एक्स्प्लोर

Dr Valsangkar Death Case: डॉ. शिरीष वळसंगकर मृत्यूप्रकरणात आता मोठी मागणी, गूढ गोष्टींच्या उलगड्याची शक्यता

Dr Valsangkar Death Case: स्थानिक पोलिसांच्या तपासानुसार सध्या हॉस्पिटल कर्मचारी मनीषा माने याच संशयाच्या भोवऱ्यात आहे. पोलिसांचा तपास योग्य सुरु असला तरी त्याची गती फार संथ आहेत.

सोलापूर: सोलापुरातील प्रसिद्ध वैद्यकीय तज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर (Dr Shirish Valsangkar) यांच्या आत्महत्या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रहार जनशक्ती पक्षाने डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणाचा तपास CID कडे देण्याची मागणी केली आहे. न्यूरोलॉजिस्ट डॉ. शिरीष वळसंगकर  (Dr Shirish Valsangkar) यांच्या आत्महत्या प्रकरणी सीआयडी चौकशी केल्यास अनेक गूढ समोर येण्याची शक्यता असल्याचा दावा प्रहारने केला आहे. स्थानिक पोलिसांच्या तपासानुसार सध्या हॉस्पिटल कर्मचारी मनीषा माने याच संशयाच्या भोवऱ्यात आहे. पोलिसांचा तपास योग्य सुरु असला तरी त्याची गती फार संथ आहेत, यामुळे देखील वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे ह्या प्रकरणाचा तपास CIDकडे वर्ग करण्याची प्रहार संघटनेचे शहर प्रमुख अजित कुलकर्णी यांची मागणी केली आहे. 

वळसंगकरांची सून डॉ. सोनाली परदेशात गेल्याची चर्चा

डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणी हॉस्पिटलच्या प्रशासकीय अधिकारी मनीषा माने विरोधात गुन्हा दाखल आहे. पोलिस संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहे, मात्र, अद्याप ठोस असं काही सापडलं नसल्याची चर्चा आहे. तर डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात कुटुंबियांचे जबाब देखील या आधीच पोलिसांनी नोंदवले आहेत. या प्रकरणाचा अद्याप उलगडा झालेला नसताना डॉ. सोनाली ह्या परदेशात गेल्याची चर्चा आहे. मात्र, या चर्चांना पोलिसांनी कोणताही अधिकृत दुजोरा दिलेला नाही. डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येनंतर एकापाठोपाठ एक धक्कादायक घडामोडी घडत आहेत. मात्र, या प्रकरणाच्या तपास अद्याप पुर्ण झालेला नाही. वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी हॉस्पिटलची संशयित कर्मचारी मनीषा मुसळे-माने हिला अटक झाली होती. मुलगा डॉ. आश्विन आणि सून डॉ. सोनाली यांची चौकशी करण्यात आली आहे, डॉ. शिरीष यांनी लिहिलेल्या चिठ्ठीवरून तपास सुरू आहे.

दरम्यान वळसंगकर यांची सून डॉ. सोनाली आणि त्यांचे वडील डॉ. दिलीप जोशी यांनी दोन दिवसांपासून सोलापूर सोडल्याची चर्चा आहे. दोघे भारत सोडून गेल्याचीही दबक्या आवाजात कर्मचार्‍यांमध्ये चर्चा आहे. डॉ. दिलीप जोशी यांचा मुलगा अमेरिकेमध्ये आहे. त्यामुळे ते दोघे अमेरिकेला गेल्याचं बोललं जातं आहे. काहीजण सांगत आहेत. डॉ. सोनाली या आता मुंबई येथे स्थायिक होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच ते गेले असल्याचेही काही कर्मचार्‍यांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे डॉ. शोनाली या 30 मे नंतर ओपीडी पाहणार आहेत, असेही काही कर्मचार्‍यांकडून सांगण्यात येत आहे. या सर्व चर्चा सुरू असताना ते दोघे नेमके कुठे गेले याची कोणालाच कल्पना नाही. यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

कोण होते डॉ. शिरीष पद्माकर वळसंगकर?

 डॉ. शिरीष वळसंगकर हे सोलापुरातील न्युरोफिजिशियन होते. त्यांचे वय 69 वर्ष होते. त्यांच्या नेतृत्वाखाली S P Institute of Neurosciences हे अत्याधुनिक सुविधांसह रुग्णालय त्यांनी उभारलं आहे. डॉ. वळसंगकर यांनी सोलापूरमधील दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स येथून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी डॉ. व्ही.एम. मेडिकल कॉलेज, सोलापूर येथून MBBS, MD चे शिक्षण घेतले. 

लंडनमधील रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्समधून MRCP (UK) ही पदवीही मिळवली आहे. देशभरातील नामांकित मेंदूविकार तज्ञांमध्ये त्यांचा नावलौकिक होता. 1999 मध्ये हॉस्पिटल रुग्ण सेवेत आले. कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असे त्यांचे एसपीएम न्यूरो हॉस्पिटल आहे. न्यूरोलॉजी संबंधी निदान, उपचार, गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया, संशोधनासाठी त्यांचे हॉस्पिटल मानांकित होते. 

