Solapur Crime : रिक्षाला पाठीमागून भरधाव कारची धडक, रिक्षातून बाहेर फेकल्याने तरुणीचा दुर्दैवी अंत; सोलापुरात भीषण अपघात
Solapur Crime : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठासमोर हा भीषण अपघात घडला. विद्यार्थ्यांना घेऊन निघालेल्या रिक्षाला पाठीमागून आलेल्या भरधाव कारने धडक दिल्याने हा अपघात घडला.
सोलापूर : विद्यार्थ्यांना घेऊन निघालेल्या रिक्षाला पाठीमागून आलेल्या भरधाव कारने धडक दिल्यानंतर रिक्षातून बाहेर फेकली गेल्याने महाविद्यालयीन तरुणीचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना सोलापुरात (Solapur Crime) घडली. भाग्यश्री निवृत्ती कांबळे (वय 17) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. या अपघातात ऐश्वर्या जगन्नाथ सोडगी, आदित्य सुनील भोसले हे दोन विद्यार्थी जखमी झाले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठासमोरआज (23 डिसेंबर) हा भीषण अपघात घडला. विद्यार्थ्यांना घेऊन निघालेल्या रिक्षाला पाठीमागून आलेल्या भरधाव कारने धडक दिल्याने हा अपघात घडला.
भरधाव कारने धडक दिल्यानंतर भाग्यश्री रिक्षातून बाहेर फेकली गेली
विद्यार्थ्यांना घेऊन निघालेल्या रिक्षाला पाठीमागून आलेल्या भरधाव कारने धडक दिल्यानंतर भाग्यश्री रिक्षातून बाहेर फेकली गेली. यानंतर सर्व्हिस रोडवर आपटल्याने भाग्यश्री गंभीर जखमी झाली. उपचारादरम्यान भाग्यश्रीचा मृत्यू झाला. अपघातात जखमी झालेल्या इतर दोन विद्यार्थ्यांवर सोलापुरातील खासगी रुग्णलयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, या अपघातप्रकरणी अज्ञात कार चालकाविरोधात सोलापूरच्या फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला आहे.
एपीआयचा लष्करी वाहनाच्या धडकेत मृत्यू; नाशिक पोलिस दल हळहळले
दरम्यान, नाशिकच्या (Nashik Crime) देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या कुंदन सोनोने या अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू झाला. लष्कराच्या टेम्पोचा सोनोनेंच्या दुचाकीला धक्का लागल्याने सोनोने खाली पडून गंभीर जखमी झाले होते. लष्करी जवानांनी त्यांना उपचारासाठी मिल्ट्री हॉस्पिटलला दाखल केले असता उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच नाशिक पोलिस दलामध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली.
देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात मागील तीन महिन्यांपासून एपीआय पदावर कुंदन सोनोने (रा. इंदिरानगर) कार्यरत होते. दिवसभरातील कर्तव्य बजावून झाल्यानंतर ते गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आपल्या दुचाकीने (एमएच-15-सीवाय-4140) घराकडे निघाले असतानाच वडनेर रोड परिसरात लष्कराच्या पेट्रोल पंपाजवळ सोनोने यांच्या दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने ती थेट लष्कराच्या ट्रकच्या चाकाच्या पाठीमागून खाली शिरली. अपघात झाल्याचे लक्षात येतात चालकाने जागीच ब्रेक लगावला. यानंतर तत्काळ सोनोने यांना जवानांनी गाडीच्या बाहेर काढत रुग्णालयात हलवले. मात्र, त्यांची प्राणज्योत मालवली होती.
इतर महत्वाच्या बातम्या