माढ्यात तुतारीवर थार आणि 11 बुलेटची पैज, धैर्यशील मोहित पाटील की रणजीतसिंह निंबाळकर, कोण जिंकणार?
Madha Lok Sabha Election 2024 : माढा लोकसभेच्या निकालाबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे. अकलूजमध्ये तुतारीवर नवी कोरी थार जीपची तर माढ्यात 'तुतारी'साठीच भावंडांनी 11 बुलेटची पैज लावली आहे.
![माढ्यात तुतारीवर थार आणि 11 बुलेटची पैज, धैर्यशील मोहित पाटील की रणजीतसिंह निंबाळकर, कोण जिंकणार? Madha Lok Sabha Election 2024 ranjeetsingh naik nimbalkar vs dhairyasheel mohite patil Thar car and 11 bullets bet माढ्यात तुतारीवर थार आणि 11 बुलेटची पैज, धैर्यशील मोहित पाटील की रणजीतसिंह निंबाळकर, कोण जिंकणार?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/21/82a6013022a54381f96947887753456d1716296790903265_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Madha Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील सर्व 48 जागांसाठी मतदान झाल्यानंतर आता निकालाबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे. राज्यातील अतिशय अटीतटीच्या झालेल्या निवडणुकांच्या निकालाची उत्कंठा शिगेला पोचण्यास सुरुवात झाली आहे . माढा लोकसभा मतदारसंघ पहिल्यापासूनच चर्चेत राहिलेला मतदारसंघ असून येथे भाजपचे विद्यमान खासदार रणजित निंबाळकर विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात अतिशय चुरशीची लढत झाली. माढ्यामध्ये मनोज जरांगे यांचा इफेक्ट मोठ्या प्रमाणात दिसून आला होता. आता निकाल कुणाच्या बाजूने लागणार, याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. भाजप आणि राष्ट्रवादी दोन्ही बाजूने आपल्या विजयाचे दावे केले जात आहेत. तुतारी समर्थकही आपल्या विजयावर ठाम असल्याचे दिसत आहेत . यातूनच अकलूजमधील तुतारी समर्थकांने नवी कोरी थार जीपची पैज लावण्याचे आवाहन दिले आहे तर माढा तालुक्यातील दोन भावानी चक्क 11 नव्या बुलेट देण्याची पैज लावली आहे . आता हे आव्हान भाजप समर्थक अनुप शहा यांनी स्वीकारले असून तुम्ही जेवढ्या बुलेटची पावती कराल तेवढ्या बुलेटची मी पावती करायला तयार असल्याचे आव्हान शहा यांनी पाटील बंधूना दिले आहे . यामुळे आता या सर्व प्रकारात रंगात वाढत जाणार असून निवडणुकीवर सट्टाबाजी करणे कायदेशीर गुन्हा असला तरी या राजकीय पैजेवरून राजकारण तापत जाणार आहे .
यानंतर मोहिते-पाटील यांचे समर्थक आणि माढा तालुक्यातील योगेश पाटील व नीलेश पाटील या युवा शेतकरी भावंडांना माढ्यातून तुतारीच निवडून येणार, असा आत्मविश्वास आहे. यातूनच त्यांनी चक्क भाजपसह समर्थकांना 11 बुलेटच्या पैजेचे चॅलेंज दिले आहे. हे चॅलेंज भाजपसह रणजितसिंह निंबाळकरांच्या समर्थकांकडून अद्याप स्वीकारले नसून 11 बुलेटची किंमत ३० लाखांहून अधिक होते. माढा लोकसभा मतदारसंघात भाजपविरोधी वातावरण आणि शरद पवारांसह मोहिते-पाटलांविषयी निर्माण झालेली सहानुभूती यामुळे माढ्यात मोहिते-पाटील निवडून येतील असा विश्वास माढा तालुक्यातील बावी या गावाच्या पाटील बंधूना आहे. त्यामुळे योगेश व निलेश पाटील या दोघा भावंडांना भाजप पराभूत होण्याचा आत्मविश्वास असल्याने भाजपच्या समर्थकांना चॅलेंज दिले आहे. यासाठी कोणी भाजप समर्थक पुढे आल्यास पैज स्वीकारेल ते दोघेही बुलेटच्या शोरूममध्ये जाऊन बुकिंग करून पैसे भरायचे जो विजेता होईल तो 11 बुलेटची शर्यत जिंकणार. ही सर्व शर्यत नागरिकांच्या उपस्थितीत नोटरीवर रीतसर ठरवली जाणार आहे.
आता याला भाजपच्या अनुप शहा यांनी चोख उत्तर देत पैंजेसाठी जेवढ्या बुलेटच्या पावत्या दाखवाल, तेवढ्या पावत्या करून मी पैज स्वीकारत असून माढा लोकसभेतून भाजपचे रणजित निंबाळकर हेच मोठ्या मताने विजयी होणार असल्याचे सांगितले आहे. आता पाटील बंधू हे भाजपच्या उत्तरानंतर आपल्या पैजेवर कायम राहतात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे .
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)