अभिनेता रोनित रॉयच्या मुलाने ऑनलाईन ऑर्डर केला पीएस 4 गेम, घरी आला फक्त रिकामा बॉक्स
रोनित रॉयला आलेल्या वाईट अनुभवाबद्दल ऑनलाईन शॉपिंग कंपनीने दिलगिरी व्यक्त केली. त्यानंतर रोनित यांनी ग्राहक सहायता टीमला कॉल करण्याची विनंती केली आहे.

मुंबई : ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवरून ऑर्डर केलेली वस्तू न येता भलतंच साहित्य आल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आता असाच काहिसा कटू अनुभव अभिनेता रोनित रॉयला आला आहे. अभिनेता रोनित रॉयच्या मुलाने सोमवारी ऑनलाइन वेबसाईटवरुन प्ले स्टेशन 4 जीटीए 5 ऑर्डर केला होता, मात्र आला कागदाचा रिकामा बॉक्स. रोनित रॉयने सोमवारी ट्वीट करुन ही माहिती दिली आहे. रोनितने आपल्या अकाऊंटवरुन ट्वीट करत ऑर्डर दिलेल्या वेबसाईटलाही टॅग केलं आहे.
रोनित रॉयने रिकाम्या पार्सलचा व्हिडीओ शूट करुन शेअर केला आणि लिहिलं की, "माझ्या मुलाने पीएस 4 जीटीएची ऑर्डर दिली होती. मात्र पॅकेटमध्ये फक्त एक रिकामा कागदाचा तुकडा बाहेर आला आणि त्यात कोणतीही डिस्क आढळली नाही. कृपया या प्रकरणाकडे त्वरित लक्ष द्या "
Dear @amazonIN My son ordered a ps4 gta5 The package contains a blank piece of paper and no disc. Please look into this immediately @amazon @AmazonHelp pic.twitter.com/9FaivknxiZ
— Ronit Bose Roy (@RonitBoseRoy) November 30, 2020
दुसऱ्या ट्वीटमध्ये त्याने आपला ऑर्डर नंबरही शेअर केला आहे. ग्राहक सहायता केंद्राकडून अभिनेता रोनित रॉयच्या ट्वीटला उत्तर आलं आहे. रोनित रॉयला आलेल्या वाईट अनुभवाबद्दल ऑनलाईन शॉपिंग कंपनीने दिलगिरी व्यक्त केली. त्यानंतर रोनित यांनी ग्राहक सहायता टीमला कॉल करण्याची विनंती केली आहे.
गेल्या महिन्यात रोनितचा मुलगा अगस्त्य 13 वर्षांचा झाला. आपल्या मुलासाठी वाढदिवसाची खास चिठ्ठी इन्स्टाग्रामवर शेअर करत रोनितने म्हटलं होतं की "वाढदिवसाच्या शुभेच्छा बाळा. आज तू 13 वर्षांचा झाला आहेस. आयुष्यातील कुठल्याही गोष्टीत पुढे जाण्यासाठी माझा नेहमी तुला पाठिंबा असेल.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
