Jitendra Awhad: आंबेडकरांचं नाव घेणं फॅशन झालंय, अमित शाहांचं वक्तव्य, जितेंद्र आव्हाडांचा पलटवार, म्हणाले...
Jitendra Awhad on Amit Shah statement : आंबेडकरांचे नाव घेण्याची फॅशन सध्या झाली आहे असं वक्तव्य अमित शाह यांनी केलं होतं, त्यावरून आता विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत.
पुणे: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत बोलताना आंबेडकरांचं नाव घेत एक वक्तव्य केलं होतं. त्याचे पडसाद आता उमटताना दिसत आहेत. त्यांनी त्यांच्या वक्तव्यावर माफी मागावी अशी मागणी आता विरोधकांकडून केली जात आहे. आंबेडकरांचे नाव घेण्याची फॅशन सध्या झाली आहे असं वक्तव्य अमित शाह यांनी केलं होतं, त्यावरून आता विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. अमित शाह यांनी लोकसभेत बोलताना हे वक्तव्य केलं होतं, त्याचे पडसाद आता उमटताना दिसत आहेत. आंबेडकर आंबेडकर इतकं नाव देवाचं घेतला असता तर सात जन्म स्वर्ग मिळाला असता असं वक्तव्य अमित शाह यांनी केलं आहे. त्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मिडिया एक्स वरती पोस्ट लिहून संताप व्यक्त केला आहे.
जितेंद्र आव्हाड यांची पोस्ट काय?
“अभी यह फैशन चल गया है अंबेडकर अंबेडकर अंबेडकर नाम लेने का..!
इतना नाम अगर भगवान का लेते तो स्वर्ग मिल जाता” : अमित शाह..!
"आम्हाला स्वर्ग काय असतो हे काय माहीत नाही पण त्या महामानवानीच आम्हाला नरक यातनेतून बाहेर काढले.मानवी जीवनाची ओळख त्यांनी करून दिली त्या मुळे त्यांचे नाव फैशन म्हणून घेतले जात नाही तर त्यांच्या उपकाराची जाणीव ठेऊन घेतले जाते .देवाचे नाव घ्यायचा अधिकार कुठे होता आम्हाला .तीन टक्के लोकांनी देवाला कुलूप लावून बंद करून ठेवले होते अगदी स्पष्ट जे दिले ते भीमानेच".
"डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळेच आणि त्यांनी लिहिलेल्या संविधानामुळेच, आज मागासवर्गीय समाजातील लोकांना पंतप्रधान होता आलं, आदिवासी समाजातील व्यक्तींना राष्ट्रपती होता आलं, माझ्या सारख्या भारतातील तमाम SC, ST, OBC, समाजातील लोकांना मंत्री, खासदार, आमदार होता आलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच या भारतातील तमाम नागरिकांना त्यांचे हक्क आणि अधिकार बहाल झाले. माणसाला माणूस म्हणून जगता आलं. त्यांच्या संविधानामुळेच या भारताची अखंडता टिकून राहिली, त्यांच्या संविधानामुळेच या देशाला समता-न्याय-बंधुत्वांची शिकवण मिळाली. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आम्हाला "देवापेक्षा" कमी नाहीत..!
जय भिम..!
-डॉ. जितेंद्र आव्हाड..!", अशी पोस्ट आमदाक जितेंद्र आव्हाड यांनी लिहली आहे. आता अमित शाह यांच्या वक्तव्यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत, शाहांनी माफी मागावी अशी मागणी देखील विरोधकांनी केली आहे.
“अभी यह फैशन चल गया है अंबेडकर अंबेडकर अंबेडकर नाम लेने का..!
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 18, 2024
इतना नाम अगर भगवान का लेते तो स्वर्ग मिल जाता” : अमित शाह..!#Ambedkar
आम्हाला स्वर्ग काय असतो हे काय माहीत नाही
पण त्या महामानवानीच आम्हाला नरक यातनेतून बाहेर काढले.मानवी जीवनाची ओळख त्यांनी करून दिली त्या मुळे… pic.twitter.com/mYtskFOybK
अमित शाह काय म्हणाले?
आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर असे सारख म्हणत राहणं ही आजकाल विरोधकांत फॅशन झाली आहे. जर तुम्ही एवढ्यावेळा देवाचे नाव घेतला असता तर तुम्हाला सात जन्म स्वर्गप्राप्ती झाली असती, असे शाहांनी म्हटलं आहे. यानंतर लगेचच शाह यांनी आंबेडकर यांचे शंभर वेळा नाव घ्या, पण मी तुम्हाला आंबेडकरांबद्दल खरे काय वाटते ते सांगेन असे शाह यांनी म्हटले.