एक्स्प्लोर

Ujani Water Issue : उजनीतील पाणी बारामती, इंदापूरला देण्यावरून वातावरण पेटलं! आंदोलनाची तीव्रता वाढली 

उजनी धरणातील पाणी बारामती, इंदापूरला देण्यावरून वातावरण पेटताना दिसत आहे. सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज यांच्या मंदिरात आरती करून या सरकारला सद्बुद्धी येवो अशी प्रार्थना करण्यात येणार आहे

Ujani Dam Issue : सोलापूरकरांचा विरोध डावलून उजनी धरणातील पाणी बारामती, इंदापूरला देण्यावरून वातावरण पेटताना दिसत आहे. काल पंढरपुरात उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने आंदोलनाची सुरुवात करण्यात आली आहे. आज पुन्हा सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज यांच्या मंदिरात आरती करून या सरकारला सद्बुद्धी येवो अशी प्रार्थना करण्यात येणार आहे. इंदापूर आणि बारामती येथील जवळपास 17 गावांसाठी लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेला राज्य शासनाच्या वतीने मान्यता देण्यात आली आहे. याच निर्णयाच्या विरोधात सोलापूर जिल्ह्यात शेतकरी आणि राजकीय संघटना आक्रमक झाल्या आहेत. मागच्या वर्षी देखील लाकडी निंबोडी प्रकल्प मंजुरीसाठी प्रयत्न सुरू असताना सोलापुरातील स्थानिक नेत्यांनी त्याला विरोध केला होता. मात्र  आता या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याने पुन्हा एकदा पाणीप्रश्न पेटत आहे.

इंदापूर आणि बारामती तालुक्याला पाणी पुरवठा करण्यासाठी राज्यशासनाने लाकडी निंबोडी  उपसा सिंचन योजनेला प्रशासकीय मान्यता दिली आहे. उजनी धरणातील पाणी या प्रकल्पाच्या माध्यमातून इंदापूर आणि बारामती तालुक्यातील एकूण 17 गावासाठी पाणी पुरवठा केला जाणार आहे. या सिंचन योजनेमुळे 7250 हेक्टर अवर्षण प्रवण शेती क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे नियोजन आहे. यासाठी जवळपास 0.90 अब्ज घनफूट पाणी उपसा करणे प्रस्तावित आहे. या योजनेसाठी 348 कोटी 11 लाख रुपयांच्या अंदाजपत्रक किमतीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. मात्र या योजनेस सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आणि राजकीय लोकांचा विरोध आहे.

लाकडी निंबोडी योजना कशी आहे?

- या योजनेमुळे इंदापूर तालुक्यातील 10 गावांमधील 4337 हेक्टर क्षेत्र व बारामती तालुक्यातील 7 गावांमधील 2913 हेक्टर क्षेत्र एकूण 7250 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. 

- लाकडी-निंबोडी ही योजना या परिसरासाठी महत्वाची आहे. ही योजना 30 वर्षांपासून रखडली होती. 
 
- लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजना ही भीमा (उजनी) प्रकल्पाचाच भाग असल्याने सदर योजनेस प्राधिकरणाच्या मान्यतेची आवश्यकता नाही 

- निंबोडी उपसा सिंचन या योजनेस एकूण  348 कोटी 11 लाख  इतक्या किंमतीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता 

-  इंदापूर तालुक्यातील कुंभारगांव परिसरातून साधारण  765 हाँर्स पॉवर क्षमतेच्या चार विद्युत पंपाच्या साहाय्याने हे पाणी उचलून शेटफळगडे आणि निरगुडे च्या सीमेवर टाकले जाईल. 

- 640 हॉर्स पॉवरचे 3 पंप व 570 हॉर्स पॉवरचे दोन विद्युत पंप त्या ठिकाणी बसवले जातील. 

-  इंदापूर आणि बारामती तालुक्यातील दुष्काळी पट्ट्यातील 11 हजार एकर शेती ओलिताखाली येईल.

- लाकडी निंबोडी योजना जुनी आहे. मागच्या वर्षी वर्षी उजनी धरणातील 5 टीएमसी पाणी इंदापूर तालुक्याला देण्याचा निर्णय झाला त्याला सोलापूरकरांनी विरोध केला त्यामुळे ती योजना रद्द करण्यात आली आहे..

- लाकडी निंबोडी योजना ही जुनी योजना आहे. सोलापूर जिल्ह्यात लोकांचा गैरसमज काढला पाहिजे, इंदापूर तालुक्यातील लोकांचे हक्काचे पाणी इंदापूरकारांना देत आहोत असं मत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काल बारामतीत व्यक्त केलं होतं.

इतर महत्वाच्या बातम्या

Ujani Water Issue : 'लाकडी निंबोडी योजना जुनीच, उगाच विरोधी वातावरण करू नका' : अजित पवार

सोलापूरचं पाणी बारामतीकरांनी पळवल्याचा आरोप, उजनी संघर्ष समिती आंदोलनाच्या पवित्र्यात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Chavan : पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, रेवंत रेड्डींकडून पक्षनिष्ठेचे धडे मला घेण्याची गरज नाही, अशोक चव्हाण यांचा पलटवार
पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, तेलंगणाचा पैसा महाराष्ट्रात आलाय, अशोक चव्हाण यांचा रेवंत रेड्डींवर पलटवार
Land Scam News : 224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
Ind vs Aus 1st test : सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Muddyche Bola : दादर-माहिममध्ये कुणाची हवा? ठाकरे, मनसे, शिवसेना; जनतेचा कौल कुणाला?#मुद्द्याचं बोलाAvadiche Khane Ani Rajkiya Tane Bane : Bharatshet Gogawale यांच्याशी निवडणुकीच्या धामधुमीत गप्पाMahesh Sawant : माहीमच्या मुस्लिम समाजाचा मला पाठिंबा, महेश सावंतांचं वक्तव्य ABP MAJHAPratibha Pawar Baramati|प्रतिभा पवार,रेवती सुळेंना बारामतीतील टेक्सटाइल पार्कमध्ये जाण्यापासून रोखले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Chavan : पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, रेवंत रेड्डींकडून पक्षनिष्ठेचे धडे मला घेण्याची गरज नाही, अशोक चव्हाण यांचा पलटवार
पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, तेलंगणाचा पैसा महाराष्ट्रात आलाय, अशोक चव्हाण यांचा रेवंत रेड्डींवर पलटवार
Land Scam News : 224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
Ind vs Aus 1st test : सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
Priyanka Gandhi : प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
Manipur Violence : मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
Pratibha Pawar Car Stopped : 'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
Sharad Pawar : काँग्रेसनंतर शरद पवारांचा बंडखोर नेत्यांना दणका, दोघांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
काँग्रेसनंतर शरद पवारांचा बंडखोर नेत्यांना दणका, दोघांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
Embed widget