एक्स्प्लोर
ह्युंदाईच्या नव्या वेरना कारचं बुकिंग सुरु, 22 ऑगस्टला लाँचिंग
ह्युंदाईची नवी वेरना कार 22 ऑगस्टला लाँच करण्यात येणार आहे. मात्र, त्यासाठी आतापासूनच बुकिंग सुरु झालं आहे.
मुंबई : ह्युंदाईनं नव्या वेरना कारसाठी अधिकृत बुकिंग सुरु केलं आहे. 25,000 रुपयात या कारचं बुकिंग करता येणार आहे. नवी वेरना कार 22 ऑगस्टला लाँच करण्यात येणार आहे. या कारची होंडा सिटीसोबत स्पर्धा असणार आहे.
इंजिन आणि गिअरबॉक्स
नवी वेरना कार पेट्रोल आणि डिझेल व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असणार आहे. पेट्रोल व्हेरिएंटमध्ये 1.6 लीटरचं ड्यूल व्हीटीव्हीटी इंजिन मिळेल. ज्यामध्ये 123 जीपीएस पॉवर आणि 155 एनएम टार्क असणार आहे. डिझेल व्हेरिएंटमध्ये 1.6 लीटर यू2 सीआरडीआय व्हीजीटी इंजिन असणार आहे. ज्यामध्ये 128 पीएस पॉवर आणि 260 एनएम टार्क असणार आहे. दोन्ही इंजिनसाठी 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स स्टॅँडर्ड आहे.
नव्या वेरनामध्ये एकूण 12 व्हेरिएंट आहे. ज्यामध्ये सहा पेट्रोल आणि सहा डिझेल व्हेरिएंट आहेत. नव्या वेरनामध्ये एकूण सात कलर उपलब्ध असणार आहेत.
बातमी सौजन्य : cardekho.com
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement