एक्स्प्लोर
6GB रॅम आणि ड्युअल सेल्फी कॅमेरा, ओप्पोचा नवा फोन लाँच
या फोनचं 6GB रॅम व्हर्जन लाँच करण्यात आलं. ज्याची किंमत 22 हजार 990 रुपये आहे.
नवी दिल्ली : ओप्पो F3 प्लसचं 6GB रॅम व्हर्जन भारतात लाँच झालं आहे. फ्लिपकार्टवर हा फोन लाँच करण्यात आला. ओप्पो F3 प्लसच्या या 6GB रॅम व्हर्जनची किंमत 22 हजार 990 रुपये ठेवण्यात आली आहे. शिवाय कंपनीने या फोनसोबत लाँचिंग ऑफर्सही दिल्या आहेत.
ओप्पो F3 कंपनीने मार्च महिन्यात लाँच केला होता. त्यानंतर आता या फोनचं 6GB रॅम व्हर्जन लाँच करण्यात आलं. ज्याची किंमत 22 हजार 990 रुपये आहे. ड्युअल फ्रंट फेसिंग कॅमेरा या फोनचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. या फोनमध्ये 16 मेगापिक्सेल आणि 8 मेगापिक्सेल सेंसर देण्यात आला आहे.
हा फोन खरेदी करताना ग्राहकांना 3 हजार रुपयांपर्यंत एक्स्चेंज ऑफर मिळणार आहे. शिवाय तीन महिन्यांसाठी हॉटस्टारचं मोफत सबस्क्रिप्शन मिळेल. एचडीएफसी क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरुन फोन खरेदी केल्यास 5 टक्के कॅशबॅक मिळेल.
फीचर्स :
- 6 इंच आकाराची स्क्रीन
- 16 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 16 आणि 8 मेगापिक्सेल ड्युअल फ्रंट कॅमेरा
- 6GB रॅम, 64GB इंटर्नल स्टोरेज
- 4000 mAh क्षमतेची बॅटरी
- क्वालकॉम Snapdragon 653 प्रोसेसर
- फास्ट चार्जिंग
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement