एक्स्प्लोर

मोठी बातमी! डॉ. शिरीष वळसंगकर प्रकरणातील आरोपी मनीषा मुसळेला जामीन, 66 दिवसानंतर सुटका

डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्याप्रकरणात आठ दिवसांपूर्वीच पोलिसांकडून दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असून आरोपी मनीषा मुसळे हिच्यावर पोलिसानी आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवला आहे.

सोलापूर : शहरातील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात आरोपी असलेल्या मनीषा मुसळे हिला न्यायालयाने (Court) जामीन मंजूर केला आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संशयित आरोपी मनीषा मुसळे हिच्यावर खटला दाखल करण्यात आला असून तेव्हापासून ती अटकेत होती. अखेर मनीषा मुसळे हिला तब्बल 66 दिवसानंतर जामीन मंजूर करण्यात आला आहे. सोलापूर (Solapur) जिल्हा आणि सत्र न्यायालयाकडून 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर मनीषा मुसळे हिला जामीन मंजूर केला आहे. याप्रकरणी, जामीन अर्जावर 23 जून रोजीच सुनावणी पूर्ण झाली होती, त्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता.  

डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्याप्रकरणात आठ दिवसांपूर्वीच पोलिसांकडून दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असून त्यात आरोपी मनीषा मुसळे हिच्यावर पोलिसानी आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवला आहे. दरम्यान सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाने आरोपीच्या जामीन अर्जावर आज आपला निर्णय दिल्याची माहिती आरोपीचे वकील अॅड. प्रशांत नवगिरे यांनी दिली.

शिरीष वळसंगकर कोण? 

डॉ. शिरीष वळसंगकर हे सोलापुरातील न्युरोफिजिशियन होते. त्यांचे वय 69 वर्ष होते. त्यांच्या नेतृत्वाखाली S P Institute of Neurosciences हे अत्याधुनिक सुविधांसह रुग्णालय त्यांनी उभारलं आहे. डॉ. वळसंगकर यांनी सोलापूरमधील दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स येथून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी डॉ. व्ही.एम. मेडिकल कॉलेज, सोलापूर येथून MBBS, MD चे शिक्षण घेतले. लंडनमधील रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्समधून MRCP (UK) ही पदवीही मिळवली आहे. देशभरातील नामांकित मेंदूविकार तज्ञांमध्ये त्यांचा नावलौकिक होता. 1999 मध्ये हॉस्पिटल रुग्णसेवेत आले. कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असे त्यांचे एसपीएम न्यूरो हॉस्पिटल आहे. न्यूरोलॉजी संबंधी निदान, उपचार, गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया, संशोधनासाठी त्यांचे हॉस्पिटल मानांकित होते. 

मेंदू विकारासंदर्भातील शस्त्रक्रियावरील उपचाराचे शोधनिबंध त्यांनी देश, विदेशातून सादर केले आहेत. कोल्हापूरच्या सीपीआर हॉस्पिटल, कुर्डुवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे इंटर्नशीप तर डॉ. व्हीएम मेडिकल कॉलेजमधून पदव्यूत्तर प्रशिक्षण पूर्ण केले. लंडनमधील मैदा वेल न्यूरोलॉजिकल हॉस्पिटल येथे त्यांनी काहीकाळ प्रशिक्षण घेतले. बॉम्बे हॉस्पिटलमधून त्यांनी रुग्णसेवेला सुरुवात केली. वैद्यकीय सेवेशिवाय देखील ते प्रचंड हौशी होते. भारतभर प्रवास करण्यासाठी त्यांनी स्वतःचे विमान देखील खरेदी केले होते. देशातील विविध भागात ते याचं विमानाने फिरत होते. इतकंच नाही तर अनेक शिकाऊ वैमानिकांना देखील त्यांनी मार्गदर्शन केले आहे. 

हेही वाचा

मोठी बातमी! 76 लाख वाढीव मतदानासंदर्भातील याचिका हायकोर्टाने फेटाळली; प्रकाश आंबेडकरांना धक्का

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election Result 2026 All Winner List: भाजप, शिंदे गटपासून मनसे, ठाकरे गट, काँग्रेसपर्यंत...; मुंबई महानगरपालिकेतील सर्व विजयी उमेदवारांची यादी, एका क्लिकवर!
भाजप, शिंदे गटपासून मनसे, ठाकरे गट, काँग्रेसपर्यंत...; मुंबईतील सर्व विजयी उमेदवारांची यादी
लातुरात काँग्रेसकडून भाजपला 'दे धक्का'; संभाजीनगरमध्ये संजय शिरसाटांची मुलगी आघाडीवर
लातुरात काँग्रेसकडून भाजपला 'दे धक्का'; संभाजीनगरमध्ये संजय शिरसाटांची मुलगी आघाडीवर
Chhatrapati Sambhjinagar: मतमोजणीपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राडा, पोलिसांकडून कार्यकर्त्याला लाठीचार्ज, नेमकं काय घडलं?
मतमोजणीपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राडा, पोलिसांकडून कार्यकर्त्याला लाठीचार्ज, नेमकं काय घडलं?
Maharashtra Zilla Parishad Election 2026: इकडं मनपा निवडणुकीचा निकाल तिकडं आजपासून जिल्हा परिषदांची रणधुमाळी आजपासून रंगणार
इकडं मनपा निवडणुकीचा निकाल तिकडं आजपासून जिल्हा परिषदांची रणधुमाळी आजपासून रंगणार

व्हिडीओ

Special Report Voting And Fighting : व्होटिंग आणि राजकीय फायटींग, अनेक वॉर्डात बाचाबाची प्रसंग
Special Report Orange Guard :ठाकरे बंधू दक्ष,भगवा गार्डचं लक्ष,मतदान केंद्रावर पोलिसांबरोबर बाचाबाची
BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election Result 2026 All Winner List: भाजप, शिंदे गटपासून मनसे, ठाकरे गट, काँग्रेसपर्यंत...; मुंबई महानगरपालिकेतील सर्व विजयी उमेदवारांची यादी, एका क्लिकवर!
भाजप, शिंदे गटपासून मनसे, ठाकरे गट, काँग्रेसपर्यंत...; मुंबईतील सर्व विजयी उमेदवारांची यादी
लातुरात काँग्रेसकडून भाजपला 'दे धक्का'; संभाजीनगरमध्ये संजय शिरसाटांची मुलगी आघाडीवर
लातुरात काँग्रेसकडून भाजपला 'दे धक्का'; संभाजीनगरमध्ये संजय शिरसाटांची मुलगी आघाडीवर
Chhatrapati Sambhjinagar: मतमोजणीपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राडा, पोलिसांकडून कार्यकर्त्याला लाठीचार्ज, नेमकं काय घडलं?
मतमोजणीपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राडा, पोलिसांकडून कार्यकर्त्याला लाठीचार्ज, नेमकं काय घडलं?
Maharashtra Zilla Parishad Election 2026: इकडं मनपा निवडणुकीचा निकाल तिकडं आजपासून जिल्हा परिषदांची रणधुमाळी आजपासून रंगणार
इकडं मनपा निवडणुकीचा निकाल तिकडं आजपासून जिल्हा परिषदांची रणधुमाळी आजपासून रंगणार
Nashik Election Results 2026: कायद्याच्या बालेकिल्ल्यात मतदानादरम्यान जोरदार राडा, पण एकही गुन्हा दाखल नाही, चर्चांना उधाण
कायद्याच्या बालेकिल्ल्यात मतदानादरम्यान जोरदार राडा, पण एकही गुन्हा दाखल नाही, चर्चांना उधाण
Pune municipal corporation election results 2026 : याला म्हणतात पुणेकरांचा कार्यकर्त्यांचा कॉन्फिडन्स; निकाल लागण्याआधीच लावले विजयाचे बॅनर, पाहा फोटो
याला म्हणतात पुणेकरांचा कार्यकर्त्यांचा कॉन्फिडन्स; निकाल लागण्याआधीच लावले विजयाचे बॅनर, पाहा फोटो
BMC Bogus Voter : कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
BMC Exit Poll : मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
Embed widget