एक्स्प्लोर

2019 कावासाकी वर्सेस 1000 भारतात लॉन्च, किंमत...

2019 कावासाकी वर्सेस 1000 ही बाईक एकमा मोटर शोमध्ये पहिल्यांदा सादर करण्यात आली होती.

मुंबई : भारतीय ऑटोमोबाईल बाजारातही प्रीमियम आणि लक्झरी बाईकची मागणी सातत्याने वाढत आहे. त्यातच आता जपानची प्रमुख दुचाकी निर्माती कंपनी कावासाकीने भारतीय बाजारात आपली शानदार बाईक 2019 कावासाकी वर्सेस 1000 लॉन्च केली आहे. या बाईकची शोरुम किंमत दहा लाख 69 हजार निश्चित करण्यात आली आहे. कंपनीने बाईकची बुकिंग मागील वर्षी नोव्हेंबरपासूनच केली होती. या बाईकच्या बुकिंगसाठी दीड लाख रुपये टोकन म्हणून जमा करावा लागेल. 2019 कावासाकी वर्सेस 1000 ही बाईक एकमा मोटर शोमध्ये पहिल्यांदा सादर करण्यात आली होती. ही एक अॅडव्हेंचर टूअरर मोटरसायकल आहे. नवी बाईक पर्ल फ्लॅट स्टारडस्ट व्हाईट आणि मेटॅलिक फ्लॅट स्पार्क ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध आहे. या बाईकमध्ये 1043cc, इन-लाईन, 4-सिलेंडर इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 120hp पॉवर आणि 102Nm टॉर्क जनरेट करतं. यामध्ये काही कॉस्मेटिक बदलही करण्यात आले आहेत. नव्या बाईकचा फ्रंट लूक आधीपेक्षा जास्त तीक्ष्ण आहे. यात एलईडी हेडलाईट, अडजस्टेबल विंडस्क्रीन आणि एलसीडी सेमी-डिजिटल कंसोल दिलं आहे. नव्या कावासाकी वर्सेस 1000 मध्ये कावासाकी ट्रॅक्शन कंट्रोल (KTRC), क्रूज कंट्रोल, कावासाकी कॉर्निंग मॅनेजेमेंट फंक्शन (KCMF) आणि कावासाकी इंटेलिजंट एबीएस यांसारखे सेफ्टी फीचर्स आहेत. बाईकमध्ये दोन पॉवर मोड देण्यात आले आहेत. याच्या फ्रंट आणि रिअर सस्पेशनही अपडेट केले आहेत. बाईकच्या दोन्ही विल्ज 17-इंचाची आहे. बाईकच्या सीटची उंची 790mm आहे. यात 21 लिटरचा फ्यूट टँक देण्यात आला आहे. कावासाकीच्या नव्या अॅडव्हेंचर-टूअरर बाईकची बुकिंग मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यातच सुरु झाली आहे. त्याची डिलिव्हरी मार्चपासून सुरु होणार आहे. तर आता जे बाईक बुक करतील त्यांना डिलिव्हरीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.  कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर ही बाईक बुक करता येऊ शकते. Ducati Multistrada 950 बाईकला नवी 2019 कावासाकी वर्सेस 1000 टक्कर देईल, अशी चर्चा बाजारात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
Tech-Neck Problem Health News: मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
Instagram Ban In India Fact Check: मोदी सरकार 25 ऑगस्टपासून इन्स्टाग्राम बंद करणार? व्हायरल पोस्टने खळबळ, सरकारची मोठी अपडेट
मोदी सरकार 25 ऑगस्टपासून इन्स्टाग्राम बंद करणार? व्हायरल पोस्टने खळबळ, सरकारची मोठी अपडेट
Telegram : टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली, कारवाईसाठी 15 दिवसांची मुदत, नेमकं काय घडलं?
टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली,15 दिवसांचा वेळ दिला, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
Mojtaba khamenei Video: कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
Manoj Jarange Patil: 'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
IND vs SL : यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
Team India Injury Crisis : टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
Crime News: पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
Dharmendra Pradhan: राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
Embed widget