एक्स्प्लोर

Solapur News: सोलापुरात जिल्हाधिकाऱ्यांचा वाहन चालक असल्याचे सांगत सोनाराला गंडा, सराफाची साडेचार लाखांची फसवणूक; गुन्हा दाखल

दुकानात येऊन आठ अंगठ्या आणि तीन लॉकेट असा जवळपास साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल खरेदी केला. 

सोलापूर : सोलापुरात (Solapur News) एका ठगाने जिल्हाधिकारी कार्यालयात वाहन चालक असल्याची बतावणी करत सोनाराला गंडा घातला आहे. तब्बल 8 सोन्याच्या अंगठ्या आणि तीन लॉकेट घेऊन हा चोर पसार झाला. यांसदर्भात सोनार अयाज मुल्ला यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यत फिर्याद दिली आहे. 

17 ऑगस्ट गुरुवार रोजी आज मुल्ला यांच्या विजापूर नाका परिसरात असलेल्या निहाल ज्वेलर्स या दुकानात एक व्यक्ती आला. आपण जिल्हाधिकारी कार्यालयात वाहन चालक आहोत. जिल्हाधिकारी हे बैठकीला आलेल्यांना सोन्याची अंगठी आणि लॉकेट भेट देणार आहेत, अशी बतावणी केली. सुरुवातीला या चोरट्याने सोनार दुकानातील एका व्यक्तीला जिल्हाधिकारी कार्यालयात सोबत नेले. जिल्हाधिकारीएका बैठकीत असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील व्यक्तीने मुल्ला यांना थोडा वेळ बसण्यास सांगितले.जिल्हाधिकाऱ्यांना बैठकीसाठी वेळ लागत असल्याचे सांगितले. मुल्ला यांचा आरोपीवर विश्वास बसला. आरोपीने दुकानात जाऊन सोने खरेदी करून जिल्हाधिकाऱ्यांना दाखवू असे म्हणत परत दुकानात आले. त्यानंतर पुन्हा दुकानात येऊन आठ अंगठ्या आणि तीन लॉकेट असा जवळपास साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल खरेदी केला. 

आठ अंगठ्या आणि लॉकेटसह साडेचार लाख रुपयांचा माल चोरीला 

आठ अंगठ्या आणि तीन लॉकेट खरेदी  केल्यानंतर  बील जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्यावर देतो असे देखील सांगितले. त्यानंतर सोनार आणि आरोपी हे दोघेही आठ अंगठ्या आणि लॉकेटसह जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. येथे आल्यानंतर आरोपीने सोनारास प्रतीक्षा कक्षात बसवले. अंगठीचे सॅम्पल दाखवून येतो असे सांगून आरोपी तिथून निघून गेला. बराच वेळ झाल्यानंतर ही आरोपी न आल्याने सोनाराने जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना विचारपूस केली. तेव्हा हा सगळा प्रकार उघडकीस आला. 

सीसीटीव्हीच्या मदतीने शोध सुरू

जिल्हाधिकारी कार्यालयात हा प्रकर घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सोलापूर पोलिस या प्रकरणाचा अधिका तपास करत आहे. सीसीटीव्हीवरून संशयिताचा शोध घेत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातून आरोपी बाहेर पडल्यानंतर ज्या रिक्षातून गेला त्या रिक्षा चालकाची देखील चौकशी केली, मात्र पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. त्याने बनावट नावाचा वापर करून फसवणूक केले आहे. आरोपी हा पोलीसांच्या रेकॉर्डवर नसून त्याला शोधण्यासाठी पोलीसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने शोध सुरू आहे

हे ही वाचा :                  

 

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

वारकऱ्यांसाठी आनंदीची बातमी! आषाढीला पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांसाठी ST महामंडळाची नवीन योजना, मंत्री सरनाईकांची माहिती
वारकऱ्यांसाठी आनंदीची बातमी! आषाढीला पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांसाठी ST महामंडळाची नवीन योजना, मंत्री सरनाईकांची माहिती
Solapur Crime News: 74 मिनिटे ट्रेन थांबली संधी साधत दरोडेखोर घुसले; महिलेची 5 तोळ्यांची चैन ओढली, दगडफेकीत प्रवासी जखमी, यशवंतपूर-बिकानेर एक्स्प्रेसमध्ये पहाटेच्या सुमारास थरार
74 मिनिटे ट्रेन थांबली संधी साधत दरोडेखोर घुसले; महिलेची 5 तोळ्यांची चैन ओढली, दगडफेकीत प्रवासी जखमी, यशवंतपूर-बिकानेर एक्स्प्रेसमध्ये पहाटेच्या सुमारास थरार
Solapur News : तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
वीज आणि पाणी द्या, अन्यथा कर्नाटकात जाण्याची परवानगी द्या, सोलापुरातील ग्रामस्थ आक्रमक, पालकमंत्री गोरेंसमोर मांडली व्यथा 
वीज आणि पाणी द्या, अन्यथा कर्नाटकात जाण्याची परवानगी द्या, सोलापुरातील ग्रामस्थ आक्रमक, पालकमंत्री गोरेंसमोर मांडली व्यथा 

व्हिडीओ

Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप
Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेतून 92 लाख लाभार्थी वगळले
Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India : टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
INDW vs ENGW: भारताच्या लेकींनी लॉर्डसवर इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, क्रांती गौड, यास्तिका भाटियाची दमदार कामगिरी
भारताच्या लेकींनी इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, लॉर्डसवरील पहिल्याच कसोटीत विजयाचा झेंडा रोवला
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मुंबईतील सिमेंट रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पाची SIT चौकशी करा; अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका, काँग्रेसचा इशारा
मुंबईतील सिमेंट रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पाची SIT चौकशी करा; अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका, काँग्रेसचा इशारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2026 | सोमवार
सर्वोच्च न्यायालयाने गोहत्या बंदी आदेशाला स्थगिती दिली; हायकोर्टाच्या आदेशात सुधारणा करणे आवश्यक असल्याचे सुतोवाच
सर्वोच्च न्यायालयाने गोहत्या बंदी आदेशाला स्थगिती दिली; हायकोर्टाच्या आदेशात सुधारणा करणे आवश्यक असल्याचे सुतोवाच
Beed Crime : IT इंजिनियरलाच सायबर ठगांचा गंडा! शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली पावणेआठ लाखांची फसवणूक; बनावट सेबी प्रमाणपत्र पाठवले
IT इंजिनियरलाच सायबर ठगांचा गंडा! शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली पावणेआठ लाखांची फसवणूक; बनावट सेबी प्रमाणपत्र पाठवले
गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसचा प्रसार, एका महिन्यात 12 मुलांचा मृत्यू, 3 जणांना संसर्ग; अद्याप लस सुद्धा नाही!
गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसचा प्रसार, एका महिन्यात 12 मुलांचा मृत्यू, 3 जणांना संसर्ग; अद्याप लस सुद्धा नाही!
Embed widget