Ujani Dam Solapur : मान्सूनपूर्व पावसाचा धडाका! उजनी धरणात 4 टीएमसी पाणीपातळी वाढ, तर चंद्रभागा एक मीटरने वधारली
Solapur News : गेल्या दहा दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने चंद्रभागेची पाणी पातळी तब्बल एक मीटरने वाढली असून यामुळे पंढरपूरला 25 जूनपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा बंधाऱ्या जमा झाला आहे.

Ujani Dam Solapur सोलापूर : गेल्या दहा दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने चंद्रभागेची पाणी पातळी तब्बल एक मीटरने वाढली असून यामुळे पंढरपूरला 25 जूनपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा बंधाऱ्या जमा झाला आहे. गेल्या दहा दिवसापासून सोलापूर जिल्ह्यात पावसाची जोरात बॅटिंग सुरू असून उजनी धरणात (Ujani Dam Water Level) तर चार टीएमसी एवढे पाणी जमा झाले आहे. या जोरदार पावसामुळे आज (25 मे) उजनी धरणात तब्बल दहा हजार क्युसेक वीसर्गाने पाणी येत आहे. उजनीच्या पाणलोट क्षेत्रात जवळपास 171 मिलिमीटर एवढा पाऊस या दहा दिवसात कोसळल्याने उजनीची पाणी पातळी झपाट्याने वाढू लागली आहे.
टँकरची गरज मिटली, प्रशासनालाही मोठा दिलासा
दरम्यान, एका बाजूला टँकरच्या मागण्या वाढत असताना कोसळलेल्या या पावसामुळे आता टँकरची गरज लागणार नसून यामुळे प्रशासनालाही मोठा दिलासा मिळाला आहे. या पावसाने अनेक ठिकाणी बंधारे ओसंडून वाहू लागले असून माळशिरस तालुक्यातील जवळपास 17 बंधारे सध्या तुडुंब भरून वाहताना दिसत आहे. या जोरदार पावसामुळे नीरा नदीची पातळी ही वाढली असून यातून 32 क्युसेक्स एवढ्या विसर्जाने पाणी भीमा नदीत जमा होत आहे. अशीच परिस्थिती सांगोला माढा अशा ठिकाणी दिसू लागल्याने आता प्रशासन बंधाऱ्याची दारे हळूहळू उघडण्यात सुरुवात करणार आहे. मात्र मान्सूनपूर्व पावसाने धडाका दिल्याने जिल्ह्यातील अनेकांची आता चिंता मिटली आहे.
सातारा जिल्ह्याला पुढील चार दिवस ऑरेंज अलर्ट, कोयना धरणाचे सर्व दरवाजे बंद
सातारा जिल्ह्याला हवामान खात्याने पुढील चार दिवस ऑरेंज दिला असून कोयना धरण परिसरात पडत असलेल्या मुसळधार अवकाळी पावसामुळे कोयना नदीवरील सर्व बंधारे ओव्हरफ्लो झाले आहेत. कोयना नदीवरील निसरे, तांबवे बंधाऱ्यावरून पाणी ओसडून वाहू लागले आहे. तर कराड तालुक्यातील खोडशी डॅम पूर्ण क्षमतेने भरल्याने तो ओव्हरफ्लो वाहू लागला आहे. सातारा जिल्ह्यातील कोयना कृष्णा नदीसह सर्व नद्यांची पाणीपातळी मोठ्या प्रमाणावर वाढलेली पाहायला मिळत आहे.
गेटवे ते मांडवा फेरी सेवा पुढील तीन महिने बंद
राज्यासह देशभरात पावसाचा धडाका बघायला मिळत आहे. अशातच पावसाळा सुरू झाल्यामुळे मुंबई गेटवे ऑफ इंडिया ते मांडवापर्यंत (गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा फेरी सेवा) प्रवासी वाहतूक सेवा ही पुढील तीन महिने बंद राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. ही सेवा उद्यापासून म्हणजेच 26 मे ते 31 ऑगस्टपर्यंत बंद असणार आहे. मात्र भाऊचा धक्का ते मांडवा दरम्यान रो-रो बोट सेवा सुरू राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र सागरी मंडळाचे मांडवा बंदर निरीक्षक आशिष मानकर यांनी दिली आहे.
हे ही वाचा























