एक्स्प्लोर

Sharad Pawar : शिंदेंना का त्यांच्या प्रेमविवाहाची काळजी? शरद पवारांनी घेतली थेट सुशीलकुमार शिंदे यांची फिरकी

Sharad Pawar : राजकारणात एकमेकांची फिरकी घ्यायचे प्रसंग अनेकवेळा येतात . अशीच एक फिरकी शरद पवार यांनी सुशीलकुमार शिंदेंची घेतली.

सोलापूर : मंगळवेढा येथे सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांचे जुने सहकारी आणि मित्र शिवाजीराव काळुंगे यांच्या पंचाहत्तरीचा सोहळा शुक्रवार 19 जानेवारी रोजी पार पडला . यावेळी शरद पवारही (Sharad Pawar) उपस्थित होते. सुरुवातीला सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या मित्राची फिरकी घेताना काळुंगे यांच्या पत्नीकडे पाहत तुमचा प्रेमविवाह झाला का असा सवाल केला . त्यावर शरद पवार यांनी देखील आज सुशीलकुमार शिंदे यांची फिरकी घेतली. शिंदेंना त्यांच्या प्रेमविवावाहाची काळजी का असा सवाल शरद पवारांनी विचारला. 

शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे हे दोन्ही मोठे नेते दोन वेगळ्या पक्षात असले तरीही त्यांच्या मागील 40 वर्षांपासून गुरु शिष्याचे नाते आहे, हे अवघ्या महाराष्ट्राला माहित आहे.  त्यांच्या पक्षीय धोरणामुळे त्यांच्यात अनेकवेळा कटू प्रसंग देखील आले.  पण वयाच्या 80 व्या वर्षी देखील देखील हे नेते तेवढेच मोकळेपणाने वावरतात . राजकारणात एकमेकांची फिरकी घ्यायचे प्रसंग अनेकवेळा येतात . अशा गंमतीजंमतीमुळे राजकारणातील वातावरण देखील हलके फुलके होते. अशीच एक फिरकी शरद पवार यांनी घेतली. 

नेमंक काय घडलं?

सोलापुरातील मंगळवेढा येथे शुक्रवार 19 जानेवारी रोजी शिवाजीराव काळुंगे यांच्या पंचाहत्तरीचा सोहळा पार पडला. या कार्यक्रमात सुरुवातीला सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या मित्राची फिरकी घेताना काळुंगे यांच्या पत्नीकडे पाहत तुमचा प्रेमविवाह झाला का असा सवाल केला .  यानंतर त्यांनी नाही असे सांगितल्यावर काळुंगे यांची कन्या डॉ राजलक्ष्मी गायकवाड यांनी प्रेम विवाह झाल्याचे सांगितले. यानंतर शिंदे यांनी फिरकी घेत तुम्ही कितीही लपवले तरी तुमच्या मुलींनी गुपित फोडले असे सांगितल्यावर उपस्थितीत हशा पिकला. 

शरद पवारांनी घेतली सुशीलकुमार शिंदेंची फिरकी

यानंतर फिरकी घेण्याची वेळ थेट शरद पवार यांची होती. त्यांनी भाषणाला सुरुवात करतानाच शिंदे यांना त्यांच्या प्रेमविवाहाची चिंता का वाटली ते मला काही कळेना, असं म्हणत शिंदे यांनीही प्रेमविवाह केल्याचं शरद पवारांनी सांगितलं.  शिंदे यांचा प्रेमविवाह झाला तेव्हा मी महाराष्ट्राच्या विधानसभेत होतो आणि ते पोलीस खात्यात होते.  

सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जागा आहेत, तुम्हाला संधी नक्की मिळेल. तुम्ही नोकरी सोडा असा आग्रह करीत असल्याचे पवार यांनी सांगितलं . त्यावेळी शिंदे सांगायचे की, माझी कष्ट करायची तयारी आहे पण जरा घरचे समाधन करण्यासाठी नोकरी करावी लागेल. त्यामुळे प्रेमविवाह केल्यानंतर घरची समाधानाची काळजी घ्यावी लागते अशी फिरकी शरद पवारांनी घेतली. तुम्ही आता एकदा प्रेमविवाह केलाय त्यामुळे तुमची त्यातून सुटका नाही, पण  थोडे धाडस करा आणि समाजकारण आणि राजकारणात येण्याचा सल्ला शरद पवारांनी सुशीलकुमार शिंदे यांना दिला होता. 

