(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chhagan Bhujbal : मला मंत्रिपदाची पर्वा नाही, मी थांबायला तयार, समोरच्यांना सांगा ओबीसींच्या ताटातून आरक्षण घेणं चूक, छगन भुजबळांचा जरांगे पाटलांवर बोचरा वार
पंढपुरातील ओबीसी एल्गार मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला.
पंढरपूर : काही जण म्हणत होते की तुम्ही मराठा ओबीसी ते जालनावाले मला सातत्याने शिव्या देत होते. मला त्याचं नावही घ्यायचं नाही. पण जेव्हा बीड पेटवंल त्यावेळी ती लोकं कशी वाचली. त्यांना जाऊन सांगा एका समाजाच्या मागणीसाठी शहर बंद करणं चूक आहे, असं म्हणत छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) मनोज जरांगेवर (Manoj Jarange) थेट वार केला.
मी थांबायला तयार आहे. समोरच्यांना सांगा ओबीसीतून आरक्षण घेणं चूक आहे. घरं पेटवणं चूक, शासनाला धमकी देणे चूक , बलिषपणाच्या मागण्या करणे थांबवा म्हणून सांगा त्यांना. आहे का धाडस ? त्यांच्याकडे मते मग आमचीही मते द्यायच्या वेळी किंमत चुकवू असा थेट इशारा भुजबळांनी यावेळी दिलाय.
मला धमक्या देऊ नका - छगन भुजबळ
मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावे या मागणीवर मनोज जरांगे हे ठाम आहेत. त्यामुळे मनोज जरांगे आणि छनग भुजबळ यांच्यात सातत्याने टीका सत्र सुरु आहे. आजच्या ओबीसी मेळाव्यातून देखील भुजबळांनी जरांगेंवर निशाणा साधला. मला धमक्या देऊ नका. शरीफ है हम लेकीन किसी के बाप से डरते नाही. चप्पल खायला आम्ही काय नाबर आहोत ? असं म्हणत भुजबळ पुन्हा एकदा बरसले.
त्यांचं पाप त्यांच्याच पदरात टाकणार
आम्ही घडवणारे फोडणारे नाही, आम्ही पेटवणार नाहीत. आम्ही काय नामर्द नाही. लढेंगे हर दिन डरे नही हे जितेंगे हर दिन हम मरे नही हे. त्यामुळे आम्ही त्यांचं पाप त्यांच्याच पदरात टाकू. काही झालं तरी 54 टक्के आम्ही आहोत, इतरही आमच्यासोबत आहोत. सगळे तेच म्हणतातय जातगणना करा,मग करा ना. फक्त एकतर्फी मराठा आयोग नेमलाय त्या मी ओबीसी आयोग मानतच नाही.
आरक्षण हे गरिबी आणि श्रीमंतीवर नाही
यांची 200 पोरं गाड्या घेऊन मुंबईत गेलीत कुठल्या मैदानावर उपोषण करायचं ते पाहण्यासाठी. सारखं आमची पोरं गरीब असं म्हटलं जातं. पण आरक्षण हे गरिबी आणि श्रीमंतीवर नाही. हे आरक्षण ज्या समाजाला काही मिळत नाही त्यांच्यासाठी नाही. त्यामुळे आरक्षण हे तुम्हाला तुम्ही श्रीमंत आहात याच्यावर नाही, तुम्ही सामाजिक दृष्ट्या किती मागलेले आहात याच्यावर अवलंबून आहे. मंत्रालयातही 54 टक्के मराठा समाजाची माणसं आहे, असं म्हणत भुजबळांनी मनोज जरांगे यांच्यावर थेट वार केला.