एक्स्प्लोर

English Channel : पंढरपूरच्या सुपुत्राने पार केली इंग्लिश खाडी; वयाच्या 15 व्या वर्षी केली कामगिरी

English Channel : मूळचे पंढरपूरचे असलेले डॉ. जाधव यांच्या 15 वर्षीय सहिष्णू जाधव या मुलाने इंग्लिश खाडी पोहून पार करण्यास यश मिळवले आहे.

पंढरपूर, सोलापूर अत्यंत खडतर व शारिरीक, मानसिक कसोटी पाहणारी इंग्लिश चॅनल स्विम अर्थात इंग्लिश खाडी (English Channel) पोहून पार करण्याची मोठी कामगिरी पंढरपूरच्या पंधरा वर्षीय सुपुत्राने केली आहे. यामुळे पंढरीचा डंका साता समुद्रापार वाजला आहे.

मुळचे पंढरपूरचे डॉ. शिवानंद जाधव हे सध्या लंडनमध्ये (London) असून त्यांचा पंधरा वर्षीय मुलगा सहिष्णू व त्याच्या साथीदारांनी इंग्लिश खाडी पोहून पार करण्याचा भीम पराक्रम केला आहे. जाधव कुटुंबिय मुळचे पंढरपूरचे असून त्याचे आजोबा ह.भ.प. भाऊसाहेब धोंडोपंत जाधव-भोसेकर हे वारकरी संप्रदायातील आहेत. टाकळी येथे त्यांचे घर असून मोहोळ तालुक्यातील पेनुर येथे वारकरी संप्रदायाचा मठ देखील आहे.

इंग्लिश खाडी ही निसर्गत: अतिशय फसवी आहे. वीजा चमकत पडणारा पाऊस, जेली फिश, डॉल्फिन, सील सारखे मासे, प्रचंड थंड पाणी, यासोबतच अतिशय अनिश्चित लाटांच्या प्रवाहांसाठी आणि सतत बदलणाऱ्या हवामानासाठी ती ओळखली जाते. मोहिमेस प्रारंभ झाल्यानंतर अनेकदा वातावरणात प्रचंड बदल होऊन जलतरणपटूंपुढे मोठे आव्हान उभे राहते. अनेक दशकांपासून जगभरातील जलतरणपटूंच्या शारिरीक क्षमते बरोबर मानसिक सहनशक्तीची परीक्षा या खाडीने घेतली आहे. यामुळेच इंग्लिश खाडी पोहून पार करणे जलतरणपटुंचे स्वप्न असते. सहिष्णू जाधवने ही कामगिरी पंधराव्या वर्षीच पार पाडली. यामुळे तरूण जलतरणपटुमध्ये त्याचा समावेश झाला आहे. आजवर केवळ 62 भारतीयांनी इंग्लिश चॅनल यशस्वीरित्या पोहून पार केली आहे.

सहिष्णूचा प्रवास आठ महिन्यांपूर्वी सुरू झाला जेव्हा त्याने हे अवघड आव्हान स्वीकारण्याचा निर्णय घेतला. त्याचे इंग्लिश प्रशिक्षक निक्की पोप आणि ट्रेसी क्लार्क यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने डोव्हर येथे कठोर प्रशिक्षण घेतले. त्यांच्या संघाने महाकाय इंग्लिश चॅनेलच्या थंडगार पाण्यातून 7 सप्टेंबर रोजी पहाटे तीन वाजता पोहण्यास सुरुवात केली. इंग्लंड ते फ्रान्स हे सुमारे 40 किलोमीटरचे अंतर त्यांनी 14 तासांमध्ये पूर्ण केले. समुद्रातील भरती आहोटीमुळे कोणीही कधीही एकाच सरळ रेषेत पोहू शकत नाही.  या खाडीत  इंग्रजी एस आकारामध्ये पोहावे लागते. सहिष्णू याने ही कामगिरी पार पडल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी अगदी मराठमोळ्या पद्धतीने त्याचे औक्षण करून अभिनंदन केले.