मेंदू विकारासंदर्भातील शस्त्रक्रियावरील उपचाराचे शोधनिबंध त्यांनी देश, विदेशातून सादर केले आहेत. कोल्हापूरच्या सीपीआर हॉस्पिटल, कुर्डुवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे इंटर्नशीप तर डॉ. व्हीएम मेडिकल कॉलेजमधून पदव्यूत्तर प्रशिक्षण पूर्ण केले. लंडनमधील मैदा वेल न्यूरोलॉजिकल हॉस्पिटल येथे त्यांनी काहीकाळ प्रशिक्षण घेतले. बॉम्बे हॉस्पिटलमधून त्यांनी रुग्णसेवेला सुरुवात केली. वैद्यकीय सेवेशिवाय देखील ते प्रचंड हौशी होते. भारतभर प्रवास करण्यासाठी त्यांनी स्वतःचे विमान देखील खरेदी केले होते. देशातील विविध भागात ते याचं विमानाने फिरत होते. इतकंच नाही तर अनेक शिकाऊ वैमानिकांना देखील त्यांनी मार्गदर्शन केले आहे. 

डॉ. वळसंगकर यांच्या आत्महत्येपूर्वीचा घटनाक्रम 

शुक्रवारी (18 एप्रिल) रात्री 8 वा. एस.पी ऑफ न्युरो सायन्सेस येथे रुग्णांची तपासणी करून घरी परतले. रात्री 8:30 बेडरूमच्या बाथरूममधून बंदुकीच्या गोळीचा आवाज आला. त्यानंतर दुसरी राउंड फायर झाल्यावर कुटुंबीयांनी बेडरूममध्ये धाव घेतली. यावेळी डॉ. शिरीष वळसंगकर हे रक्ताच्या थारोळ्यात माखलेले दिसले.  रात्री 9 वा. त्यांच्याच रुग्णालयामध्ये डॉ. शिरीष वळसंगकर यांना दाखल करण्यात आले.  मुलगा डॉ. अश्विन आणि सून डॉ. शोनाली यांच्यासह 5 तज्ञ डॉक्टरांनी जवळपास पाऊण तास त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. रात्री 10:20 मिनिटांनी डॉक्टर शिरीष वळसंगकर यांना मृत घोषित करण्यात आले. रात्री 10:30 वा. पोलीस उपायुक्त विजय कबाडे हे घटनास्थळी दाखल झाले आणि बेडरूम सील केले. रात्री 10 : 45 वा. फॉरेन्सिकची टीम दाखल झाली आणि बेडरूममधील बंदूक काडतूस, रक्ताचे नमुने घेतले.

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील सहा वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील चार वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी कार्यरत. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Karmala : करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
Ladki Bahin Yojana :  पती किंवा वडिलांचं निधन झालेल्या लाडक्या बहिणींसाठी वेबसाईटमध्ये बदल होणार, 18 नोव्हेंबरपूर्वी एक काम करावं लागणार
पती-वडील नसलेल्या लाडक्या बहिणींसाठी ई-केवायसी वेबसाईटमध्ये बदल, मात्र एक काम करावं लागणार
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
नांदेड हादरलं! 16 वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या खुनाचा बदला मुलाने घेतला; दुकानात शिरुन हत्या
नांदेड हादरलं! 16 वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या खुनाचा बदला मुलाने घेतला; दुकानात शिरुन हत्या
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report Srinagar Blast : श्रीनगरमध्ये स्फोटामुळे खळबळ,अपघाती स्फोट टाळता आला नसता?
Special Report Army Mono Rail चीनच्या सीमेवर,भारताची मोनो;16 हजार फुटांवर लष्करांच्या मदतीला मोनोरेल
Mahapalikecha Mahasangram Pune गुन्हेगारीवर आळा कधी? वाहतूक कोंडी कधी सुटणार?;पालिका निवडणूक चुरशीची
Mahapalikecha Mahasangram Jalna जालन्यात व्यापाऱ्यांच्या पक्षांकडून अपेक्षा काय? कोण मारणार बाजी?
Mahapalikecha Mahasangram Mira Bhayandar : कोण मारणार मिरा-भाईंदरमध्ये बाजी? स्थानिकांना काय वाटतं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karmala : करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
Ladki Bahin Yojana :  पती किंवा वडिलांचं निधन झालेल्या लाडक्या बहिणींसाठी वेबसाईटमध्ये बदल होणार, 18 नोव्हेंबरपूर्वी एक काम करावं लागणार
पती-वडील नसलेल्या लाडक्या बहिणींसाठी ई-केवायसी वेबसाईटमध्ये बदल, मात्र एक काम करावं लागणार
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
नांदेड हादरलं! 16 वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या खुनाचा बदला मुलाने घेतला; दुकानात शिरुन हत्या
नांदेड हादरलं! 16 वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या खुनाचा बदला मुलाने घेतला; दुकानात शिरुन हत्या
Dhule: हृदयद्रावक! आईची पोटच्या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन विहिरीत उडी, 30 फुट खोल पाण्यात बुडून मृत्यू
हृदयद्रावक! आईची पोटच्या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन विहिरीत उडी, 30 फुट खोल पाण्यात बुडून मृत्यू
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
लोकांनी राहुल गांधींना गटांगळ्या खायला लावल्या;राधाकृष्ण विखे पाटलांची बोचरी टीका,शरद पवारांनाही टोला
लोकांनी राहुल गांधींना गटांगळ्या खायला लावल्या;राधाकृष्ण विखे पाटलांची बोचरी टीका,शरद पवारांनाही टोला
मुंबईत इमारतीच्या पायाभरणीवेळी दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 कामगारांचा मृत्यू, 3 जखमी
मुंबईत इमारतीच्या पायाभरणीवेळी दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 कामगारांचा मृत्यू, 3 जखमी
Embed widget