5G Benefits : नवीन वर्षात 5G तंत्रज्ञान तुमचं आयुष्य कसं बदलेल? जाणून घ्या...
5G Benefits : नव्या वर्षात 5G तंत्रज्ञानामुळे इंटरनेटचा वेग 10 पटीने वाढणार असून शिक्षण, आरोग्य आणि गेमिंगसह अनेक क्षेत्रात क्रांतिकारी बदल होणार आहेत.
5G Benefits : मोबाईल नेटवर्कच्या क्षेत्रात 90 च्या दशकापासून, देश प्रत्येक दशकात तंत्रज्ञान क्षेत्रात नवी क्रांती झाल्याचं पाहायला मिळालं आहे. 90 च्या दशकात, 2G तंत्रज्ञान, त्यानंतर 3G नंतर 4G तंत्रज्ञानामुळे स्मार्टफोनला घराघरात पोहोचले. याचप्रमाणे आपण 2022 या नवीन वर्षात टेलिकॉम क्रांतीचे नवीन युगात पाहायला मिळणार आहे. कारण देशात 5G तंत्रज्ञान आल्यानंतर मोबाईल आणि इंटरनेट युजर्सचे जग पूर्णपणे बदलून जाईल.
एअरटेलची 5G तंत्रज्ञानाची चाचणी यशस्वी
भारत 5G तंत्रज्ञानाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलने (Bharti Airtel) प्रथमच हैदराबादमध्ये 5G नेटवर्कची यशस्वी चाचणी केली आहे. 5G तंत्रज्ञानाच्या चाचणीदरम्यान हैदराबादमध्ये 1 जीबी फाईल अवघ्या अवघ्या 30 सेकंदात डाऊनलोड झाली. अलीकडे, एअरटेलने नोकिया (Nokia) सोबत कोलकाता शहराबाहेर 700 MHz स्पेक्ट्रम बँडमध्ये पहिली 5G चाचणी यशस्वीपणे पार पाडली. भारतातील ग्रामीण भागात करण्यात आलेली ही पहिली 5G चाचणी होती. एअरटेलचा दावा आहे की भारतीय ग्राहकांना पुढील काही महिन्यांत 5G स्पीडचा अनुभव घेता येईल.
कोणत्या क्षेत्रांना होणार फायदा :
वर्क फ्रॉम होम : कोरोनाकाळात अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी घरून काम करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. 5G तंत्रज्ञान आल्यानंतर या सेवेचा विस्तार होईल.
टेलिहेल्थ : 5G च्या मदतीने रोगाचे निदान आणि उपचारात मोठी सुधारणा होईल. कृत्रिम तंत्रज्ञानाच्या आधारे रोबोटिक शस्त्रक्रिया करता येईल. 5G च्या आगमनाने टेलिमेडिसिनचा विस्तार होईल. ग्रामीण भागात व्हिडिओच्या माध्यमातून मोठमोठे डॉक्टर रुग्णांशी थेट संपर्क साधून त्यांच्यावर उपचार करू शकतील.
रिमोट कंट्रोल कार : 5G तंत्रज्ञान आल्यानंतर जिथे ड्रायव्हरलेस कार उपलब्ध होईल. तुम्हांला ड्रायव्हरलेस कारचा वापर करता येईल. तुम्हांला कोणत्याही ठिकाणी बसून चालकविरहित कार बुकही करता येईल.
स्मार्ट सिटी : 5G आल्यानंतर शहरे अधिक स्मार्ट होतील. 5G तंत्रज्ञान शहरातील वाहतूक नियंत्रित करण्यासाठी, शहरे स्वच्छ आणि सुरक्षित ठेवण्यासाठी उपयुक्त ठरेल.
क्लाउड-गेमिंग : Airtel ने 5G इंटरनेटवर देशातील पहिले क्लाउड-गेमिंग सत्र यशस्वीरित्या आयोजित केले आहे. क्लाउड गेमिंगचा. गेमर्सना यांचा खूप फायदा होईल. क्लाउड गेमिंगमुळे युजरला कोणत्याही गेमिंग हार्डवेअरमध्ये गुंतवणूक न करता रिअल-टाईममध्ये गेम खेळण्याचा आनंद घेता येईल.
मनोरंजन : 4G आल्यानंतर OTT प्लॅटफॉर्मचा जन्म कंटेंट प्रोवाईडर म्हणून झाला. लोक मल्टिप्लेक्स आणि सिनेमा हॉल सोडूनलोक घरी बसून OTT प्लॅटफॉर्मवर चित्रपटांपासून वेब सिरीज पाहू लागले. 5G आल्यानंतर फास्ट स्पीडमुळे मनोरंजन क्षेत्रात आणखी क्रांती होईल.
शिक्षण : कोरोनाच्या काळात शाळा, महाविद्यालये बंद होती. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाद्वारे शिक्षण मिळाले. 5G तंत्रज्ञानाच्या आगमनानंतर, विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या आणि सोप्या पद्धतीने शिक्षण दिले जाऊ शकते.
एअरटेलने 5G सेवा सुरू करण्यासाठी स्वतःला पूर्णपणे तयार केले आहे. इंटरनेट वापरकर्त्यांसाठी लवकरच 5G सेवा उपलब्ध होईल, त्यानंतर लोकांची जीवनशैली बदलेल.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Omicron Variant : ओमायक्रॉनला रोखण्यासाठी धारावी पॅटर्न पार्ट 2; असं आहे प्रशासनाचं नियोजन
- मल्याळम दिग्दर्शक अली अकबर यांच्याकडून इस्लाम धर्माचा त्याग, सांगितलं 'हे' कारण
- अंतराळातही भारतीय पदार्थांचा डंका, अंतराळावीरांची चमचमित भारतीय अन्नाला पसंती
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha