एक्स्प्लोर

सोलापुरात आजही कांद्याचे लिलाव होणार नाहीत, अमित शाहंविरोधात माथाडी कामगार आक्रमक, शेकडो ट्रक कांदा बाजार समितीत पडून, शेतकरी चिंतेत

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ( Solapur Agricultural Produce Market Committee) माथाडी कामगारांनी (Mathadi workers) रात्रीपासून बंद पुकारला आहे. यामुळं शेकडो ट्रक कांदा समितीमध्येच पडून आहे.

Mathadi workers are aggressive against Minister Amit Shah  : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ( Solapur Agricultural Produce Market Committee) माथाडी कामगारांनी (Mathadi workers) रात्रीपासून बंद पुकारला आहे. यामुळं शेकडो ट्रक कांदा (Onion) समितीमध्येच लिलाव न होता पडून आहे. दरम्यान, पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि कामगरांमधील बैठक संपली आहे. बैठकीनंतर देखील माथाडी कामागर आज दिवसभर काम करणार नसल्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. आजही सोलापुरात कांद्याचे लिलाव होणार नाहीत. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ हा संप सुरु आहे.  आज माथाडी कामगारांनी अमित शाह यांच्या प्रतिमेला जोडे मारत आणि चपलांचा हार घालून निषेध केला.

शेतकऱ्यांनी बाजारात आणलेला कांदा संध्याकाळनंतर उतरवून घेतला जाणार 

दरम्यान, अमित शाह यांच्या प्रतिमेला जोडे मारत असताना पोलिस आणि माथाडी कामागारांमध्ये  झटापट झाल्याचंही पाहायला मिळालं आहे. माथाडी कामगार काम करणार नसल्याने आज दिवसभरात कांद्याचे लिलाव होणार नाहीत. मात्र, शेतकऱ्यांनी बाजारात आणलेला कांदा संध्याकाळनंतर उतरवून घेतला जाणार आहे. या कांद्याचे लिलाव उद्या सकाळी नेहमीप्रमाणे पार पडणार आहेत. माथाडी कामगार आणि बाजार समिती प्रशासनमध्ये पार पडलेल्या बैठकीनंतर माहिती देण्यात आली आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील माथाडी कामगार पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत.  

शेकडो ट्रक कांदा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल

काल मध्यरात्रीपासून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील माथाडी कामागारानी काम बंद आंदोलन सुरु केलं आहे. शेकडो ट्रक कांदा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल असताना आज कांद्याचे लिलाव देखील होणार नाहीत. तर दुसरीकडे माथाडी कामगार वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करुन आपला संताप व्यक्त करत आहेत. 

नेमकं काय म्हणाले अमित शाह?

आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर असे सारख म्हणत राहणं ही आजकाल विरोधकांत फॅशन झाली आहे. जर तुम्ही एवढ्यावेळा देवाचे नाव घेतला असता तर तुम्हाला सात जन्म स्वर्गप्राप्ती झाली असती, असे शाहांनी म्हटलं आहे. यानंतर लगेचच शाह यांनी आंबेडकर यांचे शंभर वेळा नाव घ्या, पण मी तुम्हाला आंबेडकरांबद्दल खरे काय वाटते ते सांगेन असे शाह यांनी म्हटले. 

महत्वाच्या बातम्या:

