पोलीस माग काढत सांगलीतील 'त्या' घरापर्यंत पोहोचले, आत घबाडही सापडलं, पण थोड्याचवेळात...
बनावट नोटांची छपाई सांगली-पलूस येथे कलर प्रिंटरचा वापर करून मुख्य संशयित आरोपी सुरेंद्र ऊर्फ सूर्या रामचंद्र ठाकूर हा पलूस गावातील याच्या घरी करत होता हे उघड झाले आहे.
![पोलीस माग काढत सांगलीतील 'त्या' घरापर्यंत पोहोचले, आत घबाडही सापडलं, पण थोड्याचवेळात... Sinddhudurg Sangli connection of fake notes in Sindhudurga Police found in accused house Marathi News पोलीस माग काढत सांगलीतील 'त्या' घरापर्यंत पोहोचले, आत घबाडही सापडलं, पण थोड्याचवेळात...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/14/ca8cc9a21ed0807b02bc2a358851ec29172361714821189_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील (Sindhudurg News) कुडाळ येथील बनावट नोटांचे (Fake Currency) कनेक्शन थेट सांगलीशी असल्याचे उघड झाले आहे. चलनात येणाऱ्या बनावट नोटांची छपाई सांगली- पलूस येथे कर प्रिंटर्सचा वापर करुन छापल्या जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी कुडाळ पोलीसांन तीन जणांना अटक केली आहे. तसेच कुडाळ पोलिसांनी सांगली-पलूस येथील संशयिताच्या घरी 1 लाख 34 हजार 700 रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे 23 नोव्हेंबर 2023 रोजी रात्री 11.50 वाजता कुडाळ येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत 100 रुपयांच्या 9 नोटा, 200 च्या 9 आणि 500 ची एक नोट अशा एकूण 3 हजार 200 रुपये किमतीच्या भारतीय चलनासारख्या दिसणाऱ्या 19 बनावट चलनी नोटांचा कॅश डिपॉझिट मशिनद्वारे भरणा केला होता. याबाबत कुडाळ शाखेचे शाखाधिकारी राजेंद्र सोनकुसरे यांनी कुडाळ पोलिस ठाण्यात संशयीत व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली होती. या तक्रारीचा तपास करताना सापडलेल्या बनावट नोटांचे मूळ कनेक्शन सांगली-पलूस येथे असल्याचे उघड झाले आहे.
सांगली-पलूस येथील संशयिताच्या घरी 1 लाख 34 हजाराच्या बनावट नोटा जप्त
या बनावट नोटांची छपाई सांगली-पलूस येथे कलर प्रिंटरचा वापर करून मुख्य संशयित आरोपी सुरेंद्र ऊर्फ सूर्या रामचंद्र ठाकूर हा पलूस गावातील याच्या घरी करत होता हे उघड झाले आहे. या गुन्ह्यात विजय शिंदे आणि निशिगंधा कुडाळकर हे दोघे सिंधुदुर्गातील कुडाळ येथील असून यांचा देखील प्रत्यक्ष सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने तिघांनाही कुडाळ पोलिसांनी अटक केली आहे. कुडाळ पोलिसांनी सांगली-पलूस येथील संशयिताच्या घरी 1 लाख 34 हजार 700 रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.
बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीला मंगरूळपीर पोलीसांकडून अटक
बनावट भारतीय चलनी नोटा तयार करणाऱ्या साहित्यासह 4 जणांना वाशिमच्या मंगरुळपीर पोलीसांनी कारवाई करत 1,78,950 रुपयांचा मुद्देमालसह इंडिगो कंपनीची कार आणि कारमध्ये असलेल्या नकली चलनी नोटा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य नांदेडवरुन येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळली. नाकाबंदी दरम्यान इंडिगो कंपनीची कारचा पाठलाग करुन पकडले. दरम्यान शिवाजी खराडे ,शेख जावेद शेख लालन, शेर खान मेहबूब खान यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी दरम्यान हे सर्व आरोपी कारंजा लाड येथील असून त्यांच्याकडे एका बॅगमध्ये काळ्या रंगाचे चलनी नोटाचे आकाराचे कापलेले कागदाचे 16 बंडल प्लास्टिक रासायनिक द्रव्यासह अटक केले. तर हाजी साब या मुख्य आरोपीला नांदेड येथून पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहे.
हे ही वाचा :
मी गद्दारांबरोबर गेलो नाही त्यामुळे माझ्यामागे चौकशीचा ससेमिरा; एसीबीच्या कारवाईप्रकरणी आमदार नितीन देशमुखांचा पलटवार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)