एक्स्प्लोर

Prakash Ambedkar : मराठा आरक्षण निर्णयानंतर आता एकनाथ शिंदेच स्ट्राँग मराठा लीडर, इतर लीडरशीप बाद: प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar : मराठा आरक्षण मोर्चानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच स्ट्राँग मराठा लीडर म्हणून समोर आले असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.

Prakash Ambedkar :  मराठा आरक्षण मोर्चाचा फायदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना होणार असून हीच हवा राहिली तर या लोकप्रियतेचे रूपांतर मतात होईल असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी म्हटले. मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) सरकारने घेतलेल्या निर्णयाबाबत आंबेडकर यांनी भाष्य केले. सरकारने घेतलेल्या निर्णयाचे विश्लेषण करताना आंबेडकर यांनी म्हटले की,  फायदा जरी शिंदे गटाला होत असला तरी भाजप पासून मात्र मराठा आणि ओबीसी हे दोन्ही समाज दूर गेले असल्याची स्थिती आहे. 

माढा येथे ओबीसी महासंघाच्या कार्यक्रमासाठी प्रकाश आंबेडकर आले होते. त्यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले की, मराठा समाजाने मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात आंदोलनाद्वारे ज्या मागण्या केल्या त्या मान्य करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच आता स्ट्राँग मराठा लीडर म्हणून पुढे आले आहेत. शिंदेच्या भूमिकेमुळे इतर मराठा नेते हे क्लीन बोल्ड झाले असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.
 

काँग्रेसच्या ताठरपणामुळे इंडिया आघाडीचे भवितव्य संपुष्टात

काँग्रेसच्या ताठरपणामुळे इंडिया आघाडीचे  राष्ट्रीय पातळीवरचे भवितव्य संपले असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.यावेळी ते म्हणाले की, काँग्रेस पक्ष एका म्यानात दोन तलवारी ठेवण्याचे काम करतोय. एकीकडे राहुल गांधीमार्फत पक्ष वाढविण्याचे काम चालू आहे. दुसरीकडे इंडिया आघाडीतून काँग्रेसचे अध्यक्ष खरगे यांना पुढे करण्याचे काम चालू आहे. भारत जोडो यात्रा पश्चिम बंगाल, बिहार या ठिकाणाहून जाणार आहे. या ठिकाणी प्रमुख असलेले तृणमूल कॉंग्रेस आणि जेडीयू यांना सामावून घेतले जात नाही. याच ठिकाणी पक्ष वाढीचा कार्यक्रम हाती घेऊन काँग्रेस इंडिया आघाडीतील प्रमुख पक्षांना राजकीयरित्या धमकावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला.काँग्रेसच्या अशा भूमिकेमुळेच केजरीवाल, ममता बॅनर्जी आणि आता नितीशकुमार यांनी वेगळी वाट धरली आहे त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडीचे भवितव्य संपले असल्याची टीका त्यांनी केली.
  
महाराष्ट्रात महाविकास आघाडीकडून 30  जानेवारीला चर्चेचे निमंत्रण आम्हाला मिळाले असून त्या चर्चेसाठी जाऊन आम्ही आमचे मुद्दे मांडू. काही मुद्द्यांवर मतभेद असतील तर ते चर्चेतून दूर करण्याचा प्रयत्न करु. राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडीचे जे झाले ते महाविकास आघाडीत व आमच्यात होऊ नये यासाठी प्रयत्न करु असे आंबेडकर म्हणाले. गेल्या काही महिन्यांपासून ओबीसी आणि मराठा समाजात दरी निर्माण झाली आहे. यापुढील काळात ती वाढू नये यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले. 

महत्त्वाच्या बातम्या

Girish Mahajan: पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, नाशिककरांना दिला मोठा शब्द!
पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली, आता नाशिकचा चेहरा मोहरा बदललेला दिसेल; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया
Satara Politics: शिवेंद्रराजेंनी साताऱ्याचे पालकमंत्री व्हावे; जयकुमार गोरेंच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण; तर शेखर गोरेंची सातारा जिल्हा बँकेसाठी पुन्हा तयारी
शिवेंद्रराजेंनी साताऱ्याचे पालकमंत्री व्हावे; जयकुमार गोरेंच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण; तर शेखर गोरेंची सातारा जिल्हा बँकेसाठी पुन्हा तयारी
Solapur News: सोशल मीडियावर माहिती पाहिली अन् मुलगी हट्ट धरून बसली; नागपंचमी पाहण्यासाठी इंग्लंडचा व्यावसायिक थेट नागोबाच्या 'शेटफळ'मध्ये दाखल
सोशल मीडियावर माहिती पाहिली अन् मुलगी हट्ट धरून बसली; नागपंचमी पाहण्यासाठी इंग्लंडचा व्यावसायिक थेट नागोबाच्या 'शेटफळ'मध्ये दाखल
Manohar Mama Bhosale Case: भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Embed widget