एक्स्प्लोर

नव्या कृषी कायद्यांची संविधानिक वैधता तपासणार : सर्वोच्च न्यायालय

केंद्र सरकारने पास केलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधातील याचिकेवर सुनावणी घेताना न्यायालयाने हे मत मांडले. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला एक नोटीस पाठवून यावर मत मांडायला सांगितले आहे.

नवी दिल्ली: अलिकडेच संसदेने पास केलेल्या तीन नव्या कृषी कायद्यांना आव्हान दिलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने या कायद्यांची वैधता तपासणार असे सांगत केंद्र सरकारला यावर नोटीस पाठवली आहे. या कायद्यांना आव्हान दिलेल्या याचिकेत संबंधीत कायदे असंविधानिक असल्याचे सांगण्यात आले आहेत.

नुकतेच संसदेने शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क व सुरक्षा) किंमत हमी व कृषी सेवा करार व अत्यावश्यक सेवा (सुधारणा) ही तीन कृषीविषयक कायदे पास केले होते. या विधेयकांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मान्यता दिली आणि त्याचे रुपांतर कायद्यात झाले. या कायद्यांला प्रमुख विरोधी पक्ष कॉग्रेससह अनेक शेतकरी संघटनांनी आपला विरोध दर्शवला आहे. तसेच याविरोधात सर्वोच्च न्यायालयात चार याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.

मनोहर लाल शर्मा यांनी दाखल केलेल्या एका याचिकेत हे कायदे शेतकऱ्यांचे शोषण करतात असे सांगितले होते. यावर सरन्यायाधीश एस ए बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सांगितले की हे कायदे नुकतेच पास करण्यात आले आहेत. त्यामुळे भविष्यात होणाऱ्या त्यांच्या परिणामांचा अंदाज आता लावू शकत नाही.

छत्तीसगडच्या किसान कॉग्रेसशी संबंधीत राकेश कुमार शर्मा यांनीही यासंबंधी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. त्यांनी त्यात म्हंटले आहे की ही गोष्ट केवळ कायद्यांच्या परिणामांची नाही. हे कायदे असंविधानिक पध्दतीने पास करण्यात आलेले आहेत. संविधानिक दृष्ट्या कृषीविषयक कायदे करण्याचा अधिकार हा राज्यांच्या अधिकार क्षेत्रात येतो.

यावर न्यायालयाने हा मुद्दा योग्य ठरवला. यावरील सुनावनी दरम्यान न्यायालयाने अॅटर्नी जनरल के.के. वेणुगोपाल यांना सांगितले कि जर अशा याचिकाकर्त्यांनी त्यांच्या त्यांच्या राज्यात याचिका दाखल केल्या तर तुम्हाला त्याचे उत्तर द्यावेच लागेल. त्यामुळे आम्ही तुम्हाला निर्देश देतो या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात तुमचे मत मांडा.

असे सांगताना न्यायालयाने हेही स्पष्ट केले की या कायद्यांना आता स्थगिती देणार नाही. केंद्र सरकारला त्यांचे मत मांडायला सुरवातीला न्यायालयाने चार आठवड्यांचा कालावधी दिला होता. पण अॅटर्नी जनरलनी तो वाढवून द्यावा ही विनंती केल्यानंतर न्यायालयाने सरकारला सहा आठवड्यांची मुदत दिली.

आता या विषयावर पुढची सुनावणी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होईल.

संबंधीत बातम्या:

मोदी सरकारच्या नवीन कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांसह कामगार देशोधडीला लागतील; राहुल गांधींचा आरोप

तीन कृषी सुधारणा कायदे देशातील कृषीक्षेत्राचे भविष्य पालटणार : केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: मुंबईतील गृहिणीला तोतया पोलिसांनी लुटले, 2 लाख घेऊन पसार
Maharashtra Live blog updates: मुंबईतील गृहिणीला तोतया पोलिसांनी लुटले, 2 लाख घेऊन पसार
Numerology: कठीण काळात कधीच सोडून जात नाहीत! 'या' जन्मतारखांचे लोक कुटुंबाचा आधारस्तंभ, राहूचे वर्चस्व, अत्यंत विश्वासू, अंकशास्त्र
कठीण काळात कधीच सोडून जात नाहीत! 'या' जन्मतारखांचे लोक कुटुंबाचा आधारस्तंभ, राहूचे वर्चस्व, अत्यंत विश्वासू, अंकशास्त्र
Shivdeep Lande: बायकोने वडिलांना स्वत:ची किडनी दिली, शिवदीप लांडेंची भावूक पोस्ट म्हणाले, 'फक्त एका निर्णयाने मला आतून हादरवून टाकलं'
बायकोने वडिलांना स्वत:ची किडनी दिली, शिवदीप लांडेंची भावूक पोस्ट म्हणाले, 'फक्त एका निर्णयाने मला आतून हादरवून टाकलं'
Dhurandhar: आता घरबसल्या 'Dhurandhar' बघा, वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर डेट कन्फर्म, कधी अन् कोणत्या चॅनेलवर पाहता येणार?
आता घरबसल्या 'Dhurandhar' बघा, वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर डेट कन्फर्म, कधी अन् कोणत्या चॅनेलवर पाहता येणार?

