एक्स्प्लोर

Bagalkot : 25 ऑगस्टपर्यंत महाराजांच्या पुतळ्याची सन्मानाने पुनर्उभारणी करा; कर्नाटकात भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांचा सरकारला इशारा

शिवरायांच्या पुतळ्याची सन्मानाने पुन्हा प्रतिष्ठापना करा, अन्यथा आम्ही पुढील संघर्षाची तयारी करू अशा इशारा आंदोलनाकर्त्यांनी दिला. आंदोलकांनी कर्नाटक सरकारच्या आदेशाने काम केल्याचा आरोप केला आहे.

बागलकोट (कर्नाटक) : कर्नाटकातील बागलकोटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा (Shivaji Maharaj) पुतळा जिल्हा प्रशासनाकडून हटवण्यात आल्यानंतर चांगलाच वाद पेटला आहे. सोनार एक्स्टेंशन येथील पुतळा विनापरवाना उभारण्यात आल्याने शहर महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने 15 ऑगस्ट रोजी काढला होता. आंदोलकांनी स्थानिक प्रशासनावर कर्नाटक सरकारच्या आदेशाने काम केल्याचा आरोप केला आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यानंतर आज भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढत कर्नाटकातील काँग्रेस सरकारला अल्टीमेटम दिला आहे. 25 ऑगस्टपर्यंत शिवरायांच्या पुतळ्याची सन्मानाने पुनर्उभारणी  करा, अन्यथा आम्ही पुढील संघर्षाची तयारी करू अशा इशारा आंदोलनाकर्त्यांनी दिला. 

बागलकोटमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा जिल्हा प्रशासनाने हटवल्याच्या निषेधार्थ भाजप, हिंदु जागरण मंचसह विविध हिंदुत्ववादी संघटनांतर्फे निषेध मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाचे रूपांतर बसवेश्वर चौक येथे जाहिर सभेत झाले. या जाहीर सभेत जिल्हा प्रशासनाचा तसेच कर्नाटकातील काँग्रेस सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी बागलकोटचे माजी आमदार डॉ. वीरण्णा चरणीमठ, माजी आमदार नारायणसा भंडगे, भाजप पक्षाचे नेते आणि विविध हिंदुत्ववादी संघटनांचे नेत्यांनी सरकारचा निषेध केला. यावेळी बोलताना हिंदू जागरण मंचच्या जिल्हा समन्वयक श्रीकांता होस्केरी यांनी 25 ऑगस्टपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्याच जागेत पुन्हा बसवावा, अन्यथा पुढील संघर्षाची तयारी करावी लागेल, असा इशारा दिला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन देखील देण्यात आले.

तर आम्ही आंदोलन थांबवू 

बागलकोटचे माजी आमदार नारायणसा भडंगे म्हणाले की, छत्रपती शिवरायांच्या मूर्तीची प्रतिष्ठापणे संदर्भात नगरपालिकेत ठराव झाला होता. वेगवेगळ्या विभागाच्या एनओसी घेऊनच आम्ही 14 ऑगस्ट रोजी शिवरायांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. मात्र, तरीदेखील जिल्हा प्रशासनाने छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवलेला आहे. आम्ही तीन दिवस त्या ठिकाणी धरणे आंदोलन केले. त्यावेळी पोलिसांनी आम्हाला ताब्यात देखील घेतले. आज आम्ही जिल्हा प्रशासनाच्या कारवाई विरोधात बागलकोट येथे मोठा मोर्चा काढला, यामध्ये जवळपास दहा हजार लोक सहभागी झाले होते. आम्ही प्रशासनाला 25 ऑगस्ट पर्यंतची मुदत दिली आहे. प्रशासनाने स्वतःहून जर शिवरायांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली तर आम्ही आंदोलन थांबवू. अन्यथा आम्ही 18 फूट उंच अश्वारूढ शिवरायांची मूर्ती त्याच जागी प्रतिष्ठापना करू. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vile Parle Redevelopment | 360 च्या बदल्यात 1400 स्क्वेअर फुटचं घर Special ReportRajkiya Shole Beed MCOCA | देशमुख हत्येप्रकरणी 8 जणांना मकोका, अडकणार 'आका' Special ReportRajkiya Shole on MVA | ठाकरेंच्या सेनेच्या स्वबळाचा नारा, मविआचं ब्रेकअप? Special ReportSantosh Deshmukh Case | संतोष देशमुखांच्या हत्येच्या आधी काय घडलं? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Embed widget