनची किंमत 9,499 रुपये आहे. अॅमेझॉनच्या या फोनची खरेदीवर ईएमआय आणि एक्सचेंज ऑफर्स दिली जात आहे.
संबंधित बातम्या-