व्हिडीओ

Eknath Khadse Jalgaon : महार वतनाच्या जमीन हडपल्याचा आरोप, एकनाथ खडसे काय म्हणाले?
Ashok Kharat Book : खरातची अंधभक्ती, आत्मचरित्रात स्तुती, पुस्तकातली भाकणूक, भोळ्या भक्तांची फसवणूक Special Report
Satara SP Tushar Doshi Compulsory Leave : सक्तीची सुट्टी वादाची मुक्ती? Special Report
Mohit Kamboj Aditya Thackeray : राजकीय खुन्नस ते बर्थडे पार्टी,चर्चांना जोर... Special Report
Ashok Kharat Mobile : मोबाईल 'उघडणार' कोण कोण अडकणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्यात अवकाळीचा तडाखा! गारपीट, विजांचा कडकडाट अन् वादळी पाऊस; गहू, मका, आंबा जमीनदोस्त, आज कुठे हाय अलर्ट?
राज्यात अवकाळीचा तडाखा! गारपीट, विजांचा कडकडाट अन् वादळी पाऊस; गहू, मका, आंबा जमीनदोस्त, आज कुठे हाय अलर्ट?
Rupali Chakankar and Ashok Kharat: नाशिकला पदराने अशोक खरातचे पाय पुसायला जायचात अन् आता म्हणताय, 'मी महिला, प्रवास जमणार नाही'; अंजली दमानियांची रुपाली चाकणकरांवर टीका
तेव्हा नाशिकला जायचात अन् आता म्हणताय, 'मी महिला, प्रवास जमणार नाही'; दमानियांची चाकणकरांवर टीका
Electricity Rates Decrease In Mumbai मोठी बातमी: बेस्ट, टाटा, अदानीच्या वीजदरात कपात, 1 एप्रिलपासून नवे दर लागू, पाहा जुने आणि नवीन दर!
मोठी बातमी: बेस्ट, टाटा, अदानीच्या वीजदरात कपात, 1 एप्रिलपासून नवे दर लागू, पाहा जुने आणि नवीन दर!
Share Market Crash : मार्च महिन्यात भारतीय शेअर बाजार घसरणीचे वारे , गुंतवणूकदारांचे तब्बल 44 लाख कोटी बुडाले, पुढं काय?
मार्च महिन्यात भारतीय शेअर बाजार घसरणीचे वारे , गुंतवणूकदारांचे तब्बल 44 लाख कोटी बुडाले, पुढं काय?
Maharashtra Live blog updates: मुंबईतील गृहिणीला तोतया पोलिसांनी लुटले, 2 लाख घेऊन पसार
Maharashtra Live blog updates: मुंबईतील गृहिणीला तोतया पोलिसांनी लुटले, 2 लाख घेऊन पसार
South Cinema Actress Net Worth: ना अनुष्का शेट्टी, ना समंथा अन् ना तमन्ना भाटीया; 'ही' साऊथची सर्वात श्रीमंत अभिनेत्री, एकूण संपत्ती 200 कोटी
ना अनुष्का शेट्टी, ना समंथा अन् ना तमन्ना भाटीया; 'ही' साऊथची सर्वात श्रीमंत अभिनेत्री, एकूण संपत्ती 200 कोटी
Fairness Cream Alert : गोरं होण्यासाठी पाकिस्तानी क्रीम वापरली अन् किडनी खराब, छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन व्यापारी अटकेत
गोरं होण्यासाठी पाकिस्तानी क्रीम वापरली अन् किडनी खराब, छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन व्यापारी अटकेत
Ashok Kharat: अशोक खरातचे 45 नेत्यांशी घनिष्ट संबंध, भोंदूबाबाच्या सल्ल्याशिवाय पानही हलायचं नाही, एसआयटीच्या तपासात धक्कादायक माहिती समोर
अशोक खरातचे 45 नेत्यांशी घनिष्ट संबंध, भोंदूबाबाच्या सल्ल्याशिवाय पानही हलायचं नाही, एसआयटीच्या तपासात धक्कादायक माहिती समोर
Embed widget