एक्स्प्लोर

Nilesh Lanke : पत्र्याचं घर, शिवसेनेचा शाखाप्रमुख ते राष्ट्रवादीचा आमदार, निलेश लंके यांचा राजकीय प्रवास

Nilesh Lanke  Joined Sharad Pawar Group : सामान्य कुटुंबात जन्म घेतलेल्या निलेश लंके याचं घर आजही पत्र्याचं आहेत. लंके यांचा राजकीय इतिहास कसा आहे पाहू यात...

Nilesh Lanke  Joined Sharad Pawar Group : अजित पवार गटाचे आमदार (Ajit Pawar Group MLA) निलेश लंके (Nilesh Lanke) शरद पवार गटात (Sharad Pawar Group) प्रवेश करत आहेत. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून (Ahmednagar South Lok Sabha Constituency) निवडणूक लढवण्यासाठी निलेश लंके यांनी हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. मात्र, लंके यांचा राजकीय प्रवास पाहिल्यास शिवसेनेचा शाखाप्रमुख ते राष्ट्रवादीचा आमदार (NCP MLA) असा त्यांनी प्रवास केला आहे. सामान्य कुटुंबात जन्म घेतलेल्या निलेश लंके याचं घर आजही पत्र्याचं आहेत. लंके यांचा राजकीय इतिहास कसा आहे पाहू यात...

शिवसेना शाखा प्रमुख ते आमदार....

सामान्य कुटुंबात जन्म घेतलेल्या निलेश लंके आजही पत्र्याच्या घरात राहतात. एकूण 9 जणांचे त्यांचे कुटुंब याच घरात राहतात. एक रूम, छोटंस किचन, बाजूला बाथरूम असे लंके यांचं घर आहे.  आईवडील, भाऊ- भावजय आणि पुतण्या-पुतणी, दोन मुले, आणि पत्नी असे त्यांचा परिवार आहे. निलेश लंके यांचे वडील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक होते आणि आता ते सेवानिवृत्त आहेत. लहानपणापासून समाजसेवेची आवड असलेले लंके 2004 मध्ये राजकारणात आले. त्यांनी याची सुरवात हंगा शिवसेना शाखा प्रमुख पदापासून केली. 

निलेश लंकेंची माहिती...

  • नाव : निलेश ज्ञानदेव लंके
  • जन्मतारीख :10 मार्च 1980
  • पत्ता- मु पो: हंगा ता. पारनेर, जिल्हा- अहमदनगर
  • शैक्षणिक पात्रता : बी.ए, आयटीआय (फिटर ट्रेड)

राजकीय प्रवास...

  • हंगा शिवसेना शाखा प्रमुख (2004)
  • हंगा ग्रामपंचायत सदस्य (2004)
  • सुपा गण प्रमुख (2005)
  • सुपा विभाग प्रमुख(2006)
  • शिवसेना उपतालुका प्रमुख पारनेर(2008)
  • ग्रामपंचायत सरपंच हंगा (2010)
  • पारनेर सेना तालुका प्रमुख(2013) 
  • तालुका प्रमुख शिवसेना सोडली 2018
  • राष्ट्रवादीत प्रवेश जानेवारी (2019)
  • राष्ट्रवादीतून विधानसभा निवडणूक लढवली (2019)

विधानसभा निवडणूक निकाल 2019

  • लंके यांना मिळालेली एकूण मते - 139963
  • मताधिक्य - 59838
  • (विजय औटी) उमेदवार- 80145 (पराभूत) 

कोविड काळातील कामाची चर्चा...

  • पहिला कोविड लॉकडाऊनमध्ये सुपा येथे दोन लाखाहून अधिक प्रवासी आणि विस्थापितांची सेवा.
  • कर्जुले येथे एक हजार घाटांची सेंटर त्यात 5 हजार रुग्ण बरे झाले.
  • दुसऱ्या कोविड लाटेत अकराशे बेडचे कोविड सेंटर व 100 ऑक्सिजन बेड असलेले देशातील पहिले मोठे कोविड सेंटर सुरू केले, 29 हजार रुग्णांवर उपचार केले. 
  • या कोविड सेंटरमध्ये एकही रुग्ण मयत झाले नाही.
  • उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून कोविड सेंटरची दखल घेण्यात आले.
  • केवळ पक्षातीलच नाही तर विरोधी पक्षातील अनेक आमदार आणि नेत्यांनी देखील कोविड सेंटरला भेट दिली.
  • कोविड सेंटर मध्ये स्वतः आमदार निलेश लंके हे राहत होते, रुग्णांचे मनोरंजन व्हावं यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा आयोजन केले जात होते.
  • कोविड सेंटरमध्ये रुग्णांवर नैसर्गिक उपचार केले जात होते.

सामाजिक कार्य

मतदारसंघांमध्ये विविध आरोग्य शिबिरे, रोजगार मेळावे कृषी प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रमांचा आयोजन, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा वाटप, महिलांसाठी मोहटादेवी यात्रेच दरवर्षे आयोजन , मुस्लिम महिलांसाठी खेड शिवापुर येथील दर्गा दर्शन, मुंबईतील महिलांसाठी एकविरा दर्शन, वीस वर्षांपासून युवकांसाठी वैष्णवी देवी दर्शन यात्रा, सामुदायिक विवाह सोहळ्याचा आयोजन, पोलीस भरतीसाठी व्हर्च्युअल अकादमी, खाकी अँप डिजिटल शाळेचा उपक्रम, स्व रोजगार साहित्याचे वाटप, स्वतःच्या पगारातून दर महिन्याला अपंगांसाठी सायकलचे वाटप.

पुरस्कार

  • लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ इयर 2020
  • वर्ड बुक ऑफ लंडन 2021
  • महाराष्ट्र कोविड योद्धा 2021
  • द थेंम्स इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी पॅरिस फ्रान्स यांच्याकडून मानत डॉक्टर प्रधान (2024)
  • राज्यातील सामाजिक संघटनांकडून जवळपास शंभर पुरस्काराने सन्मानित

सदस्यत्व

  • अहमदनगर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सदस्य (2019)
  • महाराष्ट्र शासन कामगार आणि पर्यावरण समितीचे सदस्य (2019)

लिहलेल पुस्तक

  • मी अनुभवलेला कोविड(2024)

इतर महत्वाच्या बातम्या : 

मोठी बातमी! निलेश लंके आजच शरद पवार गटात प्रवेश करणार?, अजित पवार गटाला पहिला धक्का

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
Embed widget