Pathaan Box Office Collection : शाहरुखचा 'पठाण' ठरला भारतातील नंबर 1 सिनेमा; बॉक्स ऑफिसवर जमवला कोट्यवधींचा गल्ला
Pathaan : शाहरुख खानचा 'पठाण' हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.
Shah Rukh Khan Pathaan Box Office Collection : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'पठाण' (Pathaan) हा सिनेमा सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घालत आहे. रिलीजच्या 39 व्या दिवशीही जगभरात या सिनेमाची क्रेझ कायम आहे. भारतात 532.08 कोटींची कमाई करत हा सिनेमा 'नंबर 1' ठरला आहे. जगभरात या सिनेमाने 1,028 कोटींचा गल्ला जमवला आहे.
बॉक्स ऑफिसवर 'पठाण'चा बोलबाला!
'वेड', 'वाळवी', 'सेल्फी' हे सिनेमे सध्या सिनेमागृहात प्रदर्शित झाले आहेत. मराठी सिने-रसिक 'वेड' आणि 'वाळवी' पाहायला सिनेमागृहात जात आहेत. पण त्यासोबत ते 'पठाण' सिनेमादेखील पाहत आहेत. तसेच 'सेल्फी' सिनेमा पाहण्यापेक्षा सिनेरसिकांनी 'पठाण' सिनेमाला पसंती दर्शवली आहे. त्यामुळे सध्या बॉक्स ऑफिसवर 'पठाण'चा बोलबाला आहे.
View this post on Instagram
शाहरुख खानचा 'पठाण' हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. या सिनेमावर मोठ्या प्रमाणात टीका होत होती. त्यामुळे शाहरुखने या सिनेमाचं प्रमोशन केलं नाही. सिनेमा पाहण्यासाठी त्याने चाहत्यांना जबरदस्ती केली आहे. सिनेमाबद्दल तो एकही शब्द बोलला नाही पण तरीही त्याचे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्यावर निबंधाच्या निबंध लिहित आहेत. शाहरुखचा सिनेमा किती यशस्वी आहे आणि किती नाही हा भाग बाजूला राहिला. पण त्याच्यावर टीका होत असतानाही त्याने सिनेमाच्या तिकीटांची किंमत हजारो रुपये ठेवण्याची हिंमत दाखवली आहे. या सिनेमाच्या माध्यमातून त्याने चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं असलं तरीत्याचा खरेपणा आणि आत्मविश्वास चाहत्यांना पुन्हा एकदा भावला आहे.
'या' ठिकाणी झालंय 'पठाण'चं शूटिंग (Pathaan Shooting Venue)
यशराजच्या बॅनरखाली 'पठाण'ची निर्मिती करण्यात आली आहे. यशराज नेहमीच त्यांच्या सिनेमाचं शूटिंग वेगवेगळ्या ठिकाणी करत असतात. 'पठाण' सिनेमाच्या शूटिंगसाठीदेखील त्यांनी खूप अभ्यास केला आहे आणि वेगवेगळ्या जागांची निवड केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आठ देशांमध्ये 'पठाण' सिनेमाचं शूटिंग झालं आहे. यात स्पेन, यूएई, भारत, तुर्की, फ्रान्स या प्रमुख देशांचा समावेश आहे.
'पठाण' सिनेमाचं बजेट काय आहे? (Pathaan Movie Budget)
'पठाण' या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळत आहे. एखाद्या हॉलिवूड सिनेमाप्रमाणे या सिनेमाची बांधणी करण्यात आली आहे. रिलीजच्या सात दिवसांत या सिनेमाने जगभरात 600 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. पण या सिनेमाची निर्मिती फक्त 250 कोटींमध्ये करण्यात आली आहे. एकंदरीतच बजेटपेक्षा खूपच जास्त कमाई या सिनेमाने केली आहे. उत्कृष्ट दर्जाच्या वीएफएक्स तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या