बैलाचं तोंड असलेला मासा, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल, खर काय खोट काय?
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ (Social Media Video Viral) प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये बैलाचं तोंड असलेला एक विचित्र प्रकारचा मासा दिसत आहे.
viral video News : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ (Social Media Video Viral) प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये बैलाचं तोंड असलेला एक विचित्र प्रकारचा मासा दिसत आहे. या व्हिडीओच्या खाली कॅशन म्हणून अशा प्रकारचा मासा मालवण मध्ये सापडल्याचे लिहिलेले आहे. मात्र, खरच अशा प्रकारचा मासा आहे का? याबाबत सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे.
AI तंत्रज्ञानाचा वापर केल्याची चर्चा
बैलाचे तोंड असलेला एक विचित्र प्रकारच्या माशाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओच्या खाली कॅशन म्हणून अशा प्रकारचा मासा मालवण मध्ये सापडल्याचे लिहिलेले आहे. मात्र, अशा प्रकारचा मासा मालवणमध्ये मिळालेला नाही. AI तंत्रज्ञानाचा वापर करुन अशा प्रकारे हे विचित्र प्रकारचा मासा बनवण्यात आला असल्याचं बोललं जात आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. मात्र, हे कुठं तयार केलं आहे किंवा एआय तंत्रज्ञानाचा वापर केलाय का याबाबतची माहिती कोणाजवळच नाही.
मासा हे मानवाच्या दृष्टीने पौष्टिक अन्न
मासा हे मानवाच्या दृष्टीने पौष्टिक अन्न आहे. यातील प्रथिने शरीराला पोषक आहेत. ती कॅल्शियम, फॉस्फरस व लोह यांसारखी जैव मूल्याच्या दृष्टीने महत्त्वाची असणारी खनिजेही थोड्या प्रमाणात माशांपासून मिळतात. मासळीत काही महत्त्वाची जीवनसत्त्वेही असतात. कॉड, हॅलिबट, मुशी या माशांच्या यकृतापासून अ व ड जीवनसत्त्वयुक्त औषधी तेल निघते, तर आतड्यापासून ब जीवनसत्त्व मिळू शकते. मुश्यांच्या पक्षांपासून सार (सूप) करतात. मासे पचनास हलके असतात. त्यांच्या चरबीपासून रक्तवाहिन्यांतील कोलेस्टेरॉल वाढत नाही व आहारात त्यांचा समावेश केल्याने रक्तदाब कमी होतो. काही माशांच्या शरीरातील वाताशयांचा (हवेच्या पिशव्यांचा) विविध कामांसाठी उपयोग केला जातो. पाळीव जनावरांच्या आहारासाठी मत्स्यपीठ व झाडांसाठी उत्तम खतही मासळीपासून मिळते. मत्स्योद्योगात जगातील कोट्यवधी लोक गुंतले आहेत. मासे आहारात असणे चांगले आहे.
मालवणमध्ये मुख्य व्यवसाय मासेमारी आणि शेती
मालवण हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक शहर आणि तालुका आहे. सिंधुदुर्ग हा सर्वात दक्षिणेकडील जिल्हा आहे. सिंधुदुर्द किल्ल्यासाठी प्रसिद्ध आहे. या जिल्ह्यात मालवण हा तालुका मासेमारीसाठी प्रसिद्ध आहे. येथील मुख्य व्यवसाय मासेमारी आणि शेती आहे. स्थानिक लोकांचा मुख्य आहार म्हणजे फिश करी आणि भात. हे शहर हापूस आंबा आणि हरभरा-बेसन पीठ आणि लेपित गुळ तसेच मालवणी लाडूपासून बनवलेल्या मालवणी खाजासारख्या मिठाईसाठी देखील ओळखले जाते. कोकणी मेवा, आंबवडी, फणसपोली, काजूवाडी आणि नारळाच्या वाड्या या पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या इतर मिठाई आहेत.
महत्वाच्या बातम्या: