एक्स्प्लोर

Telegram : टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली, कारवाईसाठी 15 दिवसांची मुदत, नेमकं काय घडलं?

Telegram : केंद्र सरकारनं टेलीग्रामला नोटीस देत प्लॅटफॉर्मवरील पायरेटेड चित्रपट, ओटीटी कंटेंट हटवण्यास सांगितलं आहे. यासाठी 15 दिवसांचा वेळ दिला आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारनं  टेलीग्राम ॲपला नोटीस जारी केलं आहे. त्या नोटीसमध्ये प्लॅटफॉर्मवरुन पायरेटेड चित्रपट, ओटीटीवरील कंटेंट आणि इतर व्हिडीओ सामग्रीचा होणार  प्रसार रोखण्यास सांगितलं आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी शनिवारी ही माहिती दिली आहे. टेलीग्रामनं सरकारच्या आदेशानंतर काय कारवाई केली यासंदर्भात माहिती देण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी दिला आहे.  

माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची भूमिका पायरेटेड सामग्री हटवण्याऐवजी  टेलीग्रामनं प्लॅटफॉर्मची जबाबदारी पाडण्यासंदर्भात बदल करणं अपेक्षित आहे. कॉपीराईटचं उल्लंघन केवळ दिवाणी स्वरुपाचं उलंलंघन नसून कॉपीराईट कायदा 1957 आणि सिनेमॅचोग्राफ अधिनियम 1952 नुसार फौजदारी स्वरुपाचा गुन्हा देखील आहे. केंद्र सरकारनं काही दिवसांपूर्वी नीट फेरपरीक्षेच्या काळात टेलीग्राम ॲप काही कालावधीसाठी ब्लॉक केलं होतं. 

मंत्रालयाच्या अपेक्षानुसार टेलीग्रामनं केवळ वाट पाहू नये की सरकार कॉपीराइटचा उल्लंघन करण्याऱ्या प्रत्येक चॅनेलची ओळख पटवावी. माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 आणि माहिती तंत्रज्ञान नियम 2021 नुसार अपेक्षित सतर्कता बाळगण्यासाठी केवळ तक्रार मिळाल्यानंतर एका एका चॅनेलला हटवण्याची कारवाई पुरेशी नाही.  

केंद्र सरकारनं काही दिवसांपूर्वी मेटाच्या यूजरनेम आधारित व्हाटस ॲप फीचर लागू करण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. त्यानंतर मेटाला नोटीस देण्यात आली होती. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मेटाला नोटीस देण्याचे आदेश दिले होते. याशिवाय टेलीग्रामला देण्यात आलेली नोटीस इन्स्टाग्रामवर बाल लैंगिक शोषणाला प्रोत्साहन देणाऱ्या जाहिराती वाढल्याचे आरोप झाल्यानंतर देण्यात आली आहे.  

टेलीग्राम आणि सिग्नल ॲपला दखील यूजरनेम फीचरासाठी नोटीस जारी करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार माहिती व प्रसारण मंत्रालयानं निर्माते, ओटीटी प्लॅटफॉर्म, कायदा अंमलबजावणी यंत्रणांसाठी तक्रार निवारण व्यवस्थेची मागणी देखील टेलीग्रामकडे करण्यात आली आहे. टेलीग्रामनं मध्यस्थ म्हणून काम करत असताना माहिती तंत्रज्ञान कायदा आणि माहिती तंत्रज्ञान नियमांच्या नुसार योग्य सतर्कता बाळगणं आवश्यक आहे. एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार कॉपीराईटचं उल्लंघन असणारा कंटेंट प्लॅटफॉर्मवर असणं, नियमांचं पालन करण्यापासून वाचण्याचा प्रयत्न करणं, अर्धवट उत्तर दिलं गेल्यास कायदेशीर तरतुदीनुसार कारवाई केली जाऊ शकते. भारतात तयार होणाऱ्या कंटेंटशी संबंधित अर्थव्यवस्था, चित्रपट उद्योग, प्रक्षेपक, ओटीटी मंच, निर्माते आणि वितरकांच्या हितासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

साखरेच्या वाढत्या किंमतीमुळं सरकारनं घेतला मोठा निर्णय, इथेनॉलमध्ये साखरेच्या वापरावर बंदी, आता इथेनॉलचे उत्पादन कसे होणार?
साखरेच्या वाढत्या किंमतीमुळं सरकारनं घेतला मोठा निर्णय, इथेनॉलमध्ये साखरेच्या वापरावर बंदी, आता इथेनॉलचे उत्पादन कसे होणार?
RBI चा मोठा निर्णय! बँकांसाठी नवीन नियम लागू, तुमच्या खात्यावर परिणाम होणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती 
RBI चा मोठा निर्णय! बँकांसाठी नवीन नियम लागू, तुमच्या खात्यावर परिणाम होणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती 
लातूर जिल्हा बँक निवडणूक! मंत्री बाबासाहेब पाटील आणि धीरज देशमुख एकाच गाडीत, राजकीय चर्चांना उधाण
लातूर जिल्हा बँक निवडणूक! मंत्री बाबासाहेब पाटील आणि धीरज देशमुख एकाच गाडीत, राजकीय चर्चांना उधाण
Reliance Industries on Elon Musk: मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'
मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray Shivsena UBT Dasara Melava 2026: ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण मुंबई महानगरपालिकेने 24 अटी घातल्या, कोणकोणत्या अटींचं पालन करावे लागणार?
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण BMC ने घातल्या 24 अटी!
Pratapgad Fort : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
Raigad Crime Controversy : रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
Team India Squad: बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
YCM Hospital : कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन; विभागीय चौकशीचे आदेश
कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
Embed widget