Solapur News : पाऊस नसल्यानं नर्सरी चालकांचं मोठं नुकसान; रोपांचा खर्चही निघणं कठीण
Solapur News : पाऊस नसल्यानं सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील नर्सरी (Nursery) चालकांचे मोठं नुकसान होताना पाहायला मिळत आहे.
Solapur News : सध्या राज्यात पावसानं (Rain) दडी मारली आहे. त्यामुळं पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिकं माना टाकू लागली आहेत. शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. दरम्यान, पाऊस नसल्यानं सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील नर्सरी (Nursery) चालकांचे मोठं नुकसान होताना पाहायला मिळत आहे. रोपवाटिका जगवण्यासाठी काही टँकरने देखील पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, या सर्वातून नर्सरी चालकांचा खर्तचही निघणं कठीण झालं आहे.
पाऊस नसल्यानं आंबा, सीताफळ, जांभूळ पेरुचू रोपं उध्वस्त
सोलापूर जिल्ह्यात पाऊस नसल्याने नर्सरी चालकांचे मोठे नुकसान होत आहे. बार्शी तालुक्यातील वाणेवाडी येथील सचिन लोखंडे यांनी पाच वर्षांपूर्वी रोपवाटिका सुरु केली. यंदाच्या वर्षी या रोपवाटिकेत जवळपास 70 ते 80 हजार रोपं होती. मात्र, पाऊस नसल्यानं आता केवळ 10 ते 20 हजार रोपं शिल्लक राहिली आहेत. पावसानं पाठ फिरविल्यानं आंबा, सीताफळ, जांभूळ, लिंबू, पेरु अशी अनेक रोप अक्षरशः उध्वस्त झाली आहेत. दरवर्षी वर्षी 20 ते 25 लाखांचे उत्पन्न या रोपवाटिकेतून मिळतं होतं. यंदाच्या वर्षी मात्र रोपांचा खर्चही निघणे अवघड झाल्याची माहिती रोपवाटिकेचे मालक सचिन लोखंने यांनी दिली.
विहिरींनी तळ गाठला, बोअरवेल आटले
सचिन लोखंने यांनी दिलेल्या माहितीनुसार रोपवाटिका जगवण्यासाठी काही दिवस टँकरने पाणीपुरवठा केला. मात्र, आता तो खर्च देखील निघणे अवघड झालं आहे. विहिरींनी तळ गाठला आहे. बोअर आटले आहेत. त्यामुळं रोपवाटिका जगवणं अवघड झालं असल्याची माहिती सचिन लोखंने यांनी दिली.
ऑगस्ट महिन्यात राज्यात सरासरीच्या उणे 58 टक्के तूट
ऑगस्ट महिन्याचा विचार केला तर राज्यात सरासरीच्या उणे 58 टक्के तूट निर्माण झाली आहे. कारण, ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या फक्त 42 टक्के पाऊस झाला आहे. सर्वात विदारक परिस्थिती मराठवाड्यात आहेत. कारण तिथं सरासरीच्या केवळ 28 टक्के पाऊस झाला आहे. त्याखालोखाल मध्य महाराष्ट्र आणि कोकणात केवळ 36 टक्के पाऊस पडला आहे. राज्यातील 15 जिल्ह्यात पावसाच्या सरासरीतली तूट मोठी आहे. या मोठ्या तुटीमुळे आणि पुढचे काही दिवस पावसाची शक्यता नसल्यानं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.
देशात सरासरीच्या 9 टक्के पाऊस कमी
हवामान विभागानं देशात आत्तापर्यत झालेल्या पावसाची माहिती दिली आहे. देशात सरासरीच्या 9 टक्के पाऊस कमी झाला आहे. आत्तापर्यंत देशात 91 टक्के पाऊस झाला आहे. यामध्ये केरळमध्ये यावर्षी पावसाची मोठी तूट पाहायला मिळात आहे. जूनपासून केरळात आत्तापर्यंत सरासरीच्या 48 टक्के पावसाची तूट झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: