Nitesh Rane : संजय राऊतांच्या जन्मतारखेत घोळ! शुभेच्छा 15 एप्रिलला द्यायच्या की 15 नोव्हेंबरला, नितेश राणेंचा सवाल
Nitesh Rane vs Sanjay Raut : खासदार संजय राऊतांच्या जन्मतारखेत घोळ असल्याचा आरोप करत नितेश राणे यांनी त्यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे.
Nitesh Rane on Sanjay Raut : भाजप (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या जन्मतारखेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या आज 15 नोव्हेंबरला वाढदिवस आहे. एकीकडे संजय राऊतांवर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना नितेश राणे यांनी मात्र शब्दांचा 'प्रहार' केला आहे.
राऊतांच्या जन्मतारखेत घोळ
संजय राऊतांच्या जन्मतारखेत घोळ असल्याचा आरोप करत नितेश राणे यांनी त्यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. संजय राऊतांनी राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळी अँफीडेवीटमध्ये दोन वेगवेगळ्या जन्मतारा दिल्या असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राऊतांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 15 एप्रिलला द्यायच्या की 15 नोव्हेंबरला असा सवालही नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.
'उद्धव ठाकरे सकट सर्व सोंगाडे'
नितेश राणे म्हणाले की, ''उबाठा सेनेमध्ये उद्धव ठाकरे सकट सर्व सोंगाडे आणि 420 भरलेत. एक तो चिपळूणचा सोंगाड्या आणि दुसरा भांडुपचा देवानंद. काही लोक जन्मजात सोंगाडे असतात. संजय राजाराम राऊतने जरा हे सांगावे 2004 ते 2016 पर्यत राज्यसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने तुमच्या अँफीडेवीटमध्ये तुमचा वाढदिवस हा 15 एप्रिल 1961 ला आहे आणि 2016 ते 2028 पर्यत तुम्ही जे अँफीडेवीट भरलं त्याच्या मध्ये तुमचा वाढदिवस 15 नोव्हेंबर 1961 ला आहे.''
पाहा व्हिडीओ : नितेश राणे नेमकं काय म्हणाले?
— nitesh rane (@NiteshNRane) November 15, 2023
राऊतांनी जन्म तारीख का बदलली?
नेमकी जन्म तारीख का बदलली, असा सवाल नितेश राणे यांनी राऊतांना विचारला आहे. त्यांनी पुढे म्हटलं की, ''जन्म तारीख का बदलली? याच्यामध्ये कुठली 420 शी आहे, याचे स्पष्टीकरण राज्यातील जनतेला मिळाले पाहिजे. नेमकं तुम्हाला शुभेच्छा 15 एप्रिलला द्यायच्या की 15 नोव्हेंबरला द्यायच्या याबाबद्दल आज तरी राज्यातील जनतेच्या ज्ञानात भर टाका.''
महत्त्वाच्या इतर बातम्या :