Ashadhi wari 2023 : उजनीतून सोडलेलं पाणी चंद्रभागेत दाखल, वारकऱ्यांना मुबलक पाण्यात करता येणार स्नान
भाविकांना चंद्रभागेच्या (Chandrabhaga River) मुबलक पाण्यात आपले पवित्र स्नान करता यावं यासाठी उजनी धरणातून नदीत पाणी सोडलं आहे. हे पाणी आज चंद्रभागेत पोहोचलं आहे.
Ashadhi wari 2023 : सध्या पंढरपूरमध्ये (Pandharpur) वारकऱ्यांचा सोहळा पाहायला मिळत आहे. आषाढी वारीसाठी (Ashadhi wari 2023) लाखो भाविक पंढरपूरध्ये दाखल झाले आहेत. भाविकांना चंद्रभागेच्या (Chandrabhaga River) मुबलक पाण्यात आपले पवित्र स्नान करता यावं यासाठी उजनी धरणातून नदीत पाणी सोडलं आहे. हे पाणी आज चंद्रभागेत पोहोचलं आहे. त्यामुळं भाविकांना आता मुबलक पाण्यात स्नान करता येणार आहे.
ABP माझाच्या बातमीनंतर प्रशासनाला जाग
चंद्रभागा नदीची दुरावस्था ABP माझानं दाखवली होती. त्यानंतर गेल्या काही दिवसात प्रशासनाने चंद्रभागा पात्र आणि वाळवंटातून कचरा, जुने कपडे काढण्यात आले आहेत. परिसरात स्वच्छता करण्यात आली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपर्यंत चंद्रभागेची अवस्था गटार गंगेसारखी झाल्याचं वास्तव माझानं समोर आणल्यावर प्रशासनाला जाग आली होती. त्यानंतर चंद्रभागेच्या सफाई करण्यात आली आहे.
आषाढी यात्रा संपेपर्यंत उजनी धरणातून पाणी सोडलं जाणार
चंद्रभागेत झालेल्या घाणीमुळं पाण्याला अतिशय दुर्गंधी येत होती. अशा पाण्यात स्नान करताना भाविकांना आरोग्याचे प्रश्न उभे राहिले होते. आता नदी पात्रातील ही घाण काढून घेतल्यानं आणि नवे स्वच्छ पाणी आल्यानं भाविकांना स्वच्छ आणि मुबलक पाण्यात पवित्र स्नान करता येणार आहे. आता उजनी धरणातून हे पाणी आषाढी यात्रा संपेपर्यंत सोडले जाणार असल्यानं भाविकांची आषाढी यात्रा आनंदी होण्यास मदत होणार आहे.
वारीसाठी राज्यसह परराज्यातीन भाविकांची हजेरी
आषाढी वारीला राज्यासह परराज्यातून मोठ्या संख्येनं भाविक पंढरपुरात दाखल होत असतात. यामध्ये विशेषतः तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, राज्यातील विदर्भ मराठवाड्यातील भाविकांची संख्या लक्षणीय असते. यावर्षी श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. बाजारपेठेमध्ये प्रसादिक वस्तूंची कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्यामुळे व्यापारी वर्गामध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात पोलिसांचा बंदोबस्त
आषाढीचा सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर पेढे, चुरमुरे, बत्तासे, सुगंधित अगरबत्ती,अष्टगंध यासह फोटो फ्रेम, श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती आदी प्रासादिक साहित्याची दुकाने सज्ज झाली आहेत. पंढरपूर आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर, शहर व परिसरात वारकरी आणि भाविकांना देण्यात सोयी सुविधा देण्याच्या सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या आहेत. या वारीच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: