एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

सुजय विखे पाटील विरुद्ध निलेश लंके लढत होणार? असं आहे अहमदनगर दक्षिणचं राजकीय गणित

Sujay Vikhe patil vs Nilesh Lanke : पारनेरचे आमदार निलेश लंके हे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यांना उमेदवारी मिळाल्यास सुजय विखे पाटलांना तगडे आव्हान अस शकते.

Sujay Vikhe patil vs Nilesh Lanke : पारनेरचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी आज शरद पवार गटाची वाट धरत तुतारी फुंकली. पुण्यातील पक्षकार्यालयात त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेत प्रवेश केला. ते अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून (Ahmednagar South Lok Sabha Constituency) निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. 

काल भाजपकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी (BJP Candidate List) जाहीर करण्यात आली. यात महाराष्ट्रातील एकूण 20 जणांचा समावेश आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी भाजपने डॉ. सुजय विखे पाटील (Dr Sujay Vikhe Patil) यांना उमेदवारी जाहीर केल्याने निलेश लंकेंनी शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. 

अहमदनगर दक्षिणमधून निलेश लंकेंना उमेदवारी?

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निलेश लंके यांची लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा आहे. मागील दोन वर्षापासून ते लोकसभेची तयारी करत असल्याचे चित्र आहे. निलेश लंकेंना जर महाविकास आघाडीतून (Mahavikas Aghadi)अहमदनगर दक्षिणसाठी उमेदवारी मिळाली तर डॉ. सुजय विखे पाटलांना तगडे आव्हान मिळू शकते, अशी सध्या चर्चा रंगली आहे. 

काय आहे अहमदनगर दक्षिणचं राजकीय गणित?

अहमदनगर दक्षिणमध्ये विखे पाटलांच्या पक्षांतर्गत वैरी वाढत चालल्याचे दिसून येत आहे. कर्जत जामखेडमधून रोहित पवार, राहुरीमधून प्राजक्त तनपुरे लंके यांना अधिक मताधिक्यासाठी प्रयत्न करण्याची शक्यता आहे. श्रीगोंद्यात भाजपचे बबनराव पाचपुते आणि शेवगावमध्ये मोनिका राजळे आमदार असल्या तरी राष्ट्रवादीचा विरोधी गट देखील कमालीचा सक्रीय आहे. भाजपचे आमदार राम शिंदे, युवा नेते विवेक कोल्हे उघडउघड लंके यांना मदत करत असल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसून आले आहे. यामुळे जर लंके विरुद्ध विखे लढत झाल्यास लंके विखेंना तगडे आव्हान देण्याची शक्यता आहे. 

निलेश लंके मोठ्या मताधिक्याने निवडून येणार - बाळासाहेब थोरातांना विश्वास 

तसेच,  विखे पाटलांचे कट्टर विरोधक मानले जाणारे बाळासाहेब थोरात हे नाशिकला एबीपी माझाशी संवाद साधताना म्हणाले की, निलेश लंके जर शरद पवार गटात आले आणि ते अहमदनगर दक्षिणमधून निवडणूक लढले तर त्यांचा निश्चितच विजय होईल. निलेश लंकेंनी खूप लोकप्रियता मिळवली आहे. सर्वसामान्य तरुण, काम करणारे तरुण असे त्यांचे उदाहरण झालेय. लंके मोठ्या मताने विजयी होतील, अशा मला विश्वास असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नगर जिल्ह्यातील बाळासाहेब थोरात यांचादेखील लंकेंना विजयी गुलाल उधळण्यासाठी हातभार लागणार आहे. आता महाविकास आघाडीतून निलेश लंकेंना अहमदनगर दक्षिणसाठी तिकीट मिळणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.   

आणखी वाचा 

Nilesh Lanke : पत्र्याचं घर, शिवसेनेचा शाखाप्रमुख ते राष्ट्रवादीचा आमदार, निलेश लंके यांचा राजकीय प्रवास

Sujay Vikhe Patil : पेशाने न्यूरोसर्जन, नगरमधून नेटवर्किंगच्या जोरावर केला मातब्बर नेत्याचा पराभव, जाणून घ्या डॉ. सुजय विखे पाटलांचा राजकीय प्रवास

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rashmi Shukla Maharashtra Police | रश्मी शुक्लांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्तीRajkiya Shole | 57 जागा जिंकणाऱ्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद मिळणार का? ABP MajhaJaykumar Gore - Rahul Kool : सर्व पवार 'ही' काळज घेतात..कुल-गोरेंनी सगळंच सांगितलं EXCLUSIVEZero Hour on India Match Wins | भारतानं कांगारूंचा दुसरा डाव 295 धावांत गुंडाळला ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Embed widget