(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मी गद्दारांबरोबर गेलो नाही त्यामुळे माझ्यामागे चौकशीचा ससेमिरा; एसीबीच्या कारवाईप्रकरणी आमदार नितीन देशमुखांचा पलटवार
Nitin Deshmukh ACB Inquiry : माझी बेहिशोबी मालमत्ता कुठे आहे? ती माझ्या ताब्यात द्यावी आणि माझ्यावर कारवाई करावी, असे स्पष्ट मत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी व्यक्त केले आहे.
Nitin Deshmukh ACB Inquiry : अकोला (Akola News) जिल्ह्यातील बाळापूरचे ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT)आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांच्या मागचा चौकशीचा फेरा मागील दोन वर्षापासून सुरूच आहे. अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Buero आमदार नितीन देशमुख हे अकोला जिल्हा परिषदेच्या सदस्य असतानाच्या कार्यकाळाची माहिती अकोला जिल्हा परिषदेकडून मागवली आहे. नितीन देशमुख जिल्हा परिषद सदस्य असताना जिल्हा परिषदेचा वापरलेला निधी, झालेली कामे आणि सदस्य म्हणून घेतलेली भत्ते, याबाबतची संपूर्ण माहिती मागवणत आली आहे. यापूर्वीही अमरावती एसीबीने मालमत्ता आरोप प्रकरणी 17 जानेवारी 2023 रोजी आमदार नितीन देशमुख यांची चौकशी केली होती. त्यानंतर हे सर्व प्रकरण थंड बसतात गेलो होतो. आता चौकशी पुन्हा एकदा सुरू झाल्याने उलटसुलट चर्चा होत आहेत.
मी गद्दारांबरोबर गेलो नाही यामुळे चौकशीचा ससेमिरा
मी वेळोवेळी चौकशीत सर्व माहिती दिली आहे. सातत्याने माझ्या बेहिशोबी मालमत्ते बाबत चौकशी केली जात आहे. 2019च्या निवडणुकीत दाखल केलेल्या अर्जात माजी संपूर्ण संपत्तीची स्थिती नमूद आहे. आता ज्यांनी तक्रार केली आहे त्यांनी बेहिशोबी मालमत्ता कुठे आहे, याची माहिती दिली असेल. दोन वर्षानंतर एसीबीच्या लोकांना जाग येत असेल तर यावर मी काय बोलावं. अशा अधिकाऱ्यांचा सत्कार केला पाहिजे. मी वेल सांगितला तर ते बेल लिहितात. माझी बेहिशोबी मालमत्ता कुठे आहे? ती माझ्या ताब्यात द्यावी आणि माझ्यावर कारवाई करावी, असे स्पष्ट मत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी व्यक्त केले आहे.
गद्दारांबरोबर मी गेलो नाही. यामुळे चौकशीचा ससेमिरा माझ्या पाठीशी लावण्यात आला आहे. त्या काळातली ही चौकशी झाली पाहिजे. ती का होत नाही? याचे उत्तर कोणाकडेही नाही. माझी चौकशी बंद रूममध्ये नव्हे, तर सर्वांसमोर खुल्या पद्धतीने झाली पाहिजे. असेही मत नितीन देशमुख यांनी व्यक्त केलं आहे.
मुख्यमंत्र्यांचा चेहरा उद्धव ठाकरेच!
लातूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीसाठी नितीन देशमुख आज लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची मते त्यांनी जाणून घेतली. येणाऱ्या विधानसभेच्या अनुषंगाने ठाकरे गटाची काय तयारी आहे याची माहिती त्यांनी घेतली. महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांनी शेतकऱ्यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून एकच व्यक्ती समोर आहे. ते म्हणजे उद्धव ठाकरे. त्याच दृष्टीने सर्व शिवसैनिक कामाला लागले आहेत. असे मतही नितीन देशमुख यांनी लातूरला व्यक्त केलंय.
हे ही वाचा