Malegaon : बांगलादेशी अन् रोहिंग्या मुसलमानांबाबत किरीट सोमय्यांकडून आरोपांचे वावटळ, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर SIT कडून मोठी अॅक्शन
Malegaon : मालेगावातील बांगलादेशी अन् रोहिंग्या मुसलमानांबाबत किरीट सोमय्यांकडून गंभीर आरोप आणि तक्रार केल्यानंतर एसआयटीची टीम आता मालेगावात दाखल झाली आहे.
नाशिक : मालेगावात बांगलादेशी रोहिंग्यांना भारतीय बनवण्याचा कारखाना असल्याचा खळबळजनक आरोप भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला होता. तसेच काही राजकीय पक्षांचे नेते, काही मुस्लिम नेते आणि काही एनजीओ यांच्या संगनमताने महाराष्ट्रात काही क्षेत्र निवडले असून यातून मालेगाव आणि अमरावतीच्या अंजनगाव सुर्जीच्या तहसील कार्यालयातून हजारो बनावट जन्म दाखले दिल्याचा दावा ही माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला होता.
मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर SIT कडून मोठी अॅक्शन
दरम्यान या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या कडे तक्रार ही करण्यात आली होती. त्यानंतर या संदर्भात यंत्रणा अॅक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीची टीम आता मालेगावात दाखल झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने नेमण्यात आलेल्या SIT टीम कडून आता या प्रकरणाच्या चौकशीचे काम सुरू करण्यात आले आहे. रोहिंगे, बांगलादेशी प्रकरणात मालेगाव तहसील कार्यालयात SIT टीमकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. तहसील कार्यालयात चौकशीसाठी महानगरपालिकेचे आयुक्त, तहसीलदार, आरोग्य अधिकारी आदी उपस्थित असून कागदपत्रांची तपासणी सुरू करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. मालेगावात रोहिंग्या बांगलादेशी यांना भारतीय बनवत असल्याची तक्रार छावणी पोलिस स्टेशन येथे दाखल केला होता. त्याप्रकरणी आता कारवाईला गती प्राप्त झाल्याचे समोर आले आहे.
बांगलादेशी/रोहिंग्या घुसखोरांना मालेगावात जन्म दाखला घोटाळ्याचा
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) January 8, 2025
तपास करण्यासाठी विशेष तपास समिती (SIT) नेमल्या बद्धल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो
ही समिती बांगलादेशी/ रोहिंग्या घुसखोरांना मालेगावात अवैधरित्या जन्म दाखला दिल्या बाबत तपास करेल@BJP4Maharashtra pic.twitter.com/uCqY5aQ2Wu
परभणी जिल्ह्यातील बांग्लादेशींना शोधुन कारवाई करा, जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
सैफ अली खान यांच्यावर हल्ला करणारा हा बांग्लादेशी निघाला असुन परभणीतही अशाच पद्धतीने बांग्लादेशी असण्याची शक्यता आहे. केवळ बनावट आधार कार्ड काढुन बांग्लादेशी हे अनाधिकृतपणे राहत आहेत. त्यांना पकडुन तत्काळ कारवाई करण्याची मोहीम सुरू करण्यात यावी, अशी मागणी परभणीतील शिंदे सेनेचे नेते आनंद भरोसे भरोसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. त्यामुळे या प्रकरणी आता काय कारवाई केली जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
हे ही वाचा