एक्स्प्लोर
Advertisement
पंढरपूर जवळ भीषण अपघात, कपड्याने भरलेला ट्रक जळून खाक, 70 लाख रुपयांचं नुकसान
पंढरपूरजवळ (Pandharpur) मालवाहतूक ट्रक (truck) आणि कंटेनरची समोरासमोर जोरदार धडक झाल्याची घटना घडली. या भीषण अपघातात कपड्याने भरलेला आयशर ट्रक जळून खाक झाला आहे.
Pandharpur Truck Accident : पंढरपूरजवळ (Pandharpur) मालवाहतूक ट्रक (truck) आणि कंटेनरची समोरासमोर जोरदार धडक झाल्याची घटना घडली. या भीषण अपघातात कपड्याने भरलेला आयशर ट्रक जळून खाक झाला आहे. यामध्ये 70 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. हा अपघात आज पहाटेच्या सुमारास पंढरपूरपासून पाच किलोमिटर अंतरावर असलेल्या आढीव गावाजवळ घडला आहे.
कपड्याने भरलेला ट्रक जळून खाक
दरम्यान, अपघातानंतर स्थानिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतू, आग मोठी असल्याने कपड्याने भरलेला ट्रक जळून खाक झाला आहे. यामध्ये सुमारे 70 ते 80 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या अपघातामुळे पंढरपूर कुर्डूवाडी मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन वाहतूक पूर्ववत केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
Wardha Accident: वर्ध्यात केळझर येथे ट्रॅव्हल्स बसला अपघात, 20 प्रवासी जखमी तर तिघांची प्रकृती गंभीर
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
महाराष्ट्र
भारत
क्रिकेट
Advertisement