एक्स्प्लोर

Pandharpur News : विठुरायाच्या चरणी भाविकांचे भरभरुन दान, कार्तिकी यात्रेत भाविकांची संख्या निम्मी होऊनही देवाची तिजोरी भरली 

Pandharpur News : कार्तिकी एकादशीनिमित्त विठुरायाच्या चरणी एकूण  4 कोटी 77 लाखांचे दान आले असून मागील वर्षीच्या तुलनेत या दानाच्या रकमेत वाढ झाल्याची माहिती मंदिर समितीने दिली. 

पंढरपूर : कार्तिकी यात्रेत (Kartiki Ekadashi 2023) भाविकांची संख्या निम्मी होऊनही विठुराया चरणी भरभरुन दान आले आहे. यंदाच्या कार्तिकी एकादशीनिमित्त विठुरायाच्या (Vitthal Temple) चरणी तब्बल 4 कोटी 77 लाखांचे दान आले असून देवाची तिजोरी भरली आहे. तसेच मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या उत्पन्नात 1 कोटी 56 लाखांनी वाढ झालेली आहे. मंदिर समितीचे सह अध्यक्ष श्री.गहिनीनाथ महाराज औसेकर आणि कार्यकारी अधिकारी श्री.राजेंद्र शेळके यांनी या संदर्भात माहिती दिली. 

यंदा राज्यात राज्यात सुरु असलेल्या वातावरणाचा फटका कार्तिकी यात्रेला बसला होता. ऐन दिवाळीत राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे कार्तिकीला पंढपुरात भाविकांचा ओघ कमी झाल्याचं पाहायला मिळालं.  त्यामुळे भाविकांच्या संख्येत निम्म्याने घट झाली होती. मात्र तरीही भाविकांनी लाडक्या विठुरायाला तब्बल 4 कोटी 77 लाखांचे दान दिले. यात्राकाळात सुमारे 3 लाख 40 हजार 478 भाविकांनी चरण दर्शन घेतले. तसेच 5 लाथ 71 हजार 220 भाविकांनी मुखदर्शन घेतले असल्याची माहिती देखील सह अध्यक्ष श्री.गहिनीनाथ महाराज औसेकर आणि कार्यकारी अधिकारी श्री.राजेंद्र शेळके यांनी दिली.

विविध स्वरुपात देणगी प्राप्त

या यात्रेच्या काळात मंदिर समितीस विविध माध्यमांतून देणगी प्राप्त झालीये. याची एकूण रक्कम ही 4 कोटी 77 लाख 8 हजार 268 रुपये इतकी आहे. यामध्ये  श्रींच्या चरणावर 40 लाख 15 हजार 667 रुपये देणगी स्वरुपात प्राप्त झालेत. तसेच लाडूप्रसादाच्या माध्यमातून 62 लाख 49 हजार रुपये प्राप्त झाले आहेत. भक्तनिवासातून रुपये 66 लाख 62 हजार 377 रुपये प्राप्त झालेत. सोन्या चांदीच्या भेटवस्तूंच्या माध्यमातून  8 लाख 36 हजार 254 देणगी मिळाली आहे. परिवार देवता आणि हुंडीपेटीतून रुपये 1 कोटी 57 लाख 21 हजार 527 मिळालेत. मोबाईल लॉकर  आणि इतर जमेमधून रुपये 10 लाख 94 हजार 807 इत्यादींचा समावेश आहे. 

कार्तिकीसाठी लाखो भाविकांची गर्दी

 कार्तिकी सोहळ्यासाठी पंढपुरात जवळपास 7 लाख भाविक दाखल झाले होते. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सपत्नीक विठ्ठल रुक्मिणीची महापूजा केली. सोबतच, मंदिराला 700 वर्षापूर्वीचे पुरातन रूप देण्याच्या मंदिर विकास आराखड्याचा नारळ देखील फडणवीस यांच्या हस्ते फोडण्याची तयारी मंदिर प्रशासनाने केली होती. कार्तिकीला येणाऱ्या लाखो भाविकांच्या स्वागतासाठी विठ्ठल मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मंदिराला पुण्यातील विठ्ठल भक्त राम जांभुळकर यांच्याकडून 5 टन फुलांच्या सजावटीचे काम करण्यात आले होते. 

हेही वाचा :

Nagpur News : नागपूरच्या वैद्यकीय क्षेत्रात आणखी एक मोठं पाऊल; गरजू रुग्णांच्या सेवेसाठी गंगाधरराव फडणवीस स्मृती डायग्नोस्टिक सेंटरचं लोकार्पण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनंSatej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा; अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं
अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं; राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Embed widget