एक्स्प्लोर

Sindhudurg News : कोकणातील समुद्र किनारे होतायत लग्नसोहळ्यांचे साक्षीदार, रुजतोय डेस्टिनेशन बीच वेडिंगचा ट्रेंड

Beach Wedding : हल्ली वेगवेगळ्या लग्नाचे वेगवेगळे ट्रेंड पहायला मिळतात. त्यातीलच एक ट्रेन्ड म्हणजे बीच वेडिंग. आता कोकणातील समुद्र किनाऱ्यावर लग्न करण्याचं स्वप्न बघणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

सिंधुदुर्ग : जगभरातील पर्यटकांना नेहमीच कोकणातील (Kokan) समुद्र किनारे आकर्षित करतात. मात्र आता विवाह सोहळे देखील कोकणातील समुद्र किनाऱ्यावर होतायत. लग्न (Marriage) हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असतो. लग्नाच्या आठवणी जपून राहाव्यात यासाठी प्रत्येक जण आपलं लग्न खास व्हावे यासाठी धडपडत असतो. हल्ली वेगवेगळ्या लग्नाचे वेगवेगळे ट्रेंड पहायला मिळतात. त्यातीलच एक ट्रेन्ड म्हणजे बीच वेडिंग (Beach Wedding). भारतात बीच वेडिंगसाठी गोवा हे सगळ्यांचे आवडते डेस्टिनेशन आहे. मात्र आता कोकणातील समुद्र किनाऱ्यावर लग्न करण्याचं स्वप्न बघणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वच्छ सुंदर आणि जगभरात ब्लु फ्लॅक नामांकन असलेल्या भोगवे समुद्र किनाऱ्यावर लग्न करू शकता. 

सध्या प्री विडिंग समुद्र किनाऱ्यावर होतात. मात्र आता लग्न सोहळे देखील कोकणातील समुद्र किनाऱ्यावर होत आहेत. मुंबई, पुणे सारख्या शहरातील युवा पिढी कोकणातील निसर्गरम्य समुद्र किनाऱ्यावर लग्न करत आहेत. सोलापूर येथील डॉ. चिराग होरा आणि स्नेहल शिंपी ठाणे यांनी आपलं लग्न अविस्मरणीय व्हावा यासाठी भोगवे समुद्र किनारी लग्न केलं. आपल्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण असून असं लग्न होईल असं स्वप्नात देखील पाहिलं नव्हत. वेगळ्या दुनियेत आल्याचा भास होत आहे. मराठी कुटुंब इतकं छान लग्न सोहळा आयोजित करतं शकतं हे एक वेगळेपण आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी नवरीच्या आईने दिली. 

नवा ट्रेंड नेमका काय?

सध्या लग्नसोहळे हे ट्रेंडनुसार केले जातात. काही जणं मोकळ्या मैदानात, काही जणं आलिशान जागेत लग्न सोहळा आयोजित करतात. त्यातच आता समुद्र किनारी लग्न सोहळे आयोजित करणं हा एक नवा ट्रेंड सुरु झालाय. यामुळे बऱ्याचदा अस्ताला जाणाऱ्या सुर्याचा मुहूर्त निवडला जातो. निळाशार समुद्र हा नव्या नात्यांचा साक्षीदार देखील होतोय. यामुळे तो लग्नसोहळा हा फक्त लग्न करणाऱ्या दोन व्यक्तींच्याच नाही तर कुटुंबाताली प्रत्येक जणाच्या लक्षात राहण्यासारखा केला जातोय. 

अनेक कलाकारांनी देखील या बीच वेडिंगची संकल्पनेचा त्यांच्या लग्नसोहळ्यात अवलंब केला. त्यामुळे हा ट्रेंड अधिकच विकसित होत गेला. दरम्यान या ट्रेंडमुळे रोजगाराच्या नव्या संधी देखील कोकण वासीयांना उपलब्ध होतायत. म्हणून कोकणाच्या समुद्र किनाऱ्यांवर आता लग्नसोहळ्यांची देखील रेलचेल पाहायला मिळते. 

हेही वाचा : 

Lonavala Restaurants : फिरण्यासाठी खास असलेल्या लोणावळ्यात खाण्यासाठी खास काय? 'हे' 5 पर्याय नक्की ट्राय करा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

तुम्ही देशाला, भारतमातेला, आईला विकलं लाज वाटत नाही का? लोकसभेत राहुल गांधींचा रुद्रावतार; एपस्टीवरून मोदींवर आरोप, रिजिजू म्हणाले, पुरावे द्या, आताच देतो म्हणताच अध्यक्ष म्हणाले, मी मागितले नाहीत!
तुम्ही देशाला, भारतमातेला, आईला विकलं लाज वाटत नाही का? लोकसभेत राहुल गांधींचा रुद्रावतार; एपस्टीवरून मोदींवर आरोप, रिजिजू म्हणाले, पुरावे द्या, आताच देतो म्हणताच अध्यक्ष म्हणाले, मी मागितले नाहीत!
मुंबई महापालिकेत पहिल्या दिवशी राडा, खाली बसावं लागल्याने संताप; ठाकरेंचे नगरसवेक आक्रमक, म्हणाले, बॉडी लँग्वेज विक्षिप्त
मुंबई महापालिकेत पहिल्या दिवशी राडा, खाली बसावं लागल्याने संताप; ठाकरेंचे नगरसवेक आक्रमक, म्हणाले, बॉडी लँग्वेज विक्षिप्त
जमीन महसूल कायद्यात मोठा बदल, आता जमिनीसाठी एन.ए. परवानगीची गरज नाही, जमीन मालकांना दिलासा
जमीन महसूल कायद्यात मोठा बदल, आता जमिनीसाठी एन.ए. परवानगीची गरज नाही, जमीन मालकांना दिलासा
राम सातपुतेंच्या हत्येचा कट? उत्तम जानकरांचा पलटवार, म्हणाले, मुर्दाड माणसाला कोण मारणार? प्रसंगही सांगितला
राम सातपुतेंच्या हत्येचा कट? उत्तम जानकरांचा पलटवार, म्हणाले, मुर्दाड माणसाला कोण मारणार? प्रसंगही सांगितला

