एक्स्प्लोर

Sudhir Mungantiwar : OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी? इथे जर संस्कृतीचा ऱ्हास होत असेल तर..; भाजपच्या सुधीर मुनगंटीवारांचा सरकारला सवाल

Sudhir Mungantiwar on OYO : भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी ओवायओचा (OYO) मुद्दा उपस्थित केला. यात ओयोमध्ये एका तासासाठी खोली भाड्याने का मिळते? अशी शंका उपस्थित  करत अनेक सवाल केलेत.

Sudhir Mungantiwar on OYO : सध्या राज्याच्या विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Monsoon Session 2025) सुरू आहे. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार(Sudhir Mungantiwar) हे अनेक सवाल उपस्थित करत आहेत आणि आपल्याच सरकारला धारेवर धरताना दिसत आहेत. अशातच सोमवारी (7 जुलै) भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी ओवायओचा (OYO) मुद्दा उपस्थित केला. यात ओयोमध्ये एका तासासाठी खोली भाड्याने का मिळते? शहरांपासून दूर असणाऱ्या या हॉटेल्समध्ये नेमकं काय सुरु असते? हा अभ्यासाचा विषय आहे, याचा पोलीस विभागाने अभ्यास करावा, अशी मागणी करत सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेमध्ये शंका उपस्थित  करत अनेक सवाल केलेत. पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान मुनगंटीवार यांनी ओयो हॉटेलचा मुद्दा उपस्थित केला आहे.

नेमकं काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार?

'ओयो नावाची एक हॉटेल चेन तयार झाली आहे. शहराच्या 20-20 किमी दूर एका निर्जन ठिकाणी OYO... मग मनात शंका आली की ही OYO हॉटेल चेन काय आहे? ही अतिशय गंभीर बाब सरकारने लक्ष देण्याची आहे. या हॉटेलसाठी कोणत्याही ग्रामपंचायतची परवानगी घेतली जात नाही, कोणत्याही नगर परिषदची परवानगी घेतली जात नाही. कोणत्याही महापालिकेची परवानगी घेतली जात नाही. या हॉटेलमध्ये एक तासासाठी खोली भाड्याने मिळते, ही कशासाठी दिली जाते, हा पोलीस विभागाच्या अभ्यासाचा विषय आहे', असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. OYO च्या माध्यमातून 20 -20 किलोमीटर वर कोणीही प्रवासी जाऊन राहत नाही. हा प्रवासी तिथं गेला म्हणजे त्याच अर्थशास्त्र कच्च आहे. कारण OYO पेक्षा शहरातील एका  हॉटेलमध्ये राहणे जास्त स्वस्त आहे. असेही ते म्हणाले.

'खरंतर संस्कृती रक्षकाचं सरकार आहे, इथे जर संस्कृतीचा ऱ्हास होत असेल, तर गृहराज्यमंत्री बसले आहेत. त्यांनी OYO चा अभ्यास करावा आणि महाराष्ट्रात किती OYO आहेत, याची माहिती मंत्र्यांनी देण्याची आवश्यकता आहे', असं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेमध्ये केलं. 

इतर महत्वाच्या बातम्या 

विशाल देवकर 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक

व्हिडीओ

KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
Embed widget