हेही वाचा : 

Uday Samant : मुख्यमंत्रीपद गेलंय आता स्विकारायला हवं, सामंतांनी दावोस दौऱ्याचा खर्च मांडत ठाकरेंवर केली टीका

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Baba Siddiqui Murder Case : मोठी बातमी! बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात नवीन अपडेट समोर, शूटर शिवकुमारला उत्तर प्रदेशमध्ये अटक
मोठी बातमी! बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात नवीन अपडेट समोर, शूटर शिवकुमारला उत्तर प्रदेशमध्ये अटक
Video : राहुल गांधी तुम्हाला *त्या बनवत आहेत; प्रकाश आंबेडकरांचा पहिल्याच सभेतून राहुल गांधींवर हल्लाबोल
Video : राहुल गांधी तुम्हाला *त्या बनवत आहेत; प्रकाश आंबेडकरांचा पहिल्याच सभेतून राहुल गांधींवर हल्लाबोल
Mahendra Thorave : अपक्ष उमेदवाराचा प्रचार करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला आमदार महेंद्र थोरवेंची धमकी, निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार
अपक्ष उमेदवाराचा प्रचार करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला महेंद्र थोरवेंची धमकी, निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांची झाडाझडती; 1 कोटी 30 लाखांची रोकड अन् व्हॅन जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांची झाडाझडती; 1 कोटी 30 लाखांची रोकड अन् व्हॅन जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Yogendra Yadav Vastav EP 103|भाजप विरोधी पक्षांना सामाजिक चळवळींचे स्वरूप येण्याची गरज-योगेंद्र यादवWardha Truck Fire | RBI स्क्रॅप नोटांच्या ट्रकला आग, संपूर्ण नोटा जळून खाक ABP MajhaMumbai Vikroli News | 6500 किलो चांदी भरलेला टेम्पो आरटीओ अधिकाऱ्यांनी पकडला!ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07PM 10 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Baba Siddiqui Murder Case : मोठी बातमी! बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात नवीन अपडेट समोर, शूटर शिवकुमारला उत्तर प्रदेशमध्ये अटक
मोठी बातमी! बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात नवीन अपडेट समोर, शूटर शिवकुमारला उत्तर प्रदेशमध्ये अटक
Video : राहुल गांधी तुम्हाला *त्या बनवत आहेत; प्रकाश आंबेडकरांचा पहिल्याच सभेतून राहुल गांधींवर हल्लाबोल
Video : राहुल गांधी तुम्हाला *त्या बनवत आहेत; प्रकाश आंबेडकरांचा पहिल्याच सभेतून राहुल गांधींवर हल्लाबोल
Mahendra Thorave : अपक्ष उमेदवाराचा प्रचार करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला आमदार महेंद्र थोरवेंची धमकी, निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार
अपक्ष उमेदवाराचा प्रचार करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला महेंद्र थोरवेंची धमकी, निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांची झाडाझडती; 1 कोटी 30 लाखांची रोकड अन् व्हॅन जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांची झाडाझडती; 1 कोटी 30 लाखांची रोकड अन् व्हॅन जप्त
विधानसभेची खडाजंगी: आष्टी मतदारसंघात चौरंगी लढत, महायुतीत मैत्रीपूर्ण, तर बंडखोर धोंडेंचाही अपक्ष अर्ज; कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी: आष्टी मतदारसंघात चौरंगी लढत, महायुतीत मैत्रीपूर्ण, तर बंडखोर धोंडेंचाही अपक्ष अर्ज; कोण मारणार बाजी?
Mumbai Vikroli News | 6500 किलो चांदी भरलेला टेम्पो आरटीओ अधिकाऱ्यांनी पकडला!
Mumbai Vikroli News | 6500 किलो चांदी भरलेला टेम्पो आरटीओ अधिकाऱ्यांनी पकडला!
Prakash Ambedkar : मनोज जरांगेंच्या मागणीला विरोध ही भूमिका भाजपनं घ्यावी, प्रकाश आंबेडकर यांचं थेट आव्हान
ओबीसीप्रमाणं एससी-एसटी आरक्षण संकटात, प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं क्रिमिलेअरचं संकट
विधानसभेची खडाजंगी: राजकीय सन्यास घोषित केलेल्या प्रकाश सोळंकेंच्या मतदारसंघात कोण?, माजलगावमध्ये कुणाची बाजी?
विधानसभेची खडाजंगी: राजकीय सन्यास घोषित केलेल्या प्रकाश सोळंकेंच्या मतदारसंघात कोण?, माजलगावमध्ये कुणाची बाजी?
Embed widget