व्हिडीओ

Sanjay Raut : भाजपसोबत न जाण्याचा सूचना उद्धव ठाकरेंनी दिल्या होत्या, चंद्रपूरमधील घडामोडींवर टीका
Ritu Tawade Mumbai Mayor : रितू तावडे मुंबईच्या महापौरपदी तर संजय घाडी उपमहापौरपदी विराजमान
Ravindra Chavhan Nanded : भाजप प्रवेशाच्या अफवेवरून काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण संतापले..
Adnan Sami VS Congress And Sanjay Raut : संजय राऊतांचा वार, अदनानचा पलटवार Special Report
Govinda Politics : राजकारण पुरे झालं असं गोविंदा का म्हणाला? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तुम्ही देशाला, भारतमातेला, आईला विकलं लाज वाटत नाही का? लोकसभेत राहुल गांधींचा रुद्रावतार; एपस्टीवरून मोदींवर आरोप, रिजिजू म्हणाले, पुरावे द्या, आताच देतो म्हणताच अध्यक्ष म्हणाले, मी मागितले नाहीत!
तुम्ही देशाला, भारतमातेला, आईला विकलं लाज वाटत नाही का? लोकसभेत राहुल गांधींचा रुद्रावतार; एपस्टीवरून मोदींवर आरोप, रिजिजू म्हणाले, पुरावे द्या, आताच देतो म्हणताच अध्यक्ष म्हणाले, मी मागितले नाहीत!
मुंबई महापालिकेत पहिल्या दिवशी राडा, खाली बसावं लागल्याने संताप; ठाकरेंचे नगरसवेक आक्रमक, म्हणाले, बॉडी लँग्वेज विक्षिप्त
मुंबई महापालिकेत पहिल्या दिवशी राडा, खाली बसावं लागल्याने संताप; ठाकरेंचे नगरसवेक आक्रमक, म्हणाले, बॉडी लँग्वेज विक्षिप्त
जमीन महसूल कायद्यात मोठा बदल, आता जमिनीसाठी एन.ए. परवानगीची गरज नाही, जमीन मालकांना दिलासा
जमीन महसूल कायद्यात मोठा बदल, आता जमिनीसाठी एन.ए. परवानगीची गरज नाही, जमीन मालकांना दिलासा
राम सातपुतेंच्या हत्येचा कट? उत्तम जानकरांचा पलटवार, म्हणाले, मुर्दाड माणसाला कोण मारणार? प्रसंगही सांगितला
राम सातपुतेंच्या हत्येचा कट? उत्तम जानकरांचा पलटवार, म्हणाले, मुर्दाड माणसाला कोण मारणार? प्रसंगही सांगितला
Shahid Afridi: 'भारताला चार गुजराती चालवत आहेत, दोन विकत आहेत, दोन विकत घेताहेत', शाहीद आफ्रिदीची स्फोटक टीका, काय-काय बोलला?
Video: 'भारताला चार गुजराती चालवत आहेत, दोन विकत आहेत, दोन विकत घेताहेत', शाहीद आफ्रिदीची स्फोटक टीका, काय-काय बोलला?
Dharashiv ZP Election: जिल्हा परिषदत निवडणुकीत वेगळी चूल; निकालनंतर महायुती तानाजी सावंतांना वगळून सत्ता स्थापन करणार? अध्यक्षपदावरूनही रस्सीखेच
जिल्हा परिषदत निवडणुकीत वेगळी चूल; निकालनंतर महायुती तानाजी सावंतांना वगळून सत्ता स्थापन करणार? अध्यक्षपदावरूनही रस्सीखेच
Sunetra Pawar Meets PM Modi: प्रफुल पटेलांच्या निवासस्थानी 'ब्रेकफास्ट पे चर्चा'; सुनेत्रा पवारांनी घेतली पीएम मोदींची भेट, पार्थ पवारांची खासदारकी निश्चित?
प्रफुल पटेलांच्या निवासस्थानी 'ब्रेकफास्ट पे चर्चा'; सुनेत्रा पवारांनी घेतली पीएम मोदींची भेट, पार्थ पवारांची खासदारकी निश्चित?
Pune Crime Budhwar Peth: पुण्याच्या बुधवार पेठेत मध्यरात्री 12 वाजता पोलिसांचा प्रचंड फौजफाटा पोहोचला, कुंटणखान्यातील खोल्यांची झडती, नेमकं काय घडलं?
पुण्याच्या बुधवार पेठेत मध्यरात्री 12 वाजता पोलिसांचा प्रचंड फौजफाटा पोहोचला, कुंटणखान्यातील खोल्यांची झडती, नेमकं काय घडलं?
Embed widget