एक्स्प्लोर

अ‍ॅमेझॉनला मोठा झटका! CCIकडून मोठी डील रद्द; 202 कोटींचा दंड ठोठावला

Amazon : CCI ने अ‍ॅमेझॉनला मोठा झटका दिला आहे. अ‍ॅमेझॉनवर खोटी विधाने केल्याचा ठपका ठेवत 202 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

Amazon : भारतीय स्पर्धा आयोगाने (CCI) ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनला (Amazon) मोठा दणका दिला आहे. नियमांचे उल्लंघन आणि खोटी विधाने केल्याचा ठपका ठेवत अ‍ॅमेझॉनला 202 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. CCIने अ‍ॅमेझॉन फ्यूचर कूपन्ससोबतच्या (Amazon Future Coupons) करारासाठी संमती रद्द केली आहे. त्याशिवाय दंडही ठोठावला आहे. नोव्हेंबर 2019 मध्ये, भारतीय स्पर्धा आयोगाने अ‍ॅमेझॉनला फ्युचर कूपनमधील 49 टक्के भाग खरेदी करण्याची परवानगी दिली होती. मात्र आता सीसीआयने आपला निर्णय मागे घेत परवानगी तूर्तास स्थगित राहणार असल्याचे सांगितले आहे.

सीसीआयने आपल्या आदेशात म्हटले आहे की, आता या कराराचे पुनर्मूल्यांकन करणे आवश्यक आहे. सीसीआयने 57 पानांचा आदेश जारी करून अ‍ॅमेझॉनने चुकीची आणि खोटी विधाने केल्याचे म्हटले आहे. यापूर्वी 16 नोव्हेंबर रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने CCI ला अ‍ॅमेझॉन फ्यूचर कूपन्स डील प्रकरणात दिलेली मान्यता रद्द करण्यास सांगितले होते.

CCI च्या निर्णयावर CAIT नेही याचिका दाखल केली होती
यासाठी CCI ला दोन आठवड्यांचा कालावधी देण्यात आला होता. याआधी, CAIT ने CCI विरुद्ध जनहित याचिका देखील दाखल केली होती, त्यात असे म्हटले होते की, त्यांनी अ‍ॅमेझॉन कंपनीला जून महिन्यामध्येच कारणे दाखवा नोटीस जारी केली होती, परंतु अद्याप त्यावर कोणताही उत्तर देण्यात आलेले नाही.

काय आहे प्रकरण?
फ्युचर रिटेल लिमिटेडच्या (Future Retail Limited) स्वतंत्र संचालकांनी नुकतीच CCI कडे याचिका दाखल केली होती. त्यात म्हटले आहे की, CCI ने 2019 मध्ये फ्युचर कूपनमधील गुंतवणुकीसाठी अ‍ॅमेझॉनला दिलेली मान्यता रद्द करावी. CCIकडून परवानगी घेताना अ‍ॅमेझॉन कंपनीने चुकीची माहिती दिल्याचा आरोप त्यांनी केला होता. फ्युचर ग्रुपने रिलायन्स इंडस्ट्रीजला आपला रिटेल, वेअरहाऊसिंग आणि लॉजिस्टिक व्यवसाय सुमारे 24 हजार कोटी रुपयांना विकण्याचा करार केला होता. त्यावेळी म्हणजेच गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये अ‍ॅमेझॉन कंपनीने फ्यूचर रिटेलची प्रमोटर कंपनी फ्यूचर कूपन प्रायव्हेटमध्ये 49 टक्के भागभांडवल विकत घेतल्याचे सांगून करारामध्ये आक्षेप घेतला होता. अशा परिस्थितीत रिलायन्ससोबत (Reliance) करार करण्यापूर्वी फ्युचर ग्रुपने अ‍ॅमेझॉनची परवानगी घ्यायला हवी होती. अ‍ॅमेझॉन कंपनीला प्रथम नकार देण्याचा अधिकार आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget