(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chhagan Bhujbal : नाही म्हणजे नाहीच, ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही, भुजबळांचा ओबीसी मेळाव्यात एल्गार
Chhagan Bhujbal : पंढपुरात ओबीसी समाजाकडून एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक ओबीसी नेते उपस्थित होते.
पंढरपूर : आज अन्याय करणारे बदलेल आहेत, ज्योतिबांनी जेव्हा शाळा काढण्याचं काम हाती घेतलं त्यांच्यासोबत अनेक ब्राम्हण देखील होते. त्यांना ब्राम्हणांनी मदत केली. काहीही झालं तरी आम्ही ओबीसीतून आरक्षण घेऊ देणार नाही. असं छगन भुजबळांनी (Chhagan Bhubaj) म्हटलं ओबीसींच्या एल्गार मेळाव्यात म्हटलं. पंढरपुरात ओबीसी महाएल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ओबीसी समाजातील महत्त्वाचे नेते व्यासपीठावर उपस्थित होते.
पांडुरंग सगळ्यांचा आहे
हा पांडुंरग सगळ्याचा आहे. मी मागच्या वेळी देखील सगळ्या संतांची नावं वाचून दाखवली होती. या सगळ्या संतांचं म्हणणं एकच आहे. सगळे एकत्र येऊ. निवडणूक आली की सगळ्या पक्षांचे नेते पांडुरंगाचं दर्शन घ्यायला जातात. तेव्हा त्यांना अडवलं जात नाही. मग आरक्षणाच्या वेळेसच का अडवलं जातं, असा सवाल भुजबळांनी यावेळी उपस्थित केला.
ओबीसीमधून आरक्षण मिळणार नाही
ओबीसी समाजातून मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही म्हणजे नाही. आरक्षण स्वतंत्र्य घ्या. ओबीसीमधून आरक्षण तुम्हाला मिळणार नाही, असं देखील भुजबळांनी म्हटलं. आमचा मराठा आरक्षणाला आणि मराठा समाजालाही विरोध नाही. पण आरक्षणाखाली जी झुंडशाही सुरु आहे, त्याला आमचा विरोध आहे, असं भुजबळांनी म्हटलं.
ती मावळ्यांची सेना होती
शिवरायांच्या नावावरुन आम्हाला बोललं जातं. पण लक्षात ठेवा छत्रपतींची मराठा सेना नव्हती ती मावळसेना होती. छत्रपतींची समाधी ही महात्मा फुलेंनी शोधून काढली. पहिली शिवजयंती फुलेंनी सुरु केली. पहिला पोवाडा फुलेंनी सुरु केला. शिवाजी महाराजांचं नाव घेता आणि आमच्यावर हल्ले करता असा सवाल देखील भुजबळांनी यावेळी उपस्थित केला.
आरक्षण हे गरिबी आणि श्रीमंतीवर नाही
यांची 200 पोरं गाड्या घेऊन मुंबईत गेलीत कुठल्या मैदानावर उपोषण करायचं ते पाहण्यासाठी. सारखं आमची पोरं गरीब असं म्हटलं जातं. पण आरक्षण हे गरिबी आणि श्रीमंतीवर नाही. हे आरक्षण ज्या समाजाला काही मिळत नाही त्यांच्यासाठी नाही. त्यामुळे आरक्षण हे तुम्हाला तुम्ही श्रीमंत आहात याच्यावर नाही, तुम्ही सामाजिक दृष्ट्या किती मागलेले आहात याच्यावर अवलंबून आहे. मंत्रालयातही 54 टक्के मराठा समाजाची माणसं आहे, असं म्हणत भुजबळांनी मनोज जरांगे यांच्यावर थेट वार केला.
आकाश पाताळ एक करु
भुजबळांना मंत्रिपदाची पर्वा नाही. मंत्रिमंडळातही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसमोर जे बोलायचं ते बोललोय मी. त्यामुळे मतांकडे पाहून तुम्ही भाषणं करु नका मतं आमच्याकडेही आहेत. आम्ही विकास करण्यासाठी आकाश पाताळ एक करु, असं भुजबळांनी म्हटलं.