Jitendra Awhad: आंबेडकरांचं नाव घेणं फॅशन झालंय, अमित शाहांचं वक्तव्य, जितेंद्र आव्हाडांचा पलटवार, म्हणाले...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Almatti Dam Height : कर्नाटक सरकारकडून अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा घाट, पश्चिम महाराष्ट्राच्या पोटात गोळा
कर्नाटक सरकारकडून अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा घाट, पश्चिम महाराष्ट्राच्या पोटात गोळा
Rupee Falls : डॉलरच्या तुलनेत रुपया निचांकी पातळीवर, फेडच्या निर्णयानंतर शेअर बाजारही घसरला, गुंतवणूकदारांचे 3 लाख कोटी बुडाले
डॉलरच्या तुलनेत रुपया निचांकी पातळीवर, एका डॉलरसाठी किती रुपये लागणार? फेडच्या निर्णयानंतर घसरण
Ram Shinde : राम शिंदेंची विधानपरिषदेच्या सभापतीपदी बिनविरोध निवड; फडणवीस, शिंदे, अजितदादा नेमकं काय म्हणाले?
राम शिंदेंची विधानपरिषदेच्या सभापतीपदी बिनविरोध निवड; फडणवीस, शिंदे, अजितदादा नेमकं काय म्हणाले?
संघाची भूमिका बाळासाहेब ठाकरेंसारखीच आक्रमक, निलम गोऱ्हे म्हणाल्या,अजितदादांसह प्रमुख नेत्यांची फारकतच
संघाची भूमिका बाळासाहेब ठाकरेंसारखीच आक्रमक, निलम गोऱ्हे म्हणाल्या,अजितदादांसह प्रमुख नेत्यांची फारकतच
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jayant Patil Vidhanbhavan : मी शांत नाही, मला पोहोचायला उशीर झाला - जयंत पाटीलAaditya Thackeray Nagpur : अमित शाहांनी तातडीने माफी मागावी - आदित्य ठाकरेRam Shinde Vidhan Parishad : राम शिंदेंची विधान परिषद सभापतीपदी एकमताने निवडSanjay Raut Full PC : मालक तुम्ही उद्धव ठाकरे यांना फोन का केला  - संजय राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Almatti Dam Height : कर्नाटक सरकारकडून अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा घाट, पश्चिम महाराष्ट्राच्या पोटात गोळा
कर्नाटक सरकारकडून अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा घाट, पश्चिम महाराष्ट्राच्या पोटात गोळा
Rupee Falls : डॉलरच्या तुलनेत रुपया निचांकी पातळीवर, फेडच्या निर्णयानंतर शेअर बाजारही घसरला, गुंतवणूकदारांचे 3 लाख कोटी बुडाले
डॉलरच्या तुलनेत रुपया निचांकी पातळीवर, एका डॉलरसाठी किती रुपये लागणार? फेडच्या निर्णयानंतर घसरण
Ram Shinde : राम शिंदेंची विधानपरिषदेच्या सभापतीपदी बिनविरोध निवड; फडणवीस, शिंदे, अजितदादा नेमकं काय म्हणाले?
राम शिंदेंची विधानपरिषदेच्या सभापतीपदी बिनविरोध निवड; फडणवीस, शिंदे, अजितदादा नेमकं काय म्हणाले?
संघाची भूमिका बाळासाहेब ठाकरेंसारखीच आक्रमक, निलम गोऱ्हे म्हणाल्या,अजितदादांसह प्रमुख नेत्यांची फारकतच
संघाची भूमिका बाळासाहेब ठाकरेंसारखीच आक्रमक, निलम गोऱ्हे म्हणाल्या,अजितदादांसह प्रमुख नेत्यांची फारकतच
Parliament Winter Session: संसदेत धक्काबुक्की, भाजप खासदार प्रताप सारंगी जखमी; राहुल गांधींनी धक्का मारल्याचा आरोप
संसदेत धक्काबुक्की, भाजप खासदार प्रताप सारंगी जखमी; राहुल गांधींनी धक्का मारल्याचा आरोप
उत्तर कर्नाटकावर चर्चा होत मुंबईला केंद्रशासित करण्याची मागणी; काँग्रेस आमदाराने अकलेचे तारे तोडले
उत्तर कर्नाटकावर चर्चा होत मुंबईला केंद्रशासित करण्याची मागणी; काँग्रेस आमदाराने अकलेचे तारे तोडले
Aaditya Thackeray : मंत्र्यांना अजूनही खात्यांचे वाटप झालेलं नाही, निवडणूक आयोगाने दिलेल्या जनादेशाचा हा अपमान; आदित्य ठाकरेंचा इंग्रजीतून टोला
मंत्र्यांना अजूनही खात्यांचे वाटप झालेलं नाही, निवडणूक आयोगाने दिलेल्या जनादेशाचा हा अपमान; आदित्य ठाकरेंचा इंग्रजीतून टोला
Elephanta Boat Accident : दम्याच्या उपचारासाठी नाशिकचं आहेर कुटुंब मुंबईत, समुद्र सफारीचा आनंद लुटण्यासाठी नीलकमलमध्ये प्रवास केला अन्...
दम्याच्या उपचारासाठी नाशिकचं आहेर कुटुंब मुंबईत, समुद्र सफारीचा आनंद लुटण्यासाठी नीलकमलमध्ये प्रवास केला अन्...
Embed widget