(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ujani Water Issue : 'लाकडी निंबोडी योजना जुनीच, उगाच विरोधी वातावरण करू नका' : अजित पवार
Ujani Water Issue : उजनीच्या पाण्यावरुन सध्या वातावरण तापलं आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून ही योजना जुनीच असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
Ujani Water Issue : उजनीच्या पाण्यावरुन सध्या वातावरण तापलं आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून ही योजना जुनीच असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. लाकडी निंबोडी योजना ही जुनी योजना आहे. सोलापूर जिल्ह्यात लोकांचा गैरसमज काढला पाहिजे, इंदापूर तालुक्यातील लोकांचे हक्काचे पाणी इंदापूरकरांना देत आहोत असं मत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीत व्यक्त केलं. त्यांनी म्हटलं की, इंदापूर तालुक्यातील लाकडी निंबोडी योजना फार जुनी योजना असून त्याच वेळेस पाणी अलर्ट झाले होते. आता वर्क ऑर्डर निघाली आहे सोलापुरातील माझे काही सहकारी त्याला विरोध करत आहेत की हे आमचं पाणी आहे. मात्र इंदापूर तालुक्यातील 22 गावांच्या पाण्याची नवीन जी योजना होती ती थांबली. त्याच्यामध्ये थोडा वाद झाला आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांचा गैरसमज झाला आहे. त्यांचा गैरसमज काढण्याचे काम जलसंपदा विभागाला करावा लागेल, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.
अजित पवार म्हणाले की, त्या पाण्याचे वाटप झाले आहे. प्यायला किती शेतीला किती औद्योगिक क्षेत्राला किती त्याचे नियोजन झाले आहे. पण बातम्या मात्र मला वेगल्याच वाचायला मिळतात. राष्ट्रवादीच्या काही लोकांनी त्याला विरोध केलाय.. सर्वच पक्षाच्या नेत्यांशी बोलून योजना कधीची आहे? कधी मंजूर झाली आहे ? जुन्या फायली तर टाकून राहत नाहीत याबद्दल टोकाची भूमिका घेऊन चालणार नाही, समन्वयाचीच भूमिका घ्यावी लागेल. याउलट उजनीमध्ये नीरा नदीचे पाणी टाकतोय. ही योजना मीच मंजूर केल्याचे त्यांनी सांगत. सात टीएमसी पाणी देताना कुणी त्याला विरोध केला नाही. कुणीही माहिती घेऊन विरोध करावा. पुणे जिल्ह्यातील अनेक धरणांचे पाणी इतर जिल्ह्यांमध्ये जाते पाणी हे सर्वांचे असून वेगळी भूमिका घेऊ नये कारण नसताना गैरसमज निर्माण न करता नवीन प्रश्नही निर्माण करू नयेत असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.
लाकडी निंबोडी योजना कशी आहे?
- या योजनेमुळे इंदापूर तालुक्यातील 10 गावांमधील 4337 हेक्टर क्षेत्र व बारामती तालुक्यातील 7 गावांमधील 2913 हेक्टर क्षेत्र एकूण 7250 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.
लाकडी-निंबोडी ही योजना या परिसरासाठी महत्वाची आहे. ही योजना 30 वर्षांपासून रखडली होती.
- लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजना ही भीमा (उजनी) प्रकल्पाचाच भाग असल्याने सदर योजनेस प्राधिकरणाच्या मान्यतेची आवश्यकता नाही
- निंबोडी उपसा सिंचन या योजनेस एकूण 348 कोटी 11 लाख इतक्या किंमतीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता
अशी आहे योजना …
- इंदापूर तालुक्यातील कुंभारगांव परिसरातून साधारण 765 हाँर्स पॉवर क्षमतेच्या चार विद्युत पंपाच्या साहाय्याने हे पाणी उचलून शेटफळगडे आणि निरगुडे च्या सीमेवर टाकले जाईल.
- 640 हॉर्स पॉवरचे 3 पंप व 570 हॉर्स पॉवरचे दोन विद्युत पंप त्या ठिकाणी बसवले जातील.
- इंदापूर आणि बारामती तालुक्यातील दुष्काळी पट्ट्यातील 11 हजार एकर शेती ओलिताखाली येईल.
- लाकडी निंबोडी योजना जुनी आहे. मागच्या वर्षी वर्षी उजनी धरणातील 5 टीएमसी पाणी इंदापूर तालुक्याला देण्याचा निर्णय झाला त्याला सोलापूरकरांनी विरोध केला त्यामुळे ती योजना रद्द करण्यात आली आहे..
- लाकडी निंबोडी योजना ही जुनी योजना आहे. सोलापूर जिल्ह्यात लोकांचा गैरसमज काढला पाहिजे, इंदापूर तालुक्यातील लोकांचे हक्काचे पाणी इंदापूरकारांना देत आहोत असं मत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काल बारामतीत व्यक्त केलं होतं.