एक्स्प्लोर

2024 चा सर्वात फ्लॉप चित्रपट, 73 वर्षांच्या हिरोवर 200 कोटींची बाजी, पण बॉक्स-ऑफिसवर तोंड दाखवायला जागाच उरली नाही

Biggest Flop Film Of 2024: फिल्म इंडस्ट्रीत असं म्हटलं जातं की, कोणत्याही चित्रपटाचं भवितव्य प्रेक्षक ठरवतात. जर एखादा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नाही, तर त्याचं फ्लॉप होणं निश्चितच.

Biggest Flop Film Of 2024: 2024 मध्ये आलेल्या एका बिग बजेट चित्रपटानं (Big Budget Movie) बॉक्स ऑफिसवर (Box Office) तोंड दाखवायला जागा ठेवली नाही. या चित्रपटात 73 वर्षांचा सुपरस्टार मुख्य भूमिकेत होता. तसेच, हा चित्रपट तब्बल 200 कोटींमध्ये बनला होता, पण बॉक्स ऑफिसवर तो जोरात आदळला. एवढंच काय तर, या चित्रपटानं साधं बजेटही वसुल केलं नाही. 

फिल्म इंडस्ट्रीत (Film Industry) असं म्हटलं जातं की, कोणत्याही चित्रपटाचं भवितव्य प्रेक्षक ठरवतात. जर एखादा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नाही, तर त्याचं फ्लॉप होणं निश्चितच. असाच काहीसा प्रकार 2024 मध्ये आलेल्या एका बिग बजेट चित्रपटाच्या बाबतीत घडला. 73 वर्षांच्या सुपरस्टारचा अभिनय, त्यानं मोठ्या पडद्यावर केलेले स्टंट प्रेक्षकांना पाहूच वाटले नाहीत आणि त्यांनी पाठ फिरवली. एवढी की, चित्रपटाला त्याचं भांडवलंही वसूल करणं शक्य झालं नाही. आम्ही ज्या चित्रपटाबाबत सांगत आहोत, त्याचं नाव 'वेट्टैयन'.

'Vettaiyan' हा तमिळमधला ॲक्शन ड्रामा चित्रपट, जो 10 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला. यामध्ये 73 वर्षाचा सुपरस्टार म्हणजेच, साक्षात रजनीकांत मुख्य भूमिकेत झळकले. फक्त रजनीकांतच नाही बरं का... त्यांच्यासोबत बिग बी अमिताभ बच्चन, राणा दग्गुबती, फहाद फाजील, मंजू वॉरियर आणि इतर मोठीच्या मोठी स्टार्कास्ट होती. तर, आपल्या अॅक्शन, स्टंटसाठी ओळखल्या जाणाऱ्या रजनीकांत यांचे धमाकेदार स्टंटही होते. पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. 

View this post on Instagram
 
A post shared by Rajinikanth (@rajinikanth)

चित्रपटात रजनीकांत यांनी IPS अथियनची भूमिका साकारली होती, जो एक प्रामाणिक आणि शक्तिशाली पोलीस अधिकारी आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या विरोधात जाणाऱ्यांना तो थेट जीवानिशी मारतो. गुंड आणि बदमाशांनाही अथ्यानची भीती वाटते. गुन्हेगारांना न्यायालयातून शिक्षा देण्यावर त्याचा विश्वास नसून त्यांचा ऑन द स्पॉट एनकाउंटर करण्यावर त्याचा जास्त भर असतो. 

'वेट्टैयन'मध्ये रजनीकांत नेहमीप्रमाणेच फुल ऑन स्वॅगमध्ये दिसतात. चित्रपटातील त्यांच्या एन्ट्रीची तर बातच और... चित्रपटात रजनीकांत ॲक्शन मोडमध्ये दिसले आहेतच, पण त्यांनी शिक्षण माफियांचाही पर्दाफाश केला आहे. श्रीमंत लोक शिक्षण व्यवस्थेची कशी पिळवणूक करतात आणि गरीब विद्यार्थ्यांची फसवणूक करतात यावरही 'वेट्टैयन'मध्ये भाष्य करण्यात आलं आहे. पण, दिग्दर्शक आणि निर्मात्यांचे हे प्रयत्न प्रेक्षकांपर्यंत मात्र काही पोहोचले नाहीत. 

रजनीकांत यांच्या 'वेट्टैयन'मध्ये खलनायकाची भूमिका राणा दग्गुबतीनं केलीय. चित्रपटाचा क्लायमॅक्सही दमदार आहे. रजनीकांत यांनी पुन्हा एकदा आपल्या ॲक्शन अवतारानं चाहत्यांची मनं जिंकली खरी, पण बॉक्स ऑफिसवर मात्र चित्रपटाला नाव कमावता आलं नाही. प्रेक्षकांना हा चित्रपट फारसा आवडला नाही. 

आयएमडीबीच्या रिपोर्टनुसार, रजनीकांत यांचा 'वेट्टैयन' हा चित्रपट 200 कोटी रुपये खर्च करुन बनवण्यात आला होता. यानं जगभरात 255.8 कोटी रुपयांचा गल्ला कमावला. प्रचंड बजेटचा हा चित्रपट अखेर बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. 

नुकताच OTT Amazon प्राईम व्हिडीओवर 'वेट्टैयन' चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटानं टॉप 10 ट्रेंडिंग लिस्टमध्ये दुसऱ्या क्रमांकावर कब्जा केला. रजनीकांत, अमिताभ बच्चन आणि राणा दग्गुबती यांचा हा चित्रपट हिंदीसह दक्षिणेकडील भाषांसह OTT वर उपलब्ध आहे, जिथे तुम्ही घरी बसून त्याचा आनंद घेऊ शकता. हा चित्रपट टीजे ज्ञानवेल यांनी दिग्दर्शित केला होता.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vile Parle Redevelopment | 360 च्या बदल्यात 1400 स्क्वेअर फुटचं घर Special ReportRajkiya Shole Beed MCOCA | देशमुख हत्येप्रकरणी 8 जणांना मकोका, अडकणार 'आका' Special ReportRajkiya Shole on MVA | ठाकरेंच्या सेनेच्या स्वबळाचा नारा, मविआचं ब्रेकअप? Special ReportSantosh Deshmukh Case | संतोष देशमुखांच्या हत्येच्या आधी काय घडलं? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Embed widget