सहिष्णूने ही कामगिरी पार पाडल्यामुळे त्याच्या पंढरपूर येथील आजोबांनी आनंद व्यक्त केला. तसेच भविष्यात देखील त्याने देशाचे नाव मोठे करावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Suhas Kande vs Sameer Bhujbal : आधी म्हणाले, आज तुझा म#$ फिक्स, आता सुहास कांदे म्हणतात, 'मी समीरभाऊंचं नाव घेऊन धमकी दिली नव्हती'
आधी म्हणाले, आज तुझा म#$ फिक्स, आता सुहास कांदे म्हणतात, 'मी समीरभाऊंचं नाव घेऊन धमकी दिली नव्हती'
Narayan Rane on Vinod Tawde: विनोद तावडेंबाबत नारायण राणेंचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले, 'त्यांना दिलेली वागणूक मला आवडली नाही'
विनोद तावडेंबाबत नारायण राणेंचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले, 'त्यांना दिलेली वागणूक मला आवडली नाही'
Jharkhand Election 2024 : मतदान करायला लागतंय! महाराष्ट्राच्या तुलनेत झारखंमध्ये मतदानाची टक्केवारी सुसाट, पहिल्या चार तासातच मतदारांचा जोर
मतदान करायला लागतंय! महाराष्ट्राच्या तुलनेत झारखंमध्ये मतदानाची टक्केवारी सुसाट, पहिल्या चार तासातच मतदारांचा जोर
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मुंबईत मतदानाचा पॅटर्न बदलणार, मलबार हिल आणि भांडूपमध्ये सर्वाधिक मतदान, वरळी-माहीममध्ये काय स्थिती?
मुंबईत मतदानाचा पॅटर्न बदलणार, मलबार हिल आणि भांडूपमध्ये सर्वाधिक मतदान, वरळी-माहीममध्ये काय स्थिती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Vidhan Sabha Election : मिंधे गटाने पैसे वाटपासाठी खास माणसं ठेवली - संजय राऊतDevendra Fadnavis On Vidhan Sabha : यंदा महिला मतदार गॅप भरु काढतील; फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्यSharad Pawar Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्राचं भवितव्य नागरिकांच्या मतांमध्ये - शरद पवारVinod Tawde PC : आरोपानंतर विनोद तावडेंच मतदान, सुप्रिया सुळे, राहुल गांधींना दिलं प्रत्युत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Suhas Kande vs Sameer Bhujbal : आधी म्हणाले, आज तुझा म#$ फिक्स, आता सुहास कांदे म्हणतात, 'मी समीरभाऊंचं नाव घेऊन धमकी दिली नव्हती'
आधी म्हणाले, आज तुझा म#$ फिक्स, आता सुहास कांदे म्हणतात, 'मी समीरभाऊंचं नाव घेऊन धमकी दिली नव्हती'
Narayan Rane on Vinod Tawde: विनोद तावडेंबाबत नारायण राणेंचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले, 'त्यांना दिलेली वागणूक मला आवडली नाही'
विनोद तावडेंबाबत नारायण राणेंचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले, 'त्यांना दिलेली वागणूक मला आवडली नाही'
Jharkhand Election 2024 : मतदान करायला लागतंय! महाराष्ट्राच्या तुलनेत झारखंमध्ये मतदानाची टक्केवारी सुसाट, पहिल्या चार तासातच मतदारांचा जोर
मतदान करायला लागतंय! महाराष्ट्राच्या तुलनेत झारखंमध्ये मतदानाची टक्केवारी सुसाट, पहिल्या चार तासातच मतदारांचा जोर
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मुंबईत मतदानाचा पॅटर्न बदलणार, मलबार हिल आणि भांडूपमध्ये सर्वाधिक मतदान, वरळी-माहीममध्ये काय स्थिती?
मुंबईत मतदानाचा पॅटर्न बदलणार, मलबार हिल आणि भांडूपमध्ये सर्वाधिक मतदान, वरळी-माहीममध्ये काय स्थिती?
Exit poll: मतदानानंतरचा एक्झिट पोल कधी अन् कुठं पाहाल? राज्यात महायुती की महाविकास आघाडी, कुणाला कौल
मतदानानंतरचा एक्झिट पोल कधी अन् कुठं पाहाल? राज्यात महायुती की महाविकास आघाडी, कुणाला कौल
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या चार तासात करवीर अन् राधानगरीत मतदानाचा वेग वाढला; दक्षिण,उत्तर अन् कागलमध्ये काय घडतंय?
कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या चार तासात करवीर अन् राधानगरीत मतदानाचा वेग वाढला; दक्षिण,उत्तर अन् कागलमध्ये काय घडतंय?
Suhas Kande vs Sameer Bhujbal : सुहास कांदे म्हणाले, आज तुझा मर्डर फिक्स, समीर भुजबळ म्हणतात, अरे, तुझ्यासारखे 56 पाहिलेत; नांदगावात वातावरण तापलं!
सुहास कांदे म्हणाले, आज तुझा मर्डर फिक्स, समीर भुजबळ म्हणतात, अरे, तुझ्यासारखे 56 पाहिलेत; नांदगावात वातावरण तापलं!
Maharashtra Assembly Election Voting 2024: राज्यातील 15 मतदारसंघांत खटाखट मतदान, मुंबईत किती टक्के मतदान?
राज्यातील 15 मतदारसंघांत खटाखट मतदान, सर्वाधिक मतदान कुठे? मुंबईत किती टक्के मतदान?
